Housefull 5 Star Cast Fees: 225 कोटींच्या फिल्मसाठी अक्षय-रितेशनं घेतलं मोठ्ठं मानधन; अभिषेक-नाना पाटेकरांनी किती पैसे घेतले?
Housefull 5 Star Cast Fees: 'हाऊसफुल 5' मध्ये कलाकारांची मादियाळी पाहायला मिळतेय. या मल्टीस्टारर सिनेमात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, जेमी लिव्हर ते दिनो मोरिया असे अनेक अभिनेते एकाच स्क्रिनवर दिसले आहेत.

Housefull 5 Star Cast Fees: 2025 ची सर्वात मोठी कॉमेडी-फ्रँचायझी आणि बहुप्रतिक्षित चित्रपट 'हाऊसफुल 5' (Housefull 5) थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला आहे. 6 जून 2025 रोजी मोठ्या पडद्यावर आलेला हा चित्रपट प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करतोच आहे आणि भरपूर पैसेही कमावत आहे. 'हाऊसफुल 5' हा बॉलिवूडमधील सर्वात महागड्या कॉमेडी सिनेमांपैकी एक. तगडी स्टारकास्ट असलेला मल्टीस्टारर सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे.
'हाऊसफुल 5' मध्ये कलाकारांची मादियाळी पाहायला मिळतेय. या मल्टीस्टारर सिनेमात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, जॉनी लिव्हर ते दिनो मोरिया असे अनेक अभिनेते एकाच स्क्रिनवर दिसले आहेत. तसेच, जॅकलिन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, सोनम बाजवा, चित्रांगदा सिन्हा आणि सौंदर्या शर्मा सारख्या अभिनेत्रीही सिनेमात आहे. एकंदरीतच कॉमेडी-थ्रीलरचा फुल्ल पॅकेज्ड सिनेमा आहे.
'हाऊसफुल 5'साठी कोणी किती फी घेतली?
'हाऊसफुल 5'साठी सर्व स्टार्सना कोट्यवधींची फी देण्यात आली आहे. 'हाऊसफुल 5'साठी सर्वाधिक रक्कम आकारणाऱ्या यादीत अक्षय कुमारचं नाव आघाडीवर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्यानं फ्रँचायझीसाठी 60 ते 70 कोटी रुपयांची फी आकारली आहे. याशिवाय, 'हाऊसफुल 5' जेवढा नफा कमावेल, त्यातील काही भाग अक्षय कुमारला द्यावा लागणार आहे.
रितेश-अभिषेकनं किती पैसे घेतले?
रितेश देशमुख या फिल्मचा दुसरा महागडा अभिनेता आहे. त्यांनी 'हाऊसफुल 5'साठी 30 ते 35 कोटी रुपयांची फी घेतली आहे. तिसऱ्या क्रमांकावर संजय दत्त आहेत, ज्यांनी आपल्या रोलसाठी 12 ते 15 कोटी रुपये दिले आहेत. तसेच, अभिषेक बच्चनला 10 कोटी रुपये दिले गेले आहेत. तर, नाना पाटेकरांनी या सिनेमासाठी 3 ते 4 कोटी रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे.
अभिनेत्रींनीही घेतलंय मोठ्ठं मानधन
'हाऊसफुल 5'साठी अभिनेत्रीनं कोट्यवधींचं मानधन घेतलं आहे. जॅकलीन फर्नांडिसला या फिल्मसाठी 5 ते 6 कोटी रुपये देण्यात आले आहेत. पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवानंही मानधनाच्या बाबतीत तिला मागे टाकलं आहे. सोनमला 'हाऊसफुल 5'साठी 8 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
'हाऊसफुल 5'चं बजेट किती?
सॅकोनिल्कच्या मते, 'हाऊसफुल 5' चित्रपटाचं एकूण बजेट 225 कोटी रुपये आहे. जर त्यात प्रिंट आणि मार्केटिंगचा खर्च जोडला तर ते सुमारे 350 कोटी रुपये होईल. हा चित्रपट साजिद नाडियाडवालाच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे आणि तरुण मनसुखानी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























