एक्स्प्लोर

Mahesh Manjarekar : रितेश देशमुख बिग बॉसचा नवा होस्ट, अखेर मांजरेकरांनी सोडलं मौन; म्हणाले, 'त्याला पहिल्याच सिझनला...'

Mahesh Manjarekar on Ritiesh Deshmukh : रितेश देशमुखच्या होस्टिंगवर महेश मांजरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Mahesh Manjarekar on Ritiesh Deshmukh : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनला (Bigg Boss Marathi Season 5) नुकतीच सुरुवात झाली. घरातील स्पर्धकांचे राडे, टास्कसाठी होणारी बाचाबाची या सगळ्याला आता सुरुवात झालीये. पण खरी उत्सुकता लागून राहिलीये की,रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) घरातल्या स्पर्धकांची शाळा कशी घेणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे. असं सगळं असलं तरीही अनेक प्रेक्षक महेश मांजरेकरांना (Mahesh Manjarekar) मात्र चाहते खूप मिस करत असल्याचं चित्रही पाहायला मिळतंय. 

बिग बॉसच्या नव्या सिझनची घोषणा झाली आणि चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली. त्यातच पहिल्याच प्रोमोमध्ये प्रेक्षकांना मोठं सरप्राईज मिळालं. या सिझनमध्ये होस्टची जबाबदारी ही रितेश देशमुखवर देण्यात आली. त्यानंतर अनेकांना एकच प्रश्न पडला होता की मांजरेकरांनी कार्यक्रम सोडला? आता या सगळ्यावर महेश मांजरेकरांनी अखेर मौन सोडलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी रितेशच्या होस्टिंवरही प्रतिक्रिया दिली आहे. 

'जे हवंय ते कदाचित माझ्यात नसेल'

महेश मांजरेकर यांनी अमोल परचुरे यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये या सगळ्यावर भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, 'मी जेव्हा सुरु केलं, तेव्हा माझं फक्त वर्षभराचंच कॉन्ट्रॅक्ट होतं. मला असं वाटायचं की, काय आहे हे, एकत्र बसून बघायचं काय हा कार्यक्रम बघायचा. कारण मी होस्ट करण्याआधी कधीच बिग बॉस पाहिलं नव्हतं. पण मी होस्ट करणार तेव्हा काही एपिसोड पाहिले तेव्हा वाटलं की हा गेम भारी आहे.  त्यानंतर त्या एका सिझनचे चार सिझन झाले. पण पाचव्या सिझनवेळी त्यांना खरंच असं वाटलं असेल की, मी जरा रिपीटेटिव्ह होतोय. त्यांना जे हवंय ते कदाचित माझ्यात नसेल.' 

रितेशला पहिल्याच सिझनला घेतलं नाही - महेश मांजरेकर

रितेशच्या होस्टिंगवर मांजरेकरांनी म्हटलं की, 'जेव्हा पहिल्यांदा मला घेतलं तेव्हा मला असं वाटलं की, अरे मी का, इतरही स्टार आहेतच की. पण आता जेव्हा रितेशचं नाव ऐकलं तेव्हा वाटलं, की अरे व्हा... नशिब त्यांनी रितेशला पहिल्याच सिझनला घेतलं नाही, नाहीतर मग मी ते केलंच नसतं, अशी मिश्लिक टिप्पणीही त्यांनी केली आहे.' 

पुढे त्यांनी म्हटलं की, मला असं वाटतं की, तो त्याच्यामध्ये त्याचं काहीतरी आणले. तसंही चार वर्ष मी खूप एन्जॉय केलाय तो कार्यक्रम. बदल करणं हे त्यांच्या हातात आहे. पण हा सिझनही मी तितक्याच आवडीने पाहीन. मी जे केलंय त्याचं मला खूप समाधान आहे. लोकांनाही बदल हवा आहे. तो खूप छान कार्यक्रम आहे आणि रितेश करतोय त्यासाठी मी खूप सकारात्मक आहे. रितेश हा शो गाजवेल असंही माझा विश्वास आहे.

ही बातमी वाचा : 

Nikki Tamboli : "तंगड्या वर करुन कॅमेऱ्यासमोर झोपते", निक्कीकडून वर्षा उसगांवकरांचा अपमान; रितेश काय भूमिका घेणार?

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget