एक्स्प्लोर

7 मॉडेलवर बलात्कार, 2 तरुणींचा खून, सिनेसृष्टीतील बडा चेहरा दोषी, होणार 128 वर्षांची शिक्षा?

या प्रोड्युसरने एकूण दोन मॉडेल्सचा खून खेल्याचा आरोप करण्यात आला होता. सोबतच त्याने एकूण सात महिलांवर बलात्कार केल्याचाही आरोप होता. हे सर्व आरोप आता सिद्ध झाले आहेत.

Hollywood Producer David Pearce : सिनेजगतात एकदा स्थान मिळाले की प्रसिद्धी आणि पैसा पायाशी लोळण घेतात. याच कारणामुळे अनेक तरुण-तरुणी जीवाचं रान करतात. हेच नव्या दमाचे कलाकार चित्रपटांत संधी मिळावी म्हणून शक्य असेल ते सर्व प्रयत्न करताना दिसतात. मात्र नाव कमवण्याच्या प्रयत्नांत कधीकधी त्यांच्याशी मोठा दगाफटकाही होतो. विशेष म्हणजे सिनेजगतात अगोदरपासून वावरत असलेल्या काही व्यक्ती अशा नवख्या तरुण-तरुणींचा फायदा घेण्यासाठी टपूनच बसलेले असतात. मोठा ब्रेक देण्याचे प्रलोभन देऊन अनेकजण तरुणींची फसवणूक करतात. हॉलिवुडमधील असाच एक हादरवून सोडणारा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात समील असलेल्या व्यक्तीला बलात्कार, खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलं असून त्याला तब्बल 128 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे. 

7 महिलांवर ड्रग्ज देऊन बलात्कार

हॉलिवुडमध्ये प्रोड्यूसर असलेल्या डेव्हिड पियर्स याला दोन मॉडेल्सचा खून तसेच सात मॉडेल्सच्या बलात्काराच्या आरोपात दोषी ठरवण्यात आलं आहे. लॉस एंजेलिसच्या न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. न्यायालयाने मॉडल क्रिस्टी जाईल्स आणि तिची मैत्रीण हिल्डा मार्सेला केब्रालेस अर्ज़ोला यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवलं आहे. सोबतच प्रोड्यूसर डेव्हिड पियर याच्यावर 7 महिलांचा बलात्कार केल्याचाही आरोप होता. यातही त्याला दोषी ठरवण्यात आलंय. डेव्हिड पियर्स याने 2021 साली अर्जोला आणि जाईल्स यांना ड्रग्जचा ओव्हरडोस देऊन त्यांची हत्या केली होती.  

नेमकं प्रकरण काय आहे?  

मीडिया रिपोर्ट्सनुसार 42 वर्षांच्या पियर्स याच्यावर क्रिस्टी (24) आणि हिल्डा (26) यांच्या हत्येचा आरोप होता. पियर्सची किस्टी आणि हिल्डा यांच्याशी एका पार्टीत भेट झाली होती. या भेटीत मी हॉलिवुडमधील मोठा प्रोड्युसर असल्याचं या तरुणींना सांगितलं. त्यानंतर दिशाभूल करून त्याने या तरुणींना अपार्टमेंटवर बोलावलं होतं. अपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर त्याने या तरुणींना ड्रग्जचा ओव्हरडोस दिला होता. परिणामी या तरुणी बेशुद्ध झाल्या होत्या. पुढे त्यांची हत्या करण्यात आली. हत्या करून पिटर्सने त्याचा रुममेट ब्रांट ऑसबॉर्न याच्या मदतीने तरुणींचे मृतदेह कारमध्ये ठेवून नंतर रस्त्याच्या बाजूला फेकून दिले होते. 

होऊ शकते 128 वर्षांची शिक्षा

हा प्रकार समोर आल्यानंतर 2021-22 साली अन्य सात महिला पुढे आल्या होत्या. या सात महिलांनी पियर्सने त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. हॉलिवुडच्या चित्रपटात काम देतो, असे प्रलोभन देत पियर्सने हा अत्याचार केला होता. या सात महिलांनादेखील अमली पदर्थ देऊन पियर्सने त्यांच्यावर अत्याचार केला होता. दरम्यान, याच प्रकरणात न्यायालयाने पियर्सला दोषी ठरवलंय. आता त्याला या गुन्ह्यांत साधारण 128 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.

हेही वाचा :

Udit Narayan Kissing Controversy: पापा ही बड़ा नाम करेंगे! उदित नारायण यांच्या 'त्या' Viral Video वर उर्फी जावेदची खोचक टिप्पणी

Comedian Pranit More Assaulted: स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण; वीर पहाडियानं तात्काळ मागितली माफी, म्हणाला, "मी स्वतः..."

Hemant Dhome Targets Rahul Solapurkar: स्वतःकडे लक्ष वेधू पाहणाऱ्या स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सुज्ञांनी लक्ष न दिलेले बरे; राहुल सोलापुरकरांवर हेमंत ढोमेची आगपाखड

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
Uday Samant : भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
BMC Election: पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?

व्हिडीओ

Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
Uday Samant : भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
BMC Election: पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
Shahajibapu Patil : काय ती झाडी, काय ते डोंगार... शहाजी बापूंची तोफ आता मुंबईत धडाडणार, पहिले टार्गेट संजय राऊत
काय ती झाडी, काय ते डोंगार... शहाजी बापूंची तोफ आता मुंबईत धडाडणार, पहिले टार्गेट संजय राऊत
Ajit Pawar Pimpri Chinchwad Election 2026: अजित पवारांना भाजपसोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, 'एकदा विचार करा'; रवींद्र चव्हाणांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दंड थोपटले
अजित पवारांना भाजपसोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, 'एकदा विचार करा'; रवींद्र चव्हाणांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दंड थोपटले
मोठी बातमी! भाजपच्या बिनविरोध पॅटर्नची मनसेकडून पोलखोल होणार; राज ठाकरेंचं पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ'
मोठी बातमी! भाजपच्या बिनविरोध पॅटर्नची मनसेकडून पोलखोल होणार; राज ठाकरेंचं पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ'
Akola Crime News: समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद
समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद
Embed widget