Justin Bieber Divorce : जस्टिन बीबरचा जगातील सर्वात महागडा घटस्फोट, 2600 कोटींचा झटका? हेलीला मिळणार भरभक्कम पोटगी
Justin Bieber Hailey Divorce : प्रसिद्ध पॉप गायक जस्टिन बीबर आणि त्याची पत्नी यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे.

Justin Bieber-Hailey Divorce : प्रसिद्ध कॅनेडियन पॉप गायक जस्टिन बीबरचे जगभरात चाहते आहेत. जस्टिनचा मोठा चाहतावर्ग असून तो नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या जस्टिन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पॉप सिंगर जस्टिनच्या पर्सनल लाईफमध्ये सध्या खळबळ माजल्याची चर्चा आहे. जस्टिन बीबर आणि त्याची पत्नी हेली यांच्या नात्यात सध्या सर्व काही आलबेल नसल्याची माहिती आहे. या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जात असून त्यांच्या घटस्फोटाची चर्चा जोर धरु लागली आहे.
जस्टिन बीबर आणि हेली बीबर यांचा घटस्फोट?
गायक जस्टिन बीबर आणि त्याची पत्नी हेली बीबर सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. जस्टिन बीबर आणि हेली बीबर घटस्फोट घेणार असल्याचं बोललं जात आहे. जस्टिन आणि हेली लवकरच विभक्त होणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. जस्टिन बीबरची पत्नी हेली बीबरने घटस्फोटानंतर पोटगी म्हणून 300 दशलक्ष डॉलर रुपये मागण्याची शक्यता आहे. ही रक्कम भारतीय चलनात 2600 कोटी रुपये इतकी आहे.
जस्टिन आणि हेलीचा संसार
काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर जस्टिन बीबर आणि हेलीने लग्न केलं. जस्टिन बीबर आणि हेली 2018 मध्ये विवाहबंधनात अडकले. त्यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये हेलीने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. जस्टिन आणि हेलीने त्यांच्या मुलाचं नाव जॅक ब्लूस बीबर (JACK BLUES BIEBER) असं ठेवलं आहे.
जस्टिन बीबरच्या वाईट सवयी आणि व्यसन
इंटरनॅशनल गायक जस्टिन बीबरच्या घटस्फोटाच्या बातम्या व्हायरल होताच चाहत्यांना धक्का बसला आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, हेली बीबर बऱ्याच काळापासून तिचा पती जस्टिन बीबरच्या वाईट वर्तनामुळे आणि ड्रग्जच्या सवयींमुळे नाराज आहे. काही काळापूर्वी, जस्टिन बीबरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामध्ये तो बोंग वापरताना दिसत होता.
घटस्फोटानंतर हेलीला मिळणार 'इतकी' पोटगी
जस्टिन बीबर आणि हेलीचा घटस्फोट झाल्यास हा जगातील सर्वात महागडा घटस्फोट ठरेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर जस्टिन बीबर आणि हेलीचा घटस्फोट झाला तर ते पॉप सिंगरला खूप महागात पडणार आहे. कोणत्याही सेलिब्रिटी जोडप्यांपैकी हा सर्वात महागडा घटस्फोट असेल, असं म्हटलं जात आहे. घटस्फोटानंतर हेली पती जस्टिन बीबरकडून 2600 कोटी रुपये पोटगी मिळण्यासाठी मागणी करू शकते, असं सांगितलं जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























