(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Johnny Depp-Amber Heard: जॉनी डेप-एम्बर हर्ड प्रकरण आता जगभरात पाहता येणार, मानहानीच्या खटल्यावर आधारित ‘हॉट टेक : द डेप/हर्ड ट्रायल’चा ट्रेलर रिलीज!
Johnny Depp-Amber Heard: ‘हॉट टेक: द डेप/हर्ड ट्रायल’मध्ये जॉनी डेपच्या भूमिकेत अभिनेता मार्क हापका आणि अभिनेत्री एम्बर हर्डच्या भूमिकेत मेगन डेव्हिस झळकणार आहेत.
Johnny Depp-Amber Heard: हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) आणि अभिनेत्री एम्बर हर्ड (Amber Heard) यांचा मानहानीचा खटला या वर्षातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला. अभिनेत्याने त्याची पूर्वाश्रमीची पत्नी एम्बरविरुद्ध दाखल केलेला खटला जिंकला आणि जगभरात या खटल्याची चर्चा झाली. आता या वादग्रस्त मानहानीच्या खटल्यावर आधारित एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सहा आठवड्यांच्या मीडिया ट्रायलनंतर जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्यातील हे प्रकरण सोडवण्यात आले. या खटल्यावर आधारित 'हॉट टेक: द डेप/हर्ड ट्रायल' नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
‘हॉट टेक: द डेप/हर्ड ट्रायल’मध्ये जॉनी डेपच्या भूमिकेत अभिनेता मार्क हापका आणि अभिनेत्री एम्बर हर्डच्या भूमिकेत मेगन डेव्हिस झळकणार आहेत. दरम्यान, अभिनेत्री मेलिसा मार्टी, मार्क हापका आणि मेगन डेव्हिस यांच्यासोबत डेपची वकील कॅमिली वास्क्वेझ म्हणून झळकणार आहे. अभिनेत्री मेरी कॅरीग एम्बर हर्डची वकील एलेन ब्रीडहॉफ्टच्या भूमिकेत झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
पाहा ट्रेलर :
या खटल्याच्या ट्रायलच्या वेळी वर्तमानपत्रात ज्या वाचायला मिळाल्या, या सर्व गोष्टी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये देखील पाहायला मिळतात. जॉनीला जेम्स फ्रँकोशी नेमकी काय समस्या होती? जॉनीच्या वकिलाने एम्बरवर बदनामीचा आरोप का केला, खटल्याचा निकाल येण्यापूर्वीच मीडियाने डेपला निर्दोष कसे गृहीत धरले होते, टिकटॉकवर युझर्स एम्बरच्या विरोधात कसे घोषणाबाजी करत हेओते, ते सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
हॉलिवूडकरांची मोठी फौज
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटात जॉनी आणि एम्बर हर्डचा 1 जूनपर्यंत चाललेला मानहानीचा खटला दाखवण्यात येणार आहे. ‘हॉट टेक’ हा फॉक्स एंटरटेनमेंटच्या मारविस्टा एंटरटेनमेंटचा चित्रपट आहे. हा चित्रपट गाय निकोलुची यांनी लिहिला आहे आणि सारा लोहमनने दिग्दर्शित केला आहे. त्याच वेळी, चित्रपटाची निर्मिती ब्रिटनी क्लेमन्स, अँजी डे, मारियान सी व्हॅंच, हॅना पिल्मर आणि फर्नांडो झे यांनी केली आहे. ऑटम फेडेरिकी आणि क्रिस्टोफर स्विजटिक निर्माते म्हणून या बॅनर खाली काम केले.
न्यायालाने दिला जॉनीच्या बाजूने निकाल
जॉनी डेप-एम्बर हर्ड मानहानीचा खटला चांगलाच गाजला होता. या खटल्यात, न्यायाधीशांनी जॉनी डेपच्या बाजूने निर्णय दिला. या खटल्यातील न्यायाधीशांनी एम्बर हर्डला या मानहानी खटल्यात दोषी ठरवले आणि निर्णय दिला की, जॉनी डेप यांनी आपली बदनामी झाल्याचे सिद्ध केले आहे. याव्यतिरिक्त, न्यायालयाने एम्बर हर्डला 10 दशलक्ष डॉलरची नुकसान भरपाई आणि 5 दशलक्ष डॉलरचे दंडात्मक नुकसान असे एकूण 15 दशलक्ष डॉलर भरण्याचे आदेश दिले होते.
हेही वाचा :