एक्स्प्लोर

Hemant Dhome On Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीला पहिल्या मराठमोळ्या दिग्दर्शकाचा जाहीर पाठिंबा; मनातलं सगळं बोलून गेला, अपेक्षाही सांगितल्या!

Hemant Dhome On Cockroach Janata Party: मराठमोळा दिग्दर्शक हेमंत ढोमे यानंही या ट्रेंडचं कौतुक करत आपला पाठींबा दर्शवला आहे. तर, 'कॉकरोच जनता पार्टी'ला विरोध करणाऱ्यांना सुनावलं देखील आहे.  

Hemant Dhome On Cockroach Janata Party: गेल्या चार ते पाच दिवसांपासून 'कॉकरोच जनता पार्टी'नं (Cockroach Janata Party) सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. डिजिटल सटायर मुव्हमेट जेन झीमध्ये कमालीची ट्रेंडिंग आहे. 'कॉकरोच जनता पार्टी'चे इन्स्टाग्रामवर तब्बल एक कोटी 13 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले. विशेष म्हणजे इन्स्टावर भाजपचे (BJP) 87 लाख फॉलोअर्स आहेत. 'कॉकरोच जनता पार्टी'नं भाजपलाही मागे टाकलंय. अशातच आता ही पार्टी जोरदार ट्रेंड करत असून या पार्टीला तरुणाईचा मोठा पाठींबा मिळत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही या पार्टीचं समर्थन करत इन्स्यावर फॉलोही केलंय. मराठमोळा दिग्दर्शक हेमंत ढोमे यानंही या ट्रेंडचं कौतुक करत आपला पाठींबा दर्शवला आहे. तर, 'कॉकरोच जनता पार्टी'ला विरोध करणाऱ्यांना सुनावलं देखील आहे.  

दिग्दर्शक हेमंत ढोमे नेमकं काय म्हणाला? 

दिग्दर्शक हेमंत ढोमे यानं 'कॉकरोच जनता पार्टी'च्या इन्स्टाग्राम हँडलचा एक स्क्रिनशॉर्ट शेअर केलाय. त्यानं लिहिलंय की, "कॅाजपा'ला आत्ताच (राजकीय) विरोध करणाऱ्यांच्या बुद्धीमत्तेची किव येते… एककल्ली व्यवस्थेच्या विरोधात लोक एकत्र येऊ शकतात, प्रश्न विचारू शकतात ही आशा सोडलेल्या समाजात जर एक आशेचा किरण दिसतो आहे, तर ही सुदृढ लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाची आणि सकारात्मक अशी बाब आहे. ज्याचं स्वागत माझ्या सारख्या अनेक मंडळींनी करायलाच हवं!"

"या आंदोलनाचं पुढे काय होईल हा भाग वेगळा कारण आपल्याकडे बहुतांशी राजकीय आंदोलने पुढे कोणत्या वळणावर गेली हे आपण सगळेच जाणतोच! पण लोकशाहीत पर्याय महत्वाचा आहे! आणि या मंडळींकडून प्रश्न विचारले जात आहेत आणि त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं!...", असं हेमंत ढोमे म्हणाला आहे. 

हेमंत ढोमे म्हणालाय की, "अभिजीत दिपके आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक! आपल्याकडून खूप वेगळ्या अपेक्षा आहेत, आपण जबाबदारीने त्या पुर्ण करण्याचा प्रयत्न कराल ही प्रांजळ अपेक्षा!"

दरम्यान, देशातील वाढती बेरोजगारी, परीक्षांमधील घोटाळे आणि तरुणांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी मे 2026 मध्ये या उपरोधिक चळवळीची सुरुवात करण्यात आली. 15 मे 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बनावट पदव्या घेणाऱ्या आणि चुकीच्या मार्गानं यंत्रणेत शिरणाऱ्या काही व्यक्तींबद्दल बोलताना 'कॉकरोच' (झुरळ) असा शब्दप्रयोग केला होता. या वक्तव्याचा निषेध म्हणून आणि बेरोजगार तरुणांचा आवाज उठवण्यासाठी 16 मे 2026 रोजी या उपरोधिक पक्षाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रातील अभिजित दिपके या तरुणानं या पक्षाची स्थापना केलीय. पक्षानं स्वतःला सेक्युलर, सोशलिस्ट, डेमोक्रॅटिक आणि लेझी (आळशी) असं घोषित केलंय. 

Cockroach Janata Party चे सेलिब्रिटी फॉलोअर्स 

Cockroach Janata Party च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजनं सुरुवातीला 30 लाख फॉलोअर्स मिळवले होते. मात्र, गेल्या सहा दिवसांत याची लोकप्रियता वणव्यासारखी वेगाने पसरली आहे. या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करणाऱ्या नामांकित सेलिब्रिटींमध्ये अभिनेत्री दिया मिर्झा, चित्रपट निर्माता अनुराग कश्यप, अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा, ईशा गुप्ता, 'बिग बॉस' फेम उमर रियाझ, अभिनेता अभिषेक निगम, उर्फी जावेद, नगमा मिराजकर, इन्फ्लुएन्सर पूरव झा, टीव्ही अभिनेत्री शफाक नाझ आणि शीझान खान, तसेच इतर अनेक दूरचित्रवाणी कलाकारांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा आणि पंजाबी गायिका-अभिनेत्री हिमांशी खुराणा हे देखील या सोशल मीडिया ट्रेंडमध्ये सहभागी झाले आहेत. 

पाहा व्हिडीओ : 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Cockroach Janata Party Follow By Bollywood Celebrity: कॉकरोच जनता पार्टीची सेलिब्रिटींनाही भूरळ; फॉलोअर्सच्या यादीत बड्या नट-नट्यांची नावं, कोण-कोण करतंय फॉलो?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
Advertisement

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Embed widget