Housefull 5 First Day Advance Booking: अॅडव्हान्स बुकिंग सुरु होताच 'हाऊसफुल 5'चा बोलबाला; काही तासांतच जमवला कोट्यवधींचा गल्ला, कमाई किती?
Housefull 5 First Day Advance Booking: 2025 ची मोस्ट अवेटेड कॉमेडी फ्रँचायजी 'हाऊसफुल 5' 6 जून रोजी रिलीज केली जाणार आहे. यापूर्वी फिल्मची अॅडव्हान्स बुकिंग सुरु झाली आहे.

Housefull 5 First Day Advance Booking: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actress) अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'हाऊसफुल 5' (Housefull 5) या कॉमेडी सिनेमाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरनं चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. 'हाऊसफुल 5'च्या गाण्यांनाही प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. या वर्षातील ही बहुप्रतिक्षित कॉमेडी फ्रँचायझी 6 जून 2025 रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. त्याआधीच चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे.
'हाऊसफुल 5' च्या रिलीजसाठी फक्त काही दिवस शिल्लक आहेत. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचं अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. सॅक्निल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यापासून 20 हजार 253 तिकिटं विकली गेली आहेत. यासह, 75.06 लाख रुपये कमावले आहेत आणि ब्लॉक सीट्ससह हा आकडा 3.57 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
दोन वर्जन्समध्ये रिलीज होणार 'हाऊसफुल 5'
'हाऊसफुल 5'चं बजेट कोईमोईच्या रिपोर्टनुसार, 375 कोटी रुपये आहे. 'हाउसफुल 5' ही एकमेव अशी फिल्म आहे, जी दोन वर्जन्समध्ये (5ए आणि 5बी) एकत्र रिलीज केली जाईल. 'हाउसफुल 5'च्या वेगवेगळ्या वर्जन्सचा क्लायमॅक्स वेगवेगळा असेल.
View this post on Instagram
फिल्म्सच्या 4 पार्ट्सची कमाई 500 कोटींहून अधिक
अक्षय कुमार स्टारर फिल्म 'हाऊसफुल 5' पूर्वी याचे 4 पार्ट्स रिलीज झाले, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः नोटांचा पाऊस पाडला.
- हाऊसफुल (2010): 74.4 कोटी
- हाऊसफुल 2 (2012): 114 कोटी
- हाऊसफुल 3 (2016): 107.7 कोटी
- हाऊसफुल 4 (2019): 206 कोटी
- एकूण : 502.01 कोटी
'हाऊसफुल 5'ची स्टार कास्ट
साजिद नाडियाडवालाच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनलेला 'हाऊसफुल 5'चं दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केलंय. फिल्ममध्ये अक्षय कुमार व्यतिरिक्त रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, फरदीन खान, श्रेयस तळपदे, नाना पाटेकर, जैकी श्रॉफ, डिनो मोरिया, चंकी पांडे, जॉनी लीवर आणि निकितिन धीर मुख्य भूमिकेत दिसतील. तसेच, जॅकलीन फर्नांडीज, नरगिस फाखरी, सोनम बाजवा, चित्रांगदा सिंह आणि सौंदर्या शर्मासारख्या अभिनेत्रीही 'हाऊसफुल 5'मध्ये दिसतील.
अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबाबत (Akshay Kumar Workfront) बोलायचं झालं तर, 'हाऊसफुल 5'नंतर अभिनेत्याकडे अनेक सिनेमे लाईनअपमध्ये आहेत. अभिनेत्याकडे 'भूत बंगला', 'कन्नप्पा', 'वेलकम टू द जंगल', 'जॉली एलएलबी 3' यांसारखे सिनेमे पाईपलाईनमध्ये आहेत.























