एक्स्प्लोर

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप दिग्दर्शकाच्या भूमिकेत; आगामी Modi चित्रपटावर सुरूये काम

Johnny Depp Announces Modi Biopic: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप Modi या आगामी बायोपिकचं दिग्दर्शन करणार आहे.

Hollywood Actor Johnny Depp Announces Modi Biopic: हॉलिवूड (Hollywood) अभिनेता जॉनी डेप (Hollywood Actor Johnny Depp) गेल्या वर्षी त्याची पूर्वाश्रमीची पत्नी अंबर हर्डसोबतच्या (Amber Heard) घटस्फोटाच्या खटल्यामुळे चर्चेत होता. या प्रकरणाचा मात्र त्याच्या कारकिर्दीवर खोलवर परिणाम झाला. त्याला फॅन्टास्टिक बीट्समधून (Fantastic Beats) काढून टाकण्यात आलं. पायरेट्स ऑफ द कॅरिबियनमध्येही (Pirates of The Caribbean) त्याच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. अशातच आता डेपच्या नवीन प्रोजेक्टबद्दल एक मोठं अपडेट समोर आलं आहे. पण डेप आपल्या नव्या प्रोजेक्टमध्ये कॅमेऱ्यासमोर काम करताना दिसणार नाही तर तो कॅमेऱ्यामागे असणार आहे. डेपनं 1997 मध्ये द ब्रेव्ह नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यानंतर थेट आता तो 'मोदी' (Modi) नावाचा चित्रपट बनवणार आहे.

आता तुम्हाला वाटेल जॉनी डेप पंतप्रधान मोदींवर चित्रपट करतोय. पण तसं नाही, जॉनी डेप दिग्दर्शित करत असलेला चित्रपट इटलीचे जगविख्यात चित्रकार आणि शिल्पकार अमेदेओ मोदीग्लियानी (Amedeo Modigliani) यांच्या आयुष्यावर आधारीत असणार आहे. जॉनी डेपचा चित्रपट मोदी हा बायोपिक असेल. 

डेडलाईनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, चित्रपटाची कथा 48 तासांत घडणार आहे. पॅरिसच्या रस्त्यांवर युद्धाच्या जखमा स्पष्टपणे दिसत आहेत. अशा वातावरणात एक कलाकार पोलिसांपासून पळ काढत आहे. पण प्रत्यक्षात तो पोलिसांपासून नाहीतर स्वतःपासून दूर पळत असतो. स्वतःची समृद्ध कारकीर्द संपवण्याच्या इच्छेनं. या प्रवासात त्याची काही कलाकारांशी आणि त्यांच्या अनुभवांशी भेट होते. पण त्याच्यावर सगळ्यात खोल ठसा उमटला तो एका आर्ट डीलरचा. त्या व्यक्तीला भेटल्यानंतर, Amedeo Modigliani नावाच्या या कलाकाराचा दृष्टीकोन कायमचा बदलतो.

त्या आर्ट डीलरची भूमिका ज्येष्ठ अभिनेते अल पचिनो साकारणार असल्याचं सांगण्यात येत आहे. जॉन विक 2 (John Wick 2) खलनायक रिकार्डो स्कामार्सिओ (Riccardo Scamarcio) अमेडीओच्या भूमिकेत दिसणार आहे. जॉनी डेपच्या या चित्रपटात आपल्या खऱ्या ओळखीच्या शोधात असलेल्या कलाकाराची कथा दाखवण्यात येणार आहे. जॉनीनं 1997 मध्ये दिग्दर्शक म्हणून शेवटचा चित्रपट केला होता. 'द ब्रेव्ह' नावाच्या या चित्रपटाला सरासरी रिव्ह्यू मिळाले. त्यानं आपल्या भावासोबत या चित्रपटाचं लेखन केलं होतं. मार्लन ब्रँडोच्या दिग्दर्शनाव्यतिरिक्त जॉनीनं या चित्रपटात कामही केलं आहे. त्याच्या नव्या चित्रपटाचा विषय रंजक आहे. तो कलाकार आणि त्याच्या आत चाललेला संघर्ष कसा चित्रित करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मोदी चित्रपटाचं शूटिंग या वर्षी सुरू होणार आहे. चित्रपटातील मुख्य कलाकार निश्चित करण्यात आले आहेत. बाकीच्या पात्रांची कास्टिंग अजून चालू आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget