Jaat Box Offce Collection Day 7: सनी देओलच्या 'जाट'चा बोलबाला, सातच दिवसांत रचलेत 46 बॉक्स ऑफिस रेकॉर्ड; लवकरच 'गदर'लाही पछाडणार?
Jaat Box Offce Collection Day 7: सनी देओलच्या 'जाट'नं बॉक्स ऑफिसवर 'छावा' सारखीच धुवांधार कमाई केली आहे. याचाच अर्थ हा चित्रपट दररोज एक ना एक विक्रम रचत आहे.

Jaat Box Offce Collection Day 7: सनी देओलच्या (Sunny Deol) 'जाट' सिनेमानं (Jaat Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट दररोज म्हटलं तरीसुद्धा एक ना अनेक विक्रम मोडत असल्याचं पाहायला मिळत आहे. साऊथ (South Movie) स्टाईलमध्ये बनवलेला हा बॉलिवूड चित्रपट (Bollywood Movie) अनेकांना आवडतोय. म्हणूनच विकेंड तर सोडाच पण, विक डेजमध्येही मोठ्या संख्येनं प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
आज 'जाट' प्रदर्शित होऊन एक आठवडा उलटला आणि आज चित्रपटाच्या कमाईशी संबंधित सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. म्हणजेच, सातव्या दिवसाची कमाई देखील समोर आली आहे. जाणून घेऊयात 'जाट'नं आतापर्यंत किती कोटींची कमाई केली? आणि त्यासोबतच एकूण कलेक्शन किती केलं? याबाबत सविस्तर...
'जाट'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी 6 दिवसांनंतर चित्रपटाच्या अधिकृत कमाईचा खुलासा करताना असंही म्हटलं आहे की, चित्रपटाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे आणि कामाचा दिवस असूनही चित्रपट चांगली कमाई करत आहे, ही मोठी गोष्ट आहे.
'जाट'च्या कमाईचे सर्व आकडे SECNILK नुसार आहेत, अंतिम आकडे नसून यामध्ये बदल होऊ शकतात.
| दिन | कमाई (कोट्यवधींमध्ये) |
| पहला दिवस | 9.62 |
| दुसरा दिवस | 7 |
| तिसरा दिवस | 9.95 |
| चौथा दिवस | 14.05 |
| पांचवा दिवस | 7.30 |
| सहावा दिवस | 6 |
| सातवा दिवस | 4 |
| एकूण | 57.92 |
सनी देओलच्या 'जाट'नं रचले अनेक विक्रम
- सनी देओलच्या 'जाट'नं पहिल्या दिवशी 9.62 कोटी रुपये कमावले आणि 2025 च्या सर्वात मोठ्या ओपनर चित्रपटांच्या यादीत 'छावा', 'सिकंदर' आणि 'स्काय फोर्स' नंतर चौथ्या स्थानावर पोहोचला.
- याशिवाय, या चित्रपटानं सनी देओलच्या सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर 'बॉर्डर'च्या लाईफटाईम कलेक्शनचा (39.46 कोटी रुपये) पल्ला गाठलाय.
- सनी देओलचा चित्रपट इथेच थांबला नाही. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या छावा, सिकंदर आणि स्काय फोर्स वगळता सर्व चित्रपटांना मागे टाकत, या चित्रपटानं चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटाचा किताबही पटकावला आहे.
- या चित्रपटानं यावर्षी प्रदर्शित झालेल्या 10 बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकलं आहे, ज्यात आझाद, लवयापा, इमर्जन्सी, क्रेझी, बदस रविकुमार, सुपरबॉईज ऑफ मालेगाव, द डिप्लोमॅट, देवा, फतेह आणि मेरे हसबंड की बीवी यांचा समावेश आहे.
View this post on Instagram
'जाट' हा सनी देओलच्या कारकिर्दीतील तिसरा सर्वाधिक कमाई चित्रपट
2001 मध्ये प्रदर्शित झालेला 'गदर' (76.88 कोटी रुपये) आणि 2023 मध्ये प्रदर्शित झालेला 'गदर 2' (525.45 कोटी रुपये) आणि 2011 मध्ये प्रदर्शित झालेला 'यमला पगला दीवाना' (55.28 कोटी रुपये) हे तिन्ही चित्रपट सनी देओलच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट होते. 'यमला पगला दीवाना'ला मागे टाकत आज 'जाट'नं सनी पाजीच्या तिसऱ्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम केला आहे.
सनी देओलनं गेल्या 25 वर्षांचे सर्वच्या सर्व रेकॉर्ड चक्काचूर
2001 ते 2025 पर्यंत सनी देओलनं एकूण 35 चित्रपट केलेत. आणि आज सनी पाजीनं गदर आणि गदर 2 हे दोन चित्रपट वगळता या सर्व चित्रपटांच्या लाईफटाईम कलेक्शनचा आकडा ओलांडला आहे. याचाच अर्थ सनी देओलनं स्वतःच्या 33 चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.
आता जर आपण या 33 चित्रपटांचे रेकॉर्ड 2025 सालच्या 10 चित्रपटांच्या रेकॉर्डसह वर नमूद केलेल्या उर्वरित रेकॉर्डसह एकत्र केले, तर त्याच्या चित्रपटानं 7 दिवसांत एकूण 46 रेकॉर्ड केले आहेत.
दरम्यान, सनी देओलची मुख्य भूमिका असलेला 'जाट' हा चित्रपट दक्षिणेकडील दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी यांनी दिग्दर्शित केला आहे. 'पुष्पा 2' च्या निर्मात्यांनी म्हणजेच, मैथ्री मूव्ही मेकर्सनी चित्रपटावर 100 कोटी रुपये खर्च केले आहेत. विक्की कौशलच्या 'छावा' चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा विनीत कुमार सिंह आणि स्वातंत्र्यवीर सावरकर सारखे चित्रपट करणारा रणदीप हुड्डा हे देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. त्याच्याशिवाय सैयामी खेर या चित्रपटात साऊथ अभिनेता जगपती बाबू, रेजिना कॅसांड्रा आणि रम्या कृष्णन यांच्यासोबत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























