गुडघ्यावर बसून रोमँटिक प्रपोज, बिग बॉसफेम मराठी अभिनेत्याचा गर्लफ्रेंडसोबत जंगी साखरपुडा, कधी चढणार बोहल्यावर?
कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या खास सोहळ्याचे फोटो समोर येताच सोशल मीडियावर लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.

Jay Dudhane Engagement: 'बिग बॉस मराठी सीजन 3'मुळे घराघरात पोहोचलेला, आपल्या फिटनेस स्टाईल आणि स्पष्ट मतांमुळे ओळख निर्माण करणारा अभिनेता जय दुधाने आता आयुष्याच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. लवकरच बिग बॉसच्या घरात गाजलेला जय बोहल्यावर चढणार असून, त्याचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे. या आनंदाच्या क्षणांचे फोटो सोशल मीडियावर समोर येताच चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. काही दिवसांपूर्वीच जयच्या केळवणाची चर्चा होती. नुकतेच त्याच्या सोशल मीडियावर साखरपुडा झाल्याचे फोटो समोर येत आहेत. त्यामुळे चाहते उत्साहात आहेत. लग्नाची तारीख अभिनेत्याने रिव्हिल केली नसली तरी जय बोहल्यावर कधी चढणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
बिग बॉसमुळे घराघरांत पोहोचलेल्या जयने त्याची दीर्घकाळची मैत्रीण आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटील हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या खास सोहळ्याचे फोटो समोर येताच सोशल मीडियावर लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.
बिग बॉसच्या स्टारचं फिल्मी प्रपोजल
बिग बॉस मराठी 3 नंतर जयची फॅन फॉलोइंग झपाट्याने वाढली. याच लोकप्रियतेदरम्यान मार्च महिन्यात जयने प्रेमाची अधिकृत कबुली दिली. उत्तराखंडमधील मसुरीच्या डोंगरदऱ्यांत, अगदी चित्रपटासारख्या अंदाजात, गुडघ्यावर बसून त्यानं हर्षलाला प्रपोज केलं. अंगठी घालतानाचे फोटो काही तासांतच व्हायरल झाले आणि बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरले.
कोण आहे बिग बॉस स्टारची होणारी पत्नी?
जयची होणारी पत्नी हर्षला पाटील ही एक प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर आणि व्हिडीओ इन्फ्लुएन्सर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स असून फॅशन आणि ट्रॅव्हलशी संबंधित तिचे व्हिडीओ विशेष लोकप्रिय आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून जय आणि हर्षला एकमेकांना डेट करत होते. बिग बॉस स्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची ही जोडी आधीपासूनच फॅन्सची फेव्हरेट होती.
View this post on Instagram
बिग बॉस फेमनंतरचा प्रवास
‘MTV Splitsvilla 13’चा विजेता म्हणून ओळख मिळवलेल्या जयला ‘बिग बॉस मराठी 3’ने खरी ओळख दिली. या शोमध्ये तो उपविजेता ठरला आणि त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत राहिला. त्यानंतर त्याने मराठी मालिकांमध्ये आणि चित्रपटांतही काम केलं. ‘वेड लागलं प्रेमाचं’ मालिकेपासून ते ‘गडद अंधार’सारख्या चित्रपटांपर्यंत जयचा प्रवास सुरूच आहे. लवकरच तो महेश मांजरेकरांच्या आगामी ऐतिहासिक चित्रपटातही झळकणार आहे.























