Dhananjay Powar : 'निक्की-अरबाजच्या फेक नात्यातील अश्लील हरकती...,' धनंजयची सोशल मीडियावर पोस्ट; नेमकं काय?
Dhananjay Powar : डीपी दादांनी त्यांच्या सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे.
Dhananjay Powar : बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi Season 5) टिम ए विरुद्ध टीम बी असा खेळ पाहायला मिळाला. टिम ए मध्ये पॅडी दादा (Pandharinath Kamble), डीपी दादा (Dhananjay Powar), अंकिता (Ankita Walavalkar), सूरज (Suraj Chavan), योगिता (Yogita Chavan) आणि आर्या (Arya Jadhao) हे स्पर्धक होते. त्याचप्रमाणे टीम बीमध्ये सुरुवातीला जान्हवी, वैभव, निक्की (Nikki Tamboli) आणि अरबाज (Arbaz Patel) हे चौघे होते. पण शेवटी या टीममध्ये फक्त निक्की आणि अरबाजच राहिले. निक्की आणि अरबाजचं घरातलं वागणं हे घरातल्या सदस्यांप्रमाणेच प्रेक्षकांनाही खटकलं होतं. त्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच प्रतिक्रिया देखील उमटत होत्या.
दरम्यान नुकतच डीपी दादा म्हणजे धनंजय पोवारने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एका चाहत्याची कमेंट शेअर केली आहे. तसेच त्याने योगिता, आर्या, पॅडी दादा, अंकिता सूरज या सगळ्यांनाही टॅगही केलंय. या चाहत्याने निक्की आणि अरबाजविषयी भाष्य केलं असून टीम बीचं कौतुक केलं आहे.
'अश्लील हरकतींना फुटेज देण्यापेक्षा..'
डीपी दादांनी ही कमेंट शेअर करत म्हटलं की, 'निक्की-अरबाजच्या फेक नात्यातील खोटे इमोशन्स, फालतू चाळे, अश्लील हरकती यांना अवास्तव फुटेज देण्यापेक्षा नात्यातील खऱ्या प्रेमाच्या, भावनांच्या क्षणांना जरा जास्त फुटेज द्या. BB. तुमचा शो पहिल्यांदाच घराघरांतील लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वांनी सर्वाधिक वेळा पाहिला तो याच डीपी, अंकिता, सुरज, पॅडी दादा अशा मराठी मातीतल्या सामान्य आणि खऱ्या स्पर्धकांमुळे! कारण, ही माणसं सर्वांनाच आपल्या घरातली वाटतात. लोक TV कडे डोळे लावून बसतात ते असे खरे क्षण पाहण्यासाठी.'
'निक्की-अरबाजचे फालतु चाळे..'
पुढे या कमेंटमध्ये म्हटलंय की, 'चांगल्या गोष्टी तुम्ही पडद्यावर आणतच नाही. नात्यातील गोडवा दाखवणारा हा क्षण दाखवण्यासाठी तुमच्याकडे एक-दोन मिनिटेही वेळ नव्हता? इतकी घाई? तुम्हाला मात्र निक्की-अरबाजचे फालतु चाळे तासभर दाखवून त्यातून नक्की कोणता संदेश द्यायचा आहे?'