Justin Bieber Tour : गंभीर आजाराचा सामना करणाऱ्या जस्टिन बीबरचं स्टेजवर कमबॅक; चाहत्यांना दिला खास मेसेज
जस्टिन बीबरच्या (Justin Bieber) आता त्याच्या जस्टिस वर्ल्ड टूरला (Justice world tour) सुरुवात होणार आहे.
Justin Bieber Tour : प्रसिद्ध गायक जस्टिन बीबर (Justin Bieber) हा ‘रामसे हंट सिंड्रोम’(Ramsay Hunt Syndrome) या आजाराला झुंज दिल्यानंतर आता स्टेजवर कमबॅक करत आहे. जस्टिनला चेहऱ्याला अर्धांगवायूचा झटका आल्याने त्याचे सगळे शो रद्द करण्यात आले होते. आता त्याच्या जस्टिस वर्ल्ड टूरला (Justice world tour) सुरुवात होणार आहे. जस्टिन भारतामध्ये देखील परफॉर्म करणार आहे.
जस्टिननं वीकेंडला इटलीमध्ये आयोजित करण्यात Lucca Summer Festival मध्ये परफॉर्मन्स दिला. बीबरची पत्नी हॅली बीबरनं इंस्टाग्रामवर जस्टिनच्या परफॉर्मेन्सचा एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करुन ती म्हणाली की, तिला तिच्या पतीचा अभिमान वाटतो. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, 'मी एक गोष्ट सांगू शकते की, या व्यक्तीला कोणी खाली खेचू शकत नाही.'
जस्टिननं देखील सोशल मीडियावर स्टेजवरील एक क्लिप शेअर करुन चाहत्यांना खास मेसेज दिला. त्यानं सांगितलं, 'हा माझ्या कमबॅकचा पहिला दिवस आहे. येथे येऊन मला चांगलं वाटतं. अनेकांना माहिती आहे की ‘जस्टिस टूर’ही इक्वॅलिटीसाठी केलं जाणार आहे. हे सर्वांनासाठी आहे. तुम्ही कसे दिसता? तुमचा शेप, साइद आणि दिसण्यानं काही फरक पडत नाही. आपण सर्व एक आहोत.'
जस्टिन बीबरनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन ‘रामसे हंट सिंड्रोम’ या आजाराबाबत त्याच्या चाहत्यांना माहिती दिली होती. व्हिडीओमध्ये जस्टिन म्हणतो, ‘तुम्ही बघू शकता, मी माझे डोळे देखील मिचकवू शकत नाही. माझ्या चेहऱ्याच्या या बाजूने मी हसूही शकत नाही. माझा शो रद्द होण्याचे हेच कारण आहे. बरेच लोक यामुळे निराश झाले आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की, मी यावेळी शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही. मला आशा आहे की, तुम्ही लोक मला समजून घ्याल.’
महत्वाच्या इतर बातम्या:
- Munawar Faruqui : जस्टिन बीबरच्या आजारपणाबाबत मुनव्वर फारुकीनं शेअर केली पोस्ट; नेटकरी म्हणाले, 'मी तुझा फॅन आहे पण...'
- Justin Bieber : कोट्यवधींचा बंगला ते महागड्या गाड्या; जस्टिन बिबर आहे अब्जाधीश