एक्स्प्लोर

Oscar 2026: ऑस्करपर्यंत पोहोचली 'होमबाउंड'! जान्हवी-ईशानच्या चित्रपटाची टॉप 15 मध्ये वर्णी, करण जोहर इमोशनल पोस्ट करुन म्हणाला...

Oscar2026: ऑस्कर 2026 साठी भारतीय चित्रपट ‘होमबाउंड’ची निवड झाली आहे. 98व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म कॅटेगरीसाठी या चित्रपटाला शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे.

Oscar 2026: दिग्दर्शक नीरज घायवान यांच्या ‘होमबाउंड’ला 98व्या अकॅडमी अवॉर्ड्सच्या बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म कॅटेगरीत शॉर्टलिस्ट करण्यात आलं आहे. या चित्रपटात ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. या बातमीनंतर फिल्ममेकर करण जोहरने भावनिक पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेसने मंगळवारी 12 कॅटेगरीमधील शॉर्टलिस्ट जाहीर केल्या. इंटरनॅशनल फीचर फिल्म कॅटेगरीमध्ये 15 चित्रपट शॉर्टलिस्ट झाले असून त्यापैकी अंतिम फेरीत केवळ 5 चित्रपटांची निवड केली जाणार आहे.

या चित्रपटांचा शॉर्टलिस्टमध्ये समावेश

‘होमबाउंड’सह अर्जेंटिनाची Belén, ब्राझीलची The Secret Agent, फ्रान्सची It Was Just an Accident, जर्मनीची Sound of Falling, इराकची The President’s Cake, जपानची Kokuho, जॉर्डनची All That’s Left of You, नॉर्वेची Sentimental Value, पॅलेस्टाईनची Palestine 36, दक्षिण कोरियाची No Other Choice, स्पेनची Sirât, स्वित्झर्लंडची Late Shift, तैवानची Left-Handed Girl आणि ट्युनिशियाची The Voice of Hind Rajab या चित्रपटांचा समावेश आहे.

 कधी जाहीर होणार अंतिम नामांकन?

ऑस्कर 2026 साठी अंतिम नामांकन 22 जानेवारी 2026 रोजी जाहीर होणार आहेत. यंदा ऑस्कर सोहळ्याचे सूत्रसंचालन कॉमेडियन कॉनन ओ’ब्रायन करणार असून 15 मार्च 2026 रोजी पुरस्कार सोहळा होणार आहे.

करण जोहरची भावनिक प्रतिक्रिया

चित्रपटाचा निर्माता करण जोहरने ‘होमबाउंड’च्या शॉर्टलिस्टिंगवर आनंद व्यक्त करत instagram वर प्रतिक्रिया दिलीय. तो म्हणाला, ‘होमबाउंड’ची जर्नी किती अभिमानाची आणि आनंदाची आहे, हे शब्दांत सांगणं कठीण आहे. आमच्या फिल्मोग्राफीचा भाग म्हणून या चित्रपटाचा आम्हाला अभिमान आहे. नीरज, आमची स्वप्नं सत्यात उतरवल्याबद्दल धन्यवाद. कान्सपासून ऑस्कर शॉर्टलिस्टपर्यंतचा हा प्रवास अद्भुत होता. संपूर्ण कास्टसाठी प्रेम. ‘होमबाउंड’ नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे.”

View this post on Instagram
 
याचवेळी धर्मा मूव्हीजने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं,‘होमबाउंड’ बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म कॅटेगरीसाठी शॉर्टलिस्ट झाली आहे. जगभरातून मिळणाऱ्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी आम्ही आभारी आहोत.”भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही मोठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

काय आहे होमबाउंडचे कथानक?

नीरज घायवान दिग्दर्शित आणि सध्या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत असलेला होमबाउंड’ हा चित्रपट 2020 मध्ये न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखावर आधारित आहे. हा लेख पत्रकार आणि TIMEचे संपादक बशरत पीर यांनी लिहिला होता. या लेखात भारतातील कोविड लॉकडाऊनदरम्यान घडलेला एक हादरवून टाकणारा क्षण टिपण्यात आला होता.

