Panchayat Actor Asif Khan Suffers Heart Attack: पंचायत फेम अभिनेत्याला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात हलवलं, सध्या प्रकृती स्थिर
Panchayat Actor Asif Khan Suffers Heart Attack: 'पंचायत' आणि 'भूतनी' सारख्या लोकप्रिय चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम करणारा अभिनेता आसिफ खानला हृदयविकाराचा झटका आला आहे.

Panchayat Actor Asif Khan Suffers Heart Attack: 'पंचायत' वेब सीरिजमधील (Panchayat) अभिनेता आसिफ खान (Asif Khan) यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला होता. त्यांना मुंबईतील (Mumbai News) कोकिलाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital) दाखल करण्यात आलं होतं. या बातमीनं चाहत्यांना पुरता धक्का बसला आहे, तसेच आसिफनं लवकरात लवकर बरं व्हावं, यासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान, सध्या त्याची प्रकृती ठीक असून त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. हॉर्ट अटॅकनंतर आसिफ खाननं सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट केली आहे.
आसिफ 34 वर्षांचा आहे आणि या वयात त्याला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. पण चांगली गोष्ट म्हणजे, आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे आणि त्याची प्रकृती सुधारतेय. मीडिया रिपोर्टनुसार, आसिफ पूर्णपणे बरा होईपर्यंत डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहील.
View this post on Instagram
सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये काय म्हणाले आसिफ खान?
आसिफ खाननं इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आणि लिहिलंय की, "गेल्या 36 तासांपासून हे पाहून मला जाणवलं की, आयुष्य खूप लहान आहे. कोणताही दिवस हलक्यात घेऊ नका. एका क्षणात सर्व काही बदलू शकतं. तुमच्याकडे असलेल्या आणि तुम्ही कोण आहात, याबद्दल कृतज्ञ रहा. तुमच्यासाठी कोण सर्वात महत्वाचं आहे, हे नेहमी लक्षात ठेवा आणि त्यांना नेहमीच महत्त्व द्या. आयुष्य ही एक भेट आहे आणि आपण ते जगतोय, म्हणजे आपण खूपच भाग्यवान आहोत."
![]()
प्रकृतीबाबत काय म्हणाला आसिफ खान?
याव्यतिरिक्त आसिफ खाननं आपल्या प्रकृतीबाबतही माहिती दिली. त्यासंदर्भात त्यानं एक स्टोरी शेअर केली. यामध्ये त्यांनी लिहिलंय की, "गेल्या काही तासांपासून मी काही हेल्थ प्रॉब्लेम्सचा सामना करतोय, ज्यामुळे मला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आहे. पण, आता मी हळूहळू रिकवर होतोय आणि आधीपेक्षा माझी प्रकृती उत्तम आहे."
![]()
चाहत्यांचे मानले आभार
आसिफ खाननं पुढे लिहिलंय की, "तुम्हा सर्वांचं प्रेम, काळजी आणि प्रार्थनांसाठी मनापासून आभार. तुम्हा सर्वांची साथ माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाची आहे. मी लवकरच पुन्हा येईन. आतापर्यंत मला तुमच्या मनात जागा द्या..."
हार्ट अटॅकची लक्षणं काय?
- छातीत दुखणं किंवा दबाव वाढणं, जो काही मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकू शकतो किंवा वारंवार जाणवू शकतो.
- वेदना छातीपासून हात, पाठ, मान, जबडा किंवा पोटात पसरू शकतात.
- थंड घाम येणं, उलट्या, चक्कर येणं किंवा बेशुद्ध पडणं
- जर यापैकी कोणतीही लक्षणं दिसली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. घरच्या घरी उपचार करणं टाळा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























