एक्स्प्लोर

Pune Accident : 'आता निबंधात कमी मार्क्स मिळाले म्हणून तुरुंगात टाकायचा कायदा आणा', पुण्यातील पोर्शे अपघातावर मराठी अभिनेत्याची पोस्ट

Marathi actor post on Pune Porshe Accident : सध्या पुण्यासह राज्यभरात पोर्शे अपघाताची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच आता यावर एका मराठी अभिनेत्याने पोस्ट केली आहे.

Marathi actor post on Pune Porshe Accident :  रविवारची पहाट ही पुणेकरांसाठी (Pun Porshe Car Accident) हादरवून सोडणारी ठरली. पुण्यातील कल्याणीनगर भागात एक अपघात घडला आणि दोन तरुण इंजिनीअर्सचा यामध्ये दुर्दैवी अंत झाला. पोर्शे कारमुळे झालेल्या या अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. दरम्यान या घटनेनंतर सामान्य जनेतूनमध्ये याबद्दल तीव्र रोष देखील व्यक्त केला जातोय. याचं मुख्य कारण म्हणजे ही भरधाव वेगात ही कार चालवणारा एक धनिकपुत्र असून त्याचं नाव वेदांत अग्रवाल असं आहे. वेदांत हा मध्यरात्री पिऊन वेगाने गाडी चालवत होता. दरम्यान वेदांत हा अल्पवयीन असून त्याला अपघातानंतर अवघ्या काही तासांतच जामीन मिळाला. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली. 

विशेष म्हणजे यामध्ये काही अटी शर्तींवर जामीन देण्यात आला आहे. त्या अटी शर्तींवरही महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.  वेदांत अग्रवालला पंधरा दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबलसोबत चौकात उभे राहून वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे. वेदांत अग्रवाल मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावे लागणार आहेत.वेदांत अग्रवाल भविष्यात अपघात झाल्याचे दिसल्यास त्याला अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल. तसेच पुणे पोलिसांनी त्याला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा दिली आहे. यावर हृषिकेश जोशीने एक मार्मिक पोस्ट केली आहे. सध्या सोशल मीडियावर या पोस्टची बरीच चर्चा सुरु आहे. 

हृषिकेशची पोस्ट नेमकी काय?

हृषिकेशने त्याच्या फेसबुकवरुन ही पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्याने म्हटलं की, मग आता निबंधात कमी मार्क्स मिळाले म्हणून तुरुंगात घालायचा कायदा तरी आणा..., अशी मार्मिक पोस्ट हृषिकेशने केली आहे. त्यामुळे आता कलाकार देखील या घटनेवर भाष्य करत असल्याचं पाहायला मिळतंय. या अपघातानानंतर सोशल मीडियावरचं वातावरणही चांगलच तापलं असून अनेकजण याविषयीचा रोष सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. 

नेमकं काय घडले?

 वेदांत  शनिवारी रात्री मित्रांसोबत graduation party करण्यासाठी गेला होता.  पार्टीला जाताना वडिलांची आलीशान पॉर्शे कार घेऊन तो गेला.पार्टी संपवून वेदांत ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि ड्रायव्हरला शेजारी बसवले. त्याचे दोन मित्र देखील गाडीत मागे बसलेले होते. दारूच्या नशेत वेदांतने गाडीचा स्पीड वाढवला , ट्रम्प टॉवर समोर आल्यानंतर त्याचा  कंट्रोल सुटला आणि  त्याने समोरच्या पल्सरला धडक दिली. त्यांनंतर एका स्वीफ्ट कारला धडक दिली. कोट्यवधी रुपये किमतीच्या  कारनं आणि कारचालकाच्या बेदरकारपणानं दोघांचा जीव घेतला. पुण्यातल्या ब्रह्मा कॉर्प या नामांकित बिल्डरचा तो मुलगा आहे.  पुण्यातल्या रस्त्यावर तो मध्यरात्री भरधाव वेगात गाडी चालवत होता. ही धडक एवढी जोरदार होती की या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा  असे दोघेही  आयटी अभियंते होते.

ही बातमी वाचा : 

Pune Porshe Accident News: 200 KMPH वेगाने धावणारी पोर्शे कार, बाईकवरील तरुणाच्या बरगड्यांचा चुरा, प्रत्यक्षदर्शीने सांगितली पुण्यातील अपघाताची आँखो देखी कहाणी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इकडं शिल्पा केळुसकरांनी एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला, निवडणूक आयोगानं सुद्धा ग्राह्य धरला; आता हायकोर्टाचा सुद्धा सुनावणीस नकार!
इकडं शिल्पा केळुसकरांनी एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला, निवडणूक आयोगानं सुद्धा ग्राह्य धरला; आता हायकोर्टाचा सुद्धा सुनावणीस नकार!
भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; 'बिनविरोध'वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; 'बिनविरोध'वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
मोठी बातमी! मला चक्कर येतेय, नारायण राणेंना भोवळ, थांबवलं भाषण; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत
मोठी बातमी! मला चक्कर येतेय, नारायण राणेंना भोवळ, थांबवलं भाषण; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत
Donald Trump on India: अमेरिकेची धमकी, रशियाकडून भारताची तेल आयातीत घट; ट्रम्प म्हणाले, 'मोदींनी मला खूश करण्यासाठी हे केलं, त्यांना माहित होतं मी नाराज आहे'
अमेरिकेची धमकी, रशियाकडून भारताची तेल आयातीत घट; ट्रम्प म्हणाले, 'मोदींनी मला खूश करण्यासाठी हे केलं, त्यांना माहित होतं मी नाराज आहे'

व्हिडीओ

Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा
Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इकडं शिल्पा केळुसकरांनी एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला, निवडणूक आयोगानं सुद्धा ग्राह्य धरला; आता हायकोर्टाचा सुद्धा सुनावणीस नकार!
इकडं शिल्पा केळुसकरांनी एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला, निवडणूक आयोगानं सुद्धा ग्राह्य धरला; आता हायकोर्टाचा सुद्धा सुनावणीस नकार!
भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; 'बिनविरोध'वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; 'बिनविरोध'वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
मोठी बातमी! मला चक्कर येतेय, नारायण राणेंना भोवळ, थांबवलं भाषण; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत
मोठी बातमी! मला चक्कर येतेय, नारायण राणेंना भोवळ, थांबवलं भाषण; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत
Donald Trump on India: अमेरिकेची धमकी, रशियाकडून भारताची तेल आयातीत घट; ट्रम्प म्हणाले, 'मोदींनी मला खूश करण्यासाठी हे केलं, त्यांना माहित होतं मी नाराज आहे'
अमेरिकेची धमकी, रशियाकडून भारताची तेल आयातीत घट; ट्रम्प म्हणाले, 'मोदींनी मला खूश करण्यासाठी हे केलं, त्यांना माहित होतं मी नाराज आहे'
BMC Election 2026: नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
Airoli-Katai Naka Freeway: नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
Umar Khalid: 'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल
Embed widget