एक्स्प्लोर

India Most Watched Web Series: ना 'पंचायत', ना 'आश्रम', ना 'मिर्झापूर'; 2025 मध्ये सर्वाधिक पाहिली गेली 'ही' वेब सीरिज, आतापर्यंत आलेत 4 सीझन, तुम्ही पाहिलीय?

India Most Watched Web Series: भारतातील टॉप 50 स्ट्रीमिंग ओरिजिनल्सच्या यादीनुसार, पंकज त्रिपाठीचा 'क्रिमिनल जस्टिस सीझन 4' (Criminal Justice) हा 2025 मध्ये सर्वाधिक पाहिलेला ओरिजिनल शो बनलाय.

India Most Watched Web Series: सध्या ओटीटीची (OTT Released) चलती आहे. ओटीटीच्या (OTT Platform) जगात, जवळजवळ दररोज वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर अनेक शो आणि चित्रपट (Movies) प्रदर्शित होतात. कायदेशीर नाटकं, अ‍ॅक्शन थ्रिलर, रोमँटिक कॉमेडीपासून ते सर्व्हायव्हल थ्रिलरपर्यंत, प्रेक्षक घरबसल्या सर्वकाही फक्त एका क्लिकवर पाहू शकतात आणि सर्व प्रकारच्या कंटेंटचा आनंद घेऊ शकतात. 

नेटफ्लिक्स (Netflix) असो वा, प्राईम व्हिडीओ (Prime Video), जिओ सिनेमा (Jio Cenema) आणि इतर अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रत्येक प्रकारच्या सीरिज आहे. आपण ज्या वेब सीरिजबद्दल बोलत आहोत, ती 2025 मध्ये आजवर सर्वाधिक पाहिली गेलेली वेब सीरिज (Web Series) आहे. या सीरिजनं संपूर्ण महिनाभर जगभरातील प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.

2025 मध्ये सर्वाधिक पाहिलेला भारतीय ओटीटी शो कोणता?

भारतातील टॉप 50 स्ट्रीमिंग ओरिजिनल्सच्या यादीनुसार, पंकज त्रिपाठीचा 'क्रिमिनल जस्टिस सीझन 4' (Criminal Justice) हा 2025 मध्ये सर्वाधिक पाहिलेला ओरिजिनल शो बनलाय. ऑरमॅक्स मीडियानं टॉप 50 स्ट्रीमिंग शोची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये फक्त अशा कंटेंटचा समावेश आहे, जो थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालाय आणि ज्यांचे कोणतेही लायसन्स किंवा डब टायटल नाही. 

जिओ हॉटस्टारवरील 'क्रिमिनल जस्टिस सीझन 4'नं ओटीटीवरच्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या सीरिजच्या यादीमध्ये पहिलं स्थान मिळवलंय. ही वेब सीरिज आतापर्यंत 2.77 कोटी वेळा पाहिलं गेलंय. 

'क्रिमिनल जस्टिस 4'नं बॉबी देओलच्या 'एक बदनाम आश्रम' सीझन 3 पार्ट 2 सारख्या इतर सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या ओरिजिनल शोना मागे टाकलं आहे, ज्यानं 2.71 कोटी व्ह्यूजसह दुसरं स्थान पटकावलंय. त्यानंतर जितेंद्र कुमार आणि नीना गुप्ता यांचा 'पंचायत सीझन 4' होता, जो 2.38 कोटी व्ह्यूजसह तिसऱ्या स्थानावर होता. अमेझॉन प्राईम व्हिडीओवरील जयदीप अहलावतचा 'पाताल लोक' आणि नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम सीझन 3' यासारख्या इतर वेब सीरिजनं अनुक्रमे 16.8 दशलक्ष आणि 16.5 दशलक्ष व्ह्यूजसह चौथं आणि पाचवं स्थान पटकावलं आहे.

'क्रिमिनल जस्टिस: द फॅमिली ड्रामा' कुठे पाहाल? 

'क्रिमिनल जस्टिस: द फॅमिली ड्रामा'चा चौथा सीझन मे महिन्यात जिओ हॉटस्टारवर फक्त तीन भागांसह प्रदर्शित झाला आणि दर आठवड्याला प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. अ‍ॅपलॉज एंटरटेनमेंट आणि बीबीसी स्टुडिओज इंडिया यांच्या निधीतून तयार झालेल्या पंकज त्रिपाठी अभिनीत कोर्टरूम ड्रामामध्ये मोहम्मद झीशान अय्युब, श्वेता बसू प्रसाद, आशा नेगी, सुरवीन चावला, मीता वशिष्ठ, बरखा सिंग आणि खुशबू अत्रे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Salman Khan Stalked Bollywood Actress On Morning Walk: ऐश्वर्या, कतरिना सगळ्या नंतर, कधीकाळी 'ही' अभिनेत्री होती भाईजानच्या दिलाची धडकन; सायकलनं करायचा पाठलाग

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Lionel Messi India Tour: हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?
Mahapalikecha Mahasangram Jalgaon : जळगाव महापालिकेत कोण मारणार बाजी? जळगावकरांना काय वाटतं?
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Pravin Datke Nagpur : तुकाराम मुंडेंशी आमचा वैयक्तिक वाद नाही - प्रवीण दटके
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Lionel Messi India Tour: हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
Tamanna Bhatia: जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
इकडं पृथ्वीबाबा म्हणाले, एपस्टीन फाईलमुळे भारतात धमाका होणार अन् तिकडं ट्रम्प, गेट्स आणि क्लिंटन यांचे एपस्टीनसोबतच्या फोटोंनी खळबळ, ट्रम्प अनेक महिलांसोबत अन् कंडोमही दिसले
इकडं पृथ्वीबाबा म्हणाले, एपस्टीन फाईलमुळे भारतात धमाका होणार अन् तिकडं ट्रम्प, गेट्स आणि क्लिंटन यांचे एपस्टीनसोबतच्या फोटोंनी खळबळ, ट्रम्प अनेक महिलांसोबत अन् कंडोमही दिसले
पीएम मोदी ज्या 'मनेरगा'ला काँग्रेसच्या 60 वर्षांच्या सत्तेच्या अपयशाचे जिवंत स्मारक म्हणाले, त्याचं योजनेच आता नाव बदलून नव्यानं आणली! आमच्या 32 योजनांचं तेच केलं, काँग्रेसचा हल्लाबोल
पीएम मोदी ज्या 'मनेरगा'ला काँग्रेसच्या 60 वर्षांच्या सत्तेच्या अपयशाचे जिवंत स्मारक म्हणाले, त्याचं योजनेच आता नाव बदलून नव्यानं आणली! आमच्या 32 योजनांचं तेच केलं, काँग्रेसचा हल्लाबोल
Solapur farmers protest: सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका; राज्यातील शेतकरी नेते निघाले पंढरपूरकडे; आंदोलनानंतर कारखानदार आले गुडघ्यावर
सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका; राज्यातील शेतकरी नेते निघाले पंढरपूरकडे; आंदोलनानंतर कारखानदार आले गुडघ्यावर
Embed widget