Indrayani: इंद्रायणी मालिका निर्णायक वळणावर! लग्नाआधीच श्रीकलाच्या रहस्याचा उलगडा होणार?
पुढील काही भागांत या मालिकेचं कथानक अधिक थरारक, गूढ आणि रोमहर्षक होणार, हे निश्चित

Indrayani: कलर्स मराठीवरील प्रेक्षकप्रिय मालिका ‘इंद्रायणी’आता रोमांच आणि रहस्याने भरलेली नवी दिशा पकडत आहे. सतत शांत व संयमी राहणारी इंद्रायणी आता एका अशा वळणावर उभी आहे, जिथे सत्य जाणून घेण्यासाठी तिला स्वतःच्या भीतीशी, नात्यांशी आणि भावनांशी सामना करावा लागणार आहे. या प्रवासात राया तिच्यासोबत आहे, पण श्रीकलाच्या भोवती वाढत जाणारे रहस्य त्यांच्यासाठी अनेक प्रश्न निर्माण करत आहे. (Marathi Serial)
इंद्रायणीच्या मनात संशयाची सुई
गेल्या काही भागांमध्ये श्रीकलाच्या वागण्यात आलेले बदल अगदी सूक्ष्म असले, तरी ते दुर्लक्षित करता येणार नाहीत. तिच्या हालचालींमधील अचूकता, संवादातील लपवाछपवी आणि नजरेत दडलेला वेगळाच आत्मविश्वास हे सर्व काही इंद्रायणीच्या मनात संशयाची सुई अधिक आहे. प्रेक्षकांनाही तिच्या प्रत्येक कृतीमागे कोणता मोठा हेतू दडला आहे, याचा अंदाज घेण्याची उत्सुकता लागली आहे.
अचानक कथेत आलेल्या ‘पोपटराव’ या नवीन पात्राचा उल्लेख तर कथेचा ताण आणखीन वाढवतो. पोपटरावचं श्रीकलाशी काय नातं? ते दोघं एकत्र काय लपवत आहेत? या प्रश्नांची उत्तरं शोधताना इंद्रायणीचा मनोबल डळमळतो. राया श्रीकलाच्या घरात पाहिलेल्या काही विचित्र गोष्टी इंद्रायणीशी शेअर करतो, आणि हीच माहिती तिच्या मनातल्या शंकेला पेटवणारी ठरते. मात्र सत्य उघड करण्याचा प्रवास तितका सोपा नाही. प्रत्येक पावलागणिक तिला नवनवी आव्हानं भेटतात.कधी भावनिक संघर्ष, कधी भयाची छाया, तर कधी नात्यांवरील अविश्वास.
रहस्याच्या जाळ्यात सत्य कोणाचं उलगडणार?
या सर्व घडामोडींनी मालिका एका निर्णायक टप्प्याकडे वाटचाल करत आहे. इंद्रायणीचं धैर्य, तिची श्रद्धा आणि नात्यांवरील तिचा विश्वास यांची येत्या काही भागांत मोठी परीक्षा होणार आहे. रायाही प्रयत्न करत असतो, पण सत्याच्या शोधात इंद्रायणीला अनेकदा एकटं वाटतं.दरम्यान, श्रीकलाच्या शांत बाह्यस्वरूपामागे काय दडलं आहे? पोपटराव कोण? राया जे पाहतोय ते खरंच सत्याच्या दिशेने नेणारं आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. पुढील काही भागांत या मालिकेचं कथानक अधिक थरारक, गूढ आणि रोमहर्षक होणार, हे निश्चित.या रहस्याच्या जाळ्यात सत्य कोणाचं उलगडतंय.हे जाणून घेण्यासाठी पाहा ‘इंद्रायणी’ सोम ते शनी, संध्याकाळी 7 वाजता, केवळ कलर्स मराठीवर.






















