Hindustan lever कंपनीच्या नावावरुन पडलं जॉनी लीवर यांचं नाव, स्वत: सांगितली होती नावामागील स्टोरी
Johnny Lever : Hindustan lever कंपनीच्या नावावरुन पडलं जॉनी लीवर यांचं नाव, स्वत: सांगितली होती नावामागील स्टोरी

Johnny Lever : सर्वांच्या कलेवर आपल्या विनोदी कलेने हास्य फुलवणारी, सर्वांना मनमुरादपणे हसवणारे कॉमेडियन जॉनी लीवर यांनी त्यांच्या नावामागील स्टोरी सांगितली होती. कोण बनेगा मराठी करोडपती या कार्यक्रमात जॉनी लीवर यांनी त्यांच्या नावामागची स्टोरी सांगितली होती. केबीसीचे निवेदक सचिन खेडेकर यांच्याशी बोलताना जॉनी लीवर यांनी त्यांच्या नावाबाबत भाष्य केलं होतं.
जॉनी लीवर म्हणाले होते की, माझ्या आजोबांनी माझं नाव जॉन असं ठेवलं होतं. चाळीतले सर्व लोक जानू जानू म्हणू लागले. आताही म्हणतात..जानू आला...जानू आला..कुठे आहे जानू? त्यानंतर जानूचं जॉनी झालं. त्यानंतर मी हिंदुस्तान लीवरला कामाला लागलो. तिकडून लीवर लागलं. मी तिकडं कार्यक्रम करण्यास सुरुवात केली होती. आमच्या एका कर्मचाऱ्याने कार्यक्रम ठेवला होता. मी कंपनीतील सेक्रेटरी वगैरेंची कॉपी केली. त्यांचं नाव न घेता कॉपी करुन दाखवली. मी अभिनय करतो त्यावरुन त्यांचं नाव ओळखा. त्यामुळे मी त्यांची कॉपी (मीमीक्री) केली. सुरेश भोसले म्हणून आमचे एक यूनियन लीडर होते. ते स्टेजवर लढले..माईक घेतला आणि ते म्हणाले...याने संपूर्ण लीवरची करुन टाकली. आजपासून याचं नाव जॉनी लीवर...
जॉनी लीवर हे वयाच्या 18 वर्षी हिंदुस्तान लीवर या कंपनीत कामाला लागले होते. सातवी नापास मुलाला जे काम मिळायचे तेच काम त्यांना मिळालं होतं. झाडू मारणे फरशा पुसणे वगैरे कामे त्यांना करावी लागायची. रसायनांचे ड्रम उघडण्याचे आणि ते साफ करून ठेवण्याचे काम जॉनी करायचे. पहिल्याच वेळी जॉनीने ड्रम उघडला व तो पुसला, त्यात डोके घातलं व उगाच आवाज काढला. तो घुमला. त्याला गंमत वाटली. पुन्हा दुसरा आवाज काढला. नंतर अनेक आवाज काढले. रोजच तसेकेल्यावर जॉनीलाजाणवले की त्याच्या नकलांच्या आवाजावर चांगला परिणाम होतोय. वेगवेगळे आवाज काढायचो. एका कामगाराने तक्रार केली. मग त्याच्या सुपरवायझरने त्याला जाब विचारण्यासाठी बोलावले. त्याला जॉनीने तऱ्हे-तऱ्हेच्या नकला करून दाखवल्या. तर तो खूशच झाला आणि त्याने जॉनीला गेट्टुगेदरमध्ये संधी दिली. रंगभवनच्या त्याया संमेलनात शत्रुघ्न सिन्हा, राजेश खन्ना, अशोककुमार आदींची मिमिक्री करून जॉनीने सारे सभागृह दणाणून सोडले. त्यानंतर जॉनी लिव्हर यांना कंपनीत चांगले काम मिळू लागले.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या
























