(Source: Poll of Polls)
Jaya Bachchan Scolds Shweta Bachchan: 'प्रत्येकवेळी मी... मी... मी...'; जया बच्चन लाईव्ह पॉडकास्टमध्ये ऑन कॅमेरा लेक श्वेता नंदावर चिडल्या
Jaya Bachchan Scolds Shweta Bachchan: आपल्या चिडचिडेपणामुळे नेहमीच नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय बनणाऱ्या अभिनेत्री जया बच्चन आता त्यांची लेक श्वेता नंदावर लाईव्ह पॉडकास्टमध्ये चिडल्यामुळे चर्चेचा विषय बनल्या आहेत.

Jaya Bachchan Scolds Shweta Bachchan: बॉलिवूडमधल्या (Bollywood News) काही प्रतिष्ठित कुटुंबियांपैकी एक म्हणजे, बच्चन कुटुंबीय (Bachchan Family). या ना त्या, कोणत्या ना कोणत्या कारणानं हे कुटुंब नेहमीच चर्चेत असते. त्यातल्या त्यात जया बच्चन आपल्या फटकळ स्वभावामुळे नेहमीच चर्चेचा विषय बनतात. बच्चन कुटुंबियांच्या प्रोफेशनल लाईफसोबतच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय असतो. अलिकडेच अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan), त्यांची लेक श्वेता नंदा (Shweta Bachchan-Nanda) आणि नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जया त्यांच्या लेकीवर म्हणजेच, श्वेता नंदावर चिडल्याचं दिसतंय. तसेच, ते श्वेता नंदाची वाईट सवयही जाहीरपणे सांगत असल्याचं पाहायला मिळतंय.
नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्ट 'व्हॉट द हेल नव्या'च्या (What The Hell Navya) एका एपिसोडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नव्याची आजी जया आणि आई श्वेता तिच्या पॉडकास्टमध्ये दिसतायत. या अनफिल्टर पॉडकास्टमध्ये, तिघीही एका मुद्द्यावर आपलं मत देत असल्याचं दिसतंय.
नव्या नवेली तिच्या आई आणि आजीला प्रश्न विचारते
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये, नव्यानं तिच्या आई आणि आजीला एका मुद्द्यावर त्यांचं मत विचारलं, पण श्वेताच्या नॉन-स्टॉप ओपिनियनमुळे जया बच्चन चिडली. नव्यानं जयाला विचारलं, "इंटरनेटचा मानव म्हणून आपल्यावर काय परिणाम झाला आहे? तुम्हाला वाटते का की, आपण पूर्वीपेक्षा दयाळू झालोत? तुम्हाला वाटतं का की आपण आशावादी झालोत?" यावर श्वेतानं लगेच आपलं मत व्यक्त केलेलं, "जे लोक आधीपासून दयाळू आहेत, ते अधिक दयाळू होतील. जे कडवट आहेत, ते तसेच राहतील." हे बोलताना ती खळखळून हसलेली.
पण, श्वेताच्या सततच्या बोलण्यामुळे जया बच्चन वैतागल्या. त्यांनी थेट श्वेताला उद्देशून म्हटलं की, "श्वेता, तूच एकटी सतत बोलतेस आणि मतं देतेयस." श्वेता म्हणाली की, "पॉडकास्ट मतं देण्यासाठीच असतो, तेव्हा जया म्हणाल्या, "हो, पण प्रत्येक वेळी मी, मी, मी नको. कधी कधी ऐकायलाही शिका." हे ऐकून श्वेता नंदा काही क्षण गप्प बसली.
दरम्यान, पॅपाराझींवर सतत चिडणाऱ्या जया बच्चन लाईव्ह पॉडकास्टमध्ये चक्क आपल्या लेकीवर चिडल्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी जया बच्चन आणि श्वेता बच्चन-नंदा यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :



















