एक्स्प्लोर

Jui Gadkari : जुई गडकरीने साजरी केली कायम स्मरणात राहणारी दिवाळी, निराधार आजी-आजोबांसोबत केलं खास सेलिब्रेश

Jui Gadkari : अभिनेत्री जुई गडकरी हिने शांतीवनातल्या निराधार आजी आजोबांसोबत दिवाळीचं खास सेलीब्रेशन केलं आहे.

Jui Gadkari : आनंद इतरांसोबत वाटला तर तो द्विगुणीत होतो असं म्हणतात. अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) हिच गोष्टी मागच्या 20 वर्षांपासून अनुभवतेय. जुई ही मुळची कर्जतची असून ती एकत्र कुटुंबातच लहानाची मोठी झाली.  त्यामुळे सण कोणताही असो संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन तो जल्लोषात साजरा करतात. नातेवाईकांसोबतचे हे क्षण जुईसाठी खास आहेतच. पण जुईचं आणखी एक कुटुंब आहे जे गेले 20 वर्ष तिने अगदी घट्ट जपलं आहे. पनवेल इथल्या शांतीवन आश्रमातील निराधार आणि कुष्ठरोगाशी झुंज देणारे आजी-आजोबा हे जुईचं कुटुंब आहे. 

 कॉलेजमध्ये असल्यापासून जुई न चुकता दिवाळीचा सण या निराधार आजी-आजोबांसोबत साजरा करते. या उपक्रमात तिला तिच्या मित्रपरिवाराचाही साथ लाभते. दिवाळीच्या दिवशी जुई आणि तिचा मित्रपरिवार मिळून संपूर्ण आश्रम सजवतात. फराळ आणि गोडधोड जेवणाचा बेतही असतो. आजी आजोबांसाठी गाण्याचा कार्यक्रमही साजरा केला जातो.                                                     

कॉलेजच्या दिवसांमध्ये नाटकाच्या तिकिटातून मिळालेले पैसे या आश्रमाला देणगी स्वरुपात दिले जायचे. आता बरेच जण या उपक्रमाला सढळ हस्ते हातभार लावतात. जे पैसे जमतात ते या आजी-आजोबांचं वर्षभराचं रेशन, औषधपाणी, कपडे यासाठी वापरले जातात. माझ्यावर विश्वास ठेऊन मदतीचा हाच पुढे करणाऱ्या सर्वांचीच मी ऋणी आहे अशी भावना जुईने व्यकत केली. जुईच्या या उपक्रमात आजवर कधीही खंड पडलेला नाही. विशेष म्हणजे कॉलेजचे नवे विद्यार्थीही या उपक्रमात सामील होतात.                   
 
जुई गडकरीची ठरलं तर मग मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत जुई साकारत असलेली सायली देखिल अनाथ आश्रमात लहानाची मोठी झालीय. त्यामुळे या व्यक्तिरेखासाठी जेव्हा तिला विचारण्यात आलं तेव्हा तिने तातडीने होकार दिला होता. त्यामुळे मालिकेत साकारत असलेली सायली खऱ्या आयुष्यातही जुई जगतेय असंच म्हणायला हवं. 

View this post on Instagram
 
A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial)

ही बातमी वाचा : 

Dhananjay Powar : 'निक्की-अरबाजच्या फेक नात्यातील अश्लील हरकती...,' धनंजयची सोशल मीडियावर पोस्ट; नेमकं काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांसाठी 10905 अर्ज,7995 उमेदवार रिंगणात 
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांसाठी 10905 अर्ज,7995 उमेदवार रिंगणात 
Shashikant Shinde : शशिकांत शिंदे यांच्याकडून कोरेगाव विधानसभेसाठी अर्ज दाखल, नरेंद्र पाटील यांची पूर्णवेळ हजेरी ठरली लक्षवेधी 
शशिकांत शिंदे यांच्याकडून कोरेगाव विधानसभेसाठी अर्ज दाखल, नरेंद्र पाटील यांची उपस्थिती ठरली लक्षवेधी 
मागच्या वेळी पैशांची अतिवृष्टी झाली, आता ढगफुटी होणार, ओमराजे निंबाळकरांचा तानाजी सावंतांना टोला
मागच्या वेळी पैशांची अतिवृष्टी झाली, आता ढगफुटी होणार, ओमराजे निंबाळकरांचा तानाजी सावंतांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prithviraj Chavan on Ajit Pawar : अजितदादांचा आरोप, आबांची सही; पृथ्वीराज चव्हाणांनी सगळंच सांगितलंAaditya Thackeray Full PC : श्रीनिवास वनगांचं तिकीट कापलं,आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रियाABP MAJHAAnand Bharose on Rahul Patil : राहुल पाटलांनी फक्त स्वताचं घर भरलं, भरोसेंचा घणाघातTOP 25 News : Superfast News : 29 OCT 2024 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांसाठी 10905 अर्ज,7995 उमेदवार रिंगणात 
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांसाठी 10905 अर्ज,7995 उमेदवार रिंगणात 
Shashikant Shinde : शशिकांत शिंदे यांच्याकडून कोरेगाव विधानसभेसाठी अर्ज दाखल, नरेंद्र पाटील यांची पूर्णवेळ हजेरी ठरली लक्षवेधी 
शशिकांत शिंदे यांच्याकडून कोरेगाव विधानसभेसाठी अर्ज दाखल, नरेंद्र पाटील यांची उपस्थिती ठरली लक्षवेधी 
मागच्या वेळी पैशांची अतिवृष्टी झाली, आता ढगफुटी होणार, ओमराजे निंबाळकरांचा तानाजी सावंतांना टोला
मागच्या वेळी पैशांची अतिवृष्टी झाली, आता ढगफुटी होणार, ओमराजे निंबाळकरांचा तानाजी सावंतांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Satyajeet Tambe : '...तर आम्ही तुम्हाला आडवं आल्याशिवाय राहणार नाही'; सत्यजित तांबेंनी सुजय विखेंवर डागली तोफ
'...तर आम्ही तुम्हाला आडवं आल्याशिवाय राहणार नाही'; सत्यजित तांबेंनी सुजय विखेंवर डागली तोफ
Dilip Mane : ज्यांनी तिकीट जाहीर केलं, एबी फॉर्म आणण्याची जबाबदारी त्यांची, अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर दिलीप मानेंनी राजकारण सांगितलं...
शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघण्यासाठी सांगितलं, एबी फॉर्म होता पण पोहोचवला नाही : दिलीप माने
Nawab Malik : अखेर सस्पेन्स संपला... नवाब मलिकांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एबी फॉर्म, अजित पवारांनी मित्रपक्षांचा दबाव झुगारला
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्रीन सिग्नल, नवाब मलिकांनी उमेदवारी अर्जासोबत एबी फॉर्म जोडला
Rohit Patil : 'आबा गेल्यानंतर नऊ वर्षांनी मळमळ दाखवली', अजित पवारांच्या गंभीर आरोपावर रोहित पाटलांची पहिली प्रतिक्रिया
'आबा गेल्यानंतर नऊ वर्षांनी मळमळ दाखवली', अजित पवारांच्या गंभीर आरोपावर रोहित पाटलांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget