Janhvi Kapoor : 'मी मासिक पाळीमध्ये बॉयफ्रेंडशी...,' डेटिंगच्या चर्चांदरम्यान जान्हवी कपूरचा खासगी आयुष्यातबाबत मोठा खुलासा
Janhvi Kapoor : जान्हवी कपूरच्या डेटिंगच्या चर्चा सुरु असतानाच तिने तिच्या आयुष्यातील एका खासगी गोष्टीबाबत मोठा खुलासा केला आहे.
Janhvi Kapoor : 'मिस्टर आणि मिसेस माही' या सिनेमातून अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पण तिच्या कामापेक्षा ती सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आली आहेत. त्यातच नुकतच तिने तिच्या खासगी आयुष्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे.
शिखर पहाडियासोबत डेटिंग करत असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. त्यातच जान्हवीचे वडील बोनी कपूर यांनी देखील त्यांच्या नात्यावर जवळपास शिक्कामोर्तबतच केलं असल्याचं पाहायला मिळालं. नुकतीच ती अनंत आणि राधिकाच्या लग्नसोहळ्यात देखील तिच्या बॉयफ्रेंडसोबत दिसली होती. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या नात्याविषयी बऱ्याच चर्चा होऊ लागल्या.
जान्हवी कपूरने केलं खासगी आयुष्यावर भाष्य
जान्हवी सध्या तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या खासगी आयुष्याविषयी भाष्य केलं आहे. तिने म्हटलं की,माझी मासिक पाळी सुरु झाली की, दर महिन्याला मी माझ्या बॉयफ्रेंसोबत ब्रेकअप करायचे. सुरुवातीला ती व्यक्ती खूप वैतागायची. पण ब्रेकअप केल्यानंतर चार ते पाचच दिवसांत मी त्या व्यक्तीसोबत बोलायचे. त्यामुळे नंतर त्या व्यक्तीला देखील या गोष्टीची सवय झाली.
बॉयफ्रेंड शिखरसोबतच्या नात्याबद्दल म्हणाली...
जान्हवी कपूरने एका मुलाखतीत शिखरसोबत लग्न करण्याबाबत तिने सांगितलं की, 'मी सध्या माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. लग्नाबाबत मला किंवा त्याच्याकडे सध्या वेळ नाही.' जान्हवी आणि शिखर सध्या रिलेशनमध्ये आहेत आणि स्वत:चं व्यावसायिक आयुष्य आणि डेटिंग लाईफ इन्जॉय करत आहेत. मात्र, सध्या तरी दोघांचा लग्नाचा कोणताही विचार नसल्याचं जान्हवीने मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने हे वक्तव्य केलं आहे.
जान्हवी 'उलझ' चित्रपटामध्ये झळकणार
अभिनेत्री जान्हवी कपूर सुधांशू सारिया दिग्दर्शित 'उलझ' या आगामी चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा दमदार ट्रेलर समोर आला होता, ज्यामध्ये ती IFS ऑफिसरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. 'उलझ' चित्रपटात जान्हवी कपूरसोबत गुलशन देवय्या, रोशन मॅथ्यू, आदिल हुसैन, राजेंद्र गुप्ता, राजेश तैलंग, मियांग चांग आणि जितेंद्र जोशी हे कलाकार त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसतील .