एक्स्प्लोर

Marathi Movie : जितेंद्र जोशी आणि उपेंद्र लियमेची जबरदस्त जोडी एकत्र, बंधू सिनेमाच्या शुटींगला फलटण आणि वाईमध्ये सुरुवात

Marathi Movie : जितेंद्र जोशी आणि उपेंद्र लिमये यांची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र येणार असून बंधू या सिनेमात ते एकत्र झळकणार आहेत. 

Marathi Movie : अॅनिमल आणि मडगाव एक्सप्रेसनंतर उपेंद्र लिमये (Upendra Limaye) हा एका मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो जिंतेंद्र (Jitendra Joshi) सोबत दिसणार असून दोघेही भावंडाच्या भूमिकेत दिसतील. त्यांच्या बंधू या सिनेमातून दोघेही एकत्र येणार आहेत. सान्वी प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत या सिनेमाच्या  सेटवर चित्रीकरणाची सुरुवात करत नुकताच मुहूर्त सोहळा पार पडला.यावेळी दिग्दर्शक, निर्माते यांच्याबरोबर कलाकारही उपस्थित होते. 

चित्रीकरणाला सुरुवात झाली म्हणजेच आता लवकरात लवकर चित्रपट आपल्या भेटीला येणार याबाबत काही शंका नाही. 'आटपाडी नाईट्स', 'सरला एक कोटी' च्या यशानंतर लेखक - दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर यांच्याकडून पुन्हा एकदा वेगळा विषय  हाताळण्यात आला आहे.'बंधू' या चित्रपटातून आपल्याला उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी या दोन कसलेल्या कलाकारांची जबरदस्त जोडी पाहायला मिळणार आहे.

 'जिथे राम आहे.. तिथे लक्ष्मण तर येणारच '

'बंधू' या चित्रपटातून आपल्याला उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी या दोन कसलेल्या कलाकारांची जबरदस्त जोडी पाहायला मिळणार आहे. अॅनिमल या हिंदी चित्रपटानंतरच्या यशानंतर आता ' बंधू ' या आगळ्यावेगळ्या चित्रपटातून उपेंद्र लिमये हा एका वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे.  जिथे राम आहे.. तिथे लक्ष्मण तर येणारच असं त्याला टॅगलाईन देण्यात आलं आहे. यावरुनच ही दोन भावांमधील प्रेमाची गोष्ट आहे  हे आपल्याला समजते. लवकरच भावांमधील ही अनोखी प्रेमकथा आपल्या भेटीला येणार आहे. 

'भावाभावांमधील प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न'

चित्रपटाबद्दल सांगताना लेखक, दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर  यांनी सांगितले की, मी नेहमीच सामाजिक आरोग्य सुधरवणारे चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करतो.समाजाच्या आरोग्याचं नुकसान होईल अशा आशयाचे चित्रपट मी हाताळत नाही. या आधी मी पती - पत्नीवर आधारित चित्रपट केले आहेत. तर आता 'बंधू' च्या निमित्ताने मी भावाभावांमधील प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.आताच्या सोशल मिडिया आणि स्पर्धात्मक युगामध्ये नाती दूर होत चालली आहेत. त्यामुळे भावाभावांच्या नात्यावर भाष्य करणे मला गरजेचे वाटले. दुरावलेली नाती प्रेमाच्या ओल्याव्याने कशी जवळ येतात हे 'बंधू' या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.

या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर हे असून निर्माती आरती चव्हाण या आहेत. कार्यकारी निर्माता विनोद नाईक आहेत. तर प्रोजेक्ट हेड वैभव शिरोळकर आहेत. सिनेमॅटोग्राफर म्हणून हर्षद आत्माराम गायकवाड हे लाभले आहेत. संगीत विजय नारायण गावंडे यांचे आहे. तर गीतरचनेची धुरा गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांनी सांभाळली आहे. कला दिग्दर्शक नितीन गणपत बोरकर हे आहेत.

ही बातमी वाचा : 

Sangharsh Yoddha Box Office Collection : पाचव्या आणि सहाव्या दिवशी अवघ्या चार लाखांची कमाई, बॉक्स ऑफिसवर 'संघर्षयोद्धा'ची घोडदौड मंदावली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
बेसावध प्रवाशांना गाठताहेत चोरटे; स्वारगेट स्थानकात मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश;120 मोबाईल आणि तीन लॅपटॉप जप्त
बेसावध प्रवाशांना गाठताहेत चोरटे; स्वारगेट स्थानकात मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश;120 मोबाईल आणि तीन लॅपटॉप जप्त
Nikita Dutta Viral Photo : नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी विवेक कोल्हेंचा मोठा दावा
'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंचा मोठा दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 10 am ABP MajhaTop 60 Superfast News : महत्वाच्या 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 1 जुलै 2024ABP Majha Headlines :  11:00AM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  10:00AM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
बेसावध प्रवाशांना गाठताहेत चोरटे; स्वारगेट स्थानकात मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश;120 मोबाईल आणि तीन लॅपटॉप जप्त
बेसावध प्रवाशांना गाठताहेत चोरटे; स्वारगेट स्थानकात मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश;120 मोबाईल आणि तीन लॅपटॉप जप्त
Nikita Dutta Viral Photo : नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी विवेक कोल्हेंचा मोठा दावा
'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंचा मोठा दावा
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, नेमकं कारण काय?
नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, ठाकरे गटाचा आक्षेप, नेमकं कारण काय?
Rohit Sharma : रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह, टी 20 वर्ल्ड कप गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान, आयसीसीचा मोठा निर्णय
रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह, टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान, आयसीसीचा मोठा निर्णय
Chiplun Crocodile : नागरिकांची पाचावर धारण, चिपळूणमध्ये शिव नदीतून मगर रस्त्यावर अन् थाटात वावर, पाहा व्हिडीओ
रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मानवी वस्तीत मगरीची एंट्री, मुख्य रस्त्यावर थाटात वावर, नागरिकांमध्ये घबराट
Maharashtra Accident: यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली, चार जणांचा जागीच मृत्यू
यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली, चार जणांचा जागीच मृत्यू
Embed widget