या लेखात मोहम्मद सैयुब आणि अमृत कुमार या दोन बालमित्रांच्या आयुष्याची कहाणी मांडण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळात आपल्या देवरी गावाकडे परतताना त्यांचा प्रवास चर्चेचा विषय ठरला. महामार्गाच्या कडेला आजारी, तापाने फणफणलेला आणि पाण्याअभावी अशक्त झालेल्या मित्राला दुसरा मित्र कुशीत धरून बसलेला दाखवणारा एक फोटो व्हायरल झाला आणि या दोघांची कहाणी संपूर्ण देशासमोर आली.

.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का; स्वर्गीय राजीव सातवांच्या आमदार प्रज्ञा सातवांचा भाजप प्रवेश ठरला!
भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का; स्वर्गीय राजीव सातवांच्या आमदार प्रज्ञा सातवांचा भाजप प्रवेश ठरला!
Maharashtra Local Body Election: महापालिकेसह कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह 'या' 14 जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडणार? नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता
महापालिकेसह कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह 'या' 14 जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडणार? नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता
Buldhana : पोक्सोसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शिक्षिकेला वर्षभर फुकटचा पगार; गटशिक्षण अधिकाऱ्याचे स्वयंघोषित नियम, बुलढाण्यात जनतेच्या पैशांची उधळपट्टी
पोक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शिक्षिकेला वर्षभर फुकटचा पगार; गटशिक्षण अधिकाऱ्याचे स्वयंघोषित नियम, बुलढाण्यात जनतेच्या पैशांची सर्रास उधळपट्टी
Zaira Wasim: 'बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माफी मागावी...', 'त्या' व्हिडीओवर दंगल गर्ल संतापली, थेट पोस्ट करुन म्हणाली...
'बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माफी मागावी...', 'त्या' व्हिडीओवर दंगल गर्ल संतापली, थेट पोस्ट करुन म्हणाली...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का; स्वर्गीय राजीव सातवांच्या आमदार प्रज्ञा सातवांचा भाजप प्रवेश ठरला!
भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का; स्वर्गीय राजीव सातवांच्या आमदार प्रज्ञा सातवांचा भाजप प्रवेश ठरला!
Maharashtra Local Body Election: महापालिकेसह कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह 'या' 14 जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडणार? नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता
महापालिकेसह कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह 'या' 14 जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडणार? नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता
Buldhana : पोक्सोसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शिक्षिकेला वर्षभर फुकटचा पगार; गटशिक्षण अधिकाऱ्याचे स्वयंघोषित नियम, बुलढाण्यात जनतेच्या पैशांची उधळपट्टी
पोक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शिक्षिकेला वर्षभर फुकटचा पगार; गटशिक्षण अधिकाऱ्याचे स्वयंघोषित नियम, बुलढाण्यात जनतेच्या पैशांची सर्रास उधळपट्टी
Zaira Wasim: 'बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माफी मागावी...', 'त्या' व्हिडीओवर दंगल गर्ल संतापली, थेट पोस्ट करुन म्हणाली...
'बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माफी मागावी...', 'त्या' व्हिडीओवर दंगल गर्ल संतापली, थेट पोस्ट करुन म्हणाली...
Yamuna Expressway Accident: आईच ती! गळ्यात काचेचा तुकडा घुसला, रक्तबंबाळ झाली तरी जळत्या बसची खिडकी फोडून दोन्ही मुलांना बाहेर काढलं अन्...; मातेचा आगीत होरपळून मृत्यू
आईच ती! गळ्यात काचेचा तुकडा घुसला, रक्तबंबाळ झाली तरी जळत्या बसची खिडकी फोडून दोन्ही मुलांना बाहेर काढलं अन्...; मातेचा आगीत होरपळून मृत्यू
Ambernath Crime News: अंबरनाथ गोळीबारानं हादरलं! भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर फायरिंग, मध्यरात्री दुचाकीवरून दोघे आले अन्....घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
अंबरनाथ गोळीबारानं हादरलं! भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर फायरिंग, मध्यरात्री दुचाकीवरून दोघे आले अन्....घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Uddhav Thackeray: 'उद्धव साहेबांविषयीचा माझ्या मनातील रिस्पेक्ट कायम राहील', पण... तेजस्वी घोसाळकरांनंतर आणखी एका शिवसैनिकाने ठाकरेंची साथ सोडली
उद्धव साहेबांविषयीचा माझ्या मनातील रिस्पेक्ट कायम राहील, पण... तेजस्वी घोसाळकरांनंतर आणखी एका शिवसैनिकाने ठाकरेंची साथ सोडली
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
Embed widget