ऋतिक रोशन चिमुकला असल्यापासून 'डान्स मास्टर', लहान असतानाच सिनेमात जितेंद्रसोबत केला होता डान्स VIDEO
Hrithik Roshan dancing in childhood with Jeetendra : हृतिक रोशन हा निःसंशयपणे बॉलीवूडमधील सर्वोत्तम डान्सरपैकी एक आहे. त्याला नृत्याची आवड त्याच्या लहानपणापासूनच सुरू झाली. त्याचा लहानपणीचा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

Hrithik Roshan dancing in childhood with Jeetendra : अभिनेता ऋतिक रोशन हा बॉलिवूडमधील सर्वोत्तम डान्सर्सपैकी एक आहे, याबाबत कोणतीही शंका नाही. त्याला नृत्याची आवड लहानपणापासूनच होती, आणि त्याचा एक जुना व्हिडीओ याचा पुरावा देतो. 'अपना बना लो' या चित्रपटातील ‘मैं हूं दीवाना’ या गाण्यात त्यावेळी चिमुकला असलेला ऋतिक रोशन अभिनेता जितेंद्रसोबत नाचताना दिसतोय आणि हा थ्रोबॅक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत साधारण 6-7 वर्षांचा लहान ऋतिक जितेंद्र आणि इतरांसोबत नाचताना दिसतोय. व्हिडीओ सोशल मीडियावर येताच, चाहत्यांनी छोट्या ऋतिकच्या डान्स स्टेप्सवर कौतुकाचा वर्षाव केला. एका युझरने कमेंटमध्ये लिहिलं, "कोणता चित्रपट आहे हे? मजा आली छोटूला पाहून!", तर दुसऱ्याने लिहिलं, "बचपन से ही ब्रो की बॉडी डान्स मटेरियल थी!" बाकी चाहत्यांनी लव रिअॅक्ट वाले इमोजी कमेंट्समध्ये शेअर केले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ऋषी कपूर अन् डिंपल कपाडियाचा 'तो' इंटिमेट सीन पाहाण्यासाठी थिएटरमध्ये तोबा गर्दी व्हायची
























