...हे तर फार दुर्दैवी, हाऊसफुल असला तरी मराठी सिनेमांना थियटर मिळत नसल्यानं तेजश्री प्रधाननं व्यक्त केली खंत!
सध्या हॅशटॅग तदैव लग्नम् हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद लाभत आहेत. मात्र अभिनेत्री तेजश्री प्रधानने चित्रपटाला सिनेमागृह दिले जात नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
मुंबई : अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) आणि अभिनेत्री तेजश्री प्रधानचा (Tejashree Pradhan) 'हॅशटॅग तदैव लग्नम्' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 20 डिसेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या सिनेमागृहात दाखवला जातोय. मात्र याच चित्रटातील मुख्य नायिका तेजसश्री प्रधानने महाराष्ट्रात मराठी सिनेमांना थियटर्स मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात मराठी सिनेमासाठी थियटर्स उपलब्ध नाहीत हे दुर्दैवी
तेजश्री प्रधानने इन्स्टाग्रावर एक स्टोरीच्या माध्यमातून तिची खदखद व्यक्त केली आहे. तिने महाराष्ट्रात मराठी सिनेमाला पुरेसे सिनेमागृहं दिली जात नसल्याचं म्हटलंय. "पुणे आणि मुंबईमध्ये (मिळालेल्या काही मोजक्या सिनेमागृहांमध्ये) हॅशटॅग तदैव लग्नम् हा आमचा चित्रपट हाऊसफुल चालू आहे. पण महाराष्ट्रात मराठी सिनेमासाठी थियटर्स उपलब्ध नाहीत हे दुर्दैवी आहे," असे परखड मत व्यक्त करत तिने आपली खदखद व्यक्त केलीआहे. विशेष म्हणजे तिने पुढच्या काही इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये शो हाऊसफुल झालेले स्क्रिनशॉट्स टाकले आहेत.
चित्रपटात दिग्गज कलाकार
हॅशटॅग तदैव लग्नम् या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद दिलीप गोखले यांनी केले आहे. तर तेजश्री प्रधान, सुबोध भावे, प्रदीव वेलणकर, मानसी मागीकर, शर्मिष्ठा राऊत यासारखे दिग्गद कलाकार या चित्रपटात आहेत. या चित्रपटात लग्न करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या तरुण-तरुणींची गोष्ट सांगितलेली आहे. लग्न करतानाच्या अटी, त्या अटी जोडीदाराकडून पूर्ण होतील का? याची भीती, आशा-अपेक्षांचं ओझं अशा सर्वच अंगांनी या चित्रपटात भाष्य करण्यात आलंय.
चित्रपटाला प्रेक्षकांची पसंदी
दरम्यान, प्रेक्षकांनी या चित्रपटाच्या कलाकारांची पाठ थोपटली आहे. सर्वांची उत्तम अभिनय केला असून या चित्रपटाची कथादेखील चांगली आहे, असा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत. याआधीही मराठी सिनेमाला सिनेमागृह मिळत नाहीत. एखाद्या चित्रपटासाठी संपूर्ण टीम कठोर मेहनत घेत असते पण सिनेमागृहच मिळत नाहीत, अशी खंत अनेक कलाकार, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी बोलून दाखवलेली आहे. असे असताना आता मराठी चित्रपटांना सिनेमागृह मिळत नसल्याची खंत तेजश्री प्रधान यांनी बोलून दाखवल्यामुळे आता नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
हेही वाचा :
श्रद्धा कपूर वरुण धवनच्या आकंठ प्रेमात, प्रपोजही केलं पण..., नकार दिल्यावर केलं होतं भयंकर कृत्य!
पापाराझी दिसताच राहाकडून फ्लाइंग किस, चिमुरड्या परीच्या फोटोंची चर्चा, रणबीर-आलियालाही फुटलं हसू!