Jaat Worldwide Collection: सनीपाजीचा 'ढाई किलो का हाथ' जोमात, 'जाट'नं मोडला 'गदर'चा रेकॉर्ड; वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर कमाई छप्पडफाड
Jaat Worldwide Collection: 'जाट'नं जगभरात 19 दिवसांच्या कलेक्शनसह एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. हा चित्रपट जगभरातील बॉक्स ऑफिसवर सनी देओलच्या कारकिर्दीतील दुसरा सर्वात मोठा चित्रपट बनला आहे.

Jaat Worldwide Collection 19: बॉलिवूड स्टार (Bollywood Actor) सनीपाजीची (Sunny Deol) फिल्म 'जाट'ला (Jaat Movie) मोठ्या पडद्यावर येऊन बराच काळ लोटला. 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) सध्या चांगलं कलेक्शन (Worldwide Box Office Collection) करत आहे. दरम्यान, प्रदर्शित होऊन 20 दिवस उलटूनही, 'जाट'ला (Jaat) देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर त्याचं बजेट वसूल करता आलेलं नाही. पण जर 'जाट'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत विचार केला तर, 'जाट'नं 'गदर' सिनेमाला मागे टाकलं आहे.
'जाट'च्या 19 दिवसांच्या वर्ल्डवाईड कलेक्शनबाबत विचार केला तर, सनी देओलचा हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासून दररोज कोट्यवधींची कमाई करत होता. कोइमोईच्या रिपोर्टनुसार, 19 दिवसांत चित्रपटानं जगभरात 116.84 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या कलेक्शनसह, 'जाट' हा जगभरातील बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणारा सनी देओलच्या कारकिर्दीतील दुसरा सर्वात मोठा सिनेमा ठरला आहे.
View this post on Instagram
'गदर'ला टाकलं मागे, 'जाट' ठरला सनी देओलचा दुसरा सर्वात मोठा चित्रपट
'जाट' या चित्रपटानं सनी देओलच्या 'गदर - एक प्रेम कथा' या चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनला मागे टाकलं आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या या रोमँटिक चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 111.73 कोटी रुपये कमावले होते. 'गदर' हा सनी देओलचा आतापर्यंतचा दुसरा सर्वात मोठा चित्रपट होता, पण आता 'जाट'नं हे टायटल आपल्या नावे केलं आहे. 'गदर 2' अजूनही अव्वल स्थानावर आहे, जगभरातील बॉक्स ऑफिसवर त्यानं 691.08 कोटी रुपये कमावले आहेत.
दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित 'जाट' हा एक अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात सनी देओलसोबत रणदीप हुड्डा, विनीत कुमार आणि रेजिना कॅसँड्रा सारखे सिनेस्टार झळकले आहेत.
दरम्यान, सनी देओलच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, त्याच्याकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. तो नितेश तिवारीच्या ड्रीम 'रामायण' चित्रपटाचाही एक भाग असणार आहे. ज्यामध्ये तो भगवान हनुमानाची भूमिका साकारणार आहे. याशिवाय, त्याच्याकडे वरुण धवनसोबत 'बॉर्डर 2' आणि प्रीती झिंटासोबत 'लाहोर 1947' हे चित्रपटही पाईपलाईनमध्ये आहेत. हा अभिनेता 'जाट'च्या पुढील सिक्वेलमध्येही दिसणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























