Hema Malini Emotional Post On Dharmendra Death: 'माझं दुःख शब्दांत सांगू नाही शकत...', धर्मेंद्रंच्या आठवणीत हेमा मालिनी व्याकूळ, पहिल्यांदात जाहीरपणे म्हणाल्या...
Hema Malini Emotional Post On Dharmendra Death: धर्मेंद्र यांच्या आठवणीनं व्याकूळ झालेल्या हेमा मालिनी यांनी त्यांच्यासोबतच खूप फोटो शेअर केले आहेत. तसेच, एक इमोशनल पोस्टही लिहिली आहे.

Hema Malini Emotional Post On Dharmendra Death: सिनेसृष्टीवर तब्बल सहा दशकं राज्य करणारा सुपरस्टार धर्मेंद्र (Dharmendra) यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. धरमजींच्या जाण्यानं अवघी इंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे. त्यांच्या देओल कुटुंबियांसोबतच चाहत्यांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशातच आता त्यांची दुसरी पत्नी बॉलिवूडची (Bollywood News) ड्रिम गर्ल हेमा मालिनी (Hema Malini) यांनी आपल्या दुःखाला वाट मोकळी करुन दिलीय. तसेच, त्यांनी धर्मेंद्रंच्या आठवणींना उजाळा दिला आहे. धर्मेंद्र यांच्या आठवणीनं व्याकूळ झालेल्या हेमा मालिनी यांनी त्यांच्यासोबतच खूप फोटो शेअर केले आहेत. तसेच, एक इमोशनल पोस्टही लिहिली आहे.
Dharam ji❤️
— Hema Malini (@dreamgirlhema) November 27, 2025
He was many things to me. Loving Husband, adoring Father of our two girls, Esha & Ahaana, Friend, Philosopher, Guide, Poet, my ‘go to’ person in all times of need - in fact, he was everything to me! And always has been through good times and bad. He endeared himself… pic.twitter.com/WVyncqlxK5
धर्मेंद्रंच्या निधनानंतर हेमा मालिनींची फर्स्ट रिअॅक्शन
हेमा मालिनी यांनी धरमजींच्या आठवणींना उजाळा देत एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिलंय की, "धरमजी, माझ्यासाठी खूप काही होते... एक प्रेमळ पती, आमच्या दोन्ही मुली, ईशा आणि अहानाचे प्रेमळ वडील, एक मित्र, फिलॉसफर, एक मार्गदर्शक, कवी, गरजेच्या प्रत्येक क्षणी माझ्यासाठी उपस्थित राहणारा - खरं तर, ते माझ्यासाठी सर्वकाही होते आणि ते नेहमीच माझ्या अडचणीच्या काळात आणि वाईट काळात एकत्र होते. त्यांच्या सहज आणि मैत्रीपूर्ण वागण्यानं, त्यांनी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना आपलंस करुन घेतलेलं, नेहमीच ते सर्वांना प्रेम आणि आदरानं वागवायचे..."
I know it is a surfeit of photos but these have not been published and my emotions are unfolding as I see these❤️ pic.twitter.com/OXPcVkyDj0
— Hema Malini (@dreamgirlhema) November 27, 2025
"एक पब्लिक पर्सनॅलिटी म्हणून, त्यांची प्रतिभा, लोकप्रियता असूनही त्यांची विनम्रता आणि त्यांच्या यूनिवर्सल अपील यामुळे ते सर्व दिग्गजांमध्ये एक यूनिक आइकॉन बनले. चित्रपट उद्योगातील त्यांची शाश्वत कीर्ती आणि यश नेहमीच राहील. माझं वैयक्तिक नुकसान शब्दांत वर्णन करता येणार नाही आणि त्यामुळे निर्माण झालेली पोकळी माझ्यासोबत आयुष्यभर राहील. वर्षानुवर्ष एकत्र राहिल्यानंतर, माझ्याकडे अनेक खास क्षण पुन्हा जगण्यासाठी अनेक आठवणी शिल्लक आहेत..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























