एक्स्प्लोर

'हुतात्मा' सिरीज ZEE 5 अ‍ॅपवरून हटवली, कारण काय? मनसेसह ठाकरे सेना आक्रमक; ट्विट व्हायरल

MNS Leader Ameya Khopkar Questions Removal of ‘Hutatma’: हुतात्मा ही वेब सिरीज ZEE 5 अॅपवरून हटवण्यात आली. अमेय खोपकर यांनी सिरीज हटवण्यामागील कारणांवर प्रश्न उपस्थित केला.

Hutatma Web Series: राज्यातील 29 महापालिका निवडणुकींपैकी मुंबई महानगरपालिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. अशातच एका नव्या मु्द्द्यानं तोंड वर काढलं आहे. 2019 मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर आधारीत 'हुतात्मा' नावाची वेब सिरीज ZEE 5 अॅपवर प्रदर्शित करण्यात आली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत एकूण 105 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. ही गोष्ट या सिरीजमधून मांडण्यात आली होती. या सिरीजमध्ये मराठीतील दिग्गज कलाकारांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र, आता ही सिरीज ZEE 5 अॅपवरून हटवण्यात आली आहे. यामुळे प्रेक्षकांनी रोष व्यक्त केला आहे. ही सिरीज ZEE 5 अॅपवरून हटवल्यानंतर मनसे चित्रपट कर्मचारी सेनाध्यक्ष अमेय खोपकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

अमेय खोपकर नेमकं काय म्हणाले...?

अमेय खोपकर यांनी ट्विटरवर या चित्रपटाच्या निगडीत एक पोस्ट लिहिली होती. "2019मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीबाबत एक कठोर भाष्य करणारी एक वेब सिरीज ZEE 5 अॅपवर आली होती. या सिरीजचा नाव हुतात्मा. या सिरीजमध्ये मराठी रक्त सळसळून उठेल असे काही प्रसंग दाखवण्यात आले होते. मात्र, ही सिरीज अचानक सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आली. ही सिरीज हटवण्यामागचं कारण काय? मराठी माणूस पेटून उठू नये, अशी इच्छा बाळगणाऱ्यांचे हे कारस्थान तर नाही ना? हे तपासावे लागेल", असं ट्विट त्यांनी केलं आहे.

सध्या अमेय खोपकर यांची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. खोपकर यांची ट्विट व्हायरल होताच अखिल चित्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मराठी माणसाला आपल्याला पूर्वजनांचा संघर्ष बलिदान आणि इतिहासाची माहिती असायला हवी. मुंबई महाराष्ट्राला लढून मिळाली होती. ती आता लढूनच टिकवावी लागेल. हा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे", असं चित्रे म्हणाले. दरम्यान, ही बाब सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, अनेक नेटकरी ‘हुतात्मा’ वेब सिरीज ZEE5 वरून हटवण्यामागचे कारण काय? असा सवाल उपस्थित करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
Marathi Psycho Thriller Movie: सुखी संसार, अचानक विचित्र वागणारी पत्नी अन् एका अनोळखी महिलेचं अस्तित्व; OTT वरचा हा क्लासिक सायकॉलॉजिकल थ्रिलर चुकवू नका
सुखी संसार, अचानक विचित्र वागणारी पत्नी अन् एका अनोळखी महिलेचं अस्तित्व; OTT वरचा हा क्लासिक सायकॉलॉजिकल थ्रिलर चुकवू नका
Govinda and Sunita Ahuja: '3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...
'3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Embed widget