(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Randeep Hooda Birthday : शून्यापासून सुरु केला प्रवास, आज आहे अभिनयाचा बादशाहा; जाणून घ्या रणदीपच्या सर्वोत्तम सिनेमांबद्दल
बॉलिवूडचा उमदा अभिनेता रणदीप हुडा (Randeep Hooda) आज (20 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडा कमी चित्रपटांमध्ये दिसत असला तरी त्याच्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली.
Randeep Hooda Birthday : बॉलिवूडचा उमदा अभिनेता रणदीप हुडा (Randeep Hooda) आज (20 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. रणदीप हुडा याचा जन्म 20 ऑगस्ट 1976 रोजी हरियाणामध्ये झाला. बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडा कमी चित्रपटांमध्ये दिसत असला तरी त्याच्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. 'सरबजीत' असो वा 'लव्ह आज कल' किंवा 'लाल रंग' आणि 'हायवे', रणदीप हुड्डाने प्रत्येक चित्रपटात अभिनयाने वेगळी छाप सोडली आहे. रणवीर हुड्डा आज बाॅलीवूडमधील सर्वात उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. मूळचा हरियाणाचा असलेला रणदीप हुड्डा याने केवळ आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. रणदीप हुडाने 2001 मध्ये ‘मान्सून वेडिंग’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. एकापेक्षा एक हिट चित्रपट देत त्याने प्रेक्षकांना अक्षर: वेड लावले आहे. रणदीपच्या काही खास चित्रपटांवर नजर टाकूया.
सरबजीत (Sarabjit)
बॉलीवूडचा ब्लॉकबस्टर 'सरबजीत' 2016 मध्ये रिलीज झाला तेव्हा त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट सुपर-डुपर हिट ठरला, प्रेक्षक चित्रपटाची कथा, कथानक आणि भावनांशी जोडू शकले. या सिनेमासाठी रणदीपने 28 दिवसात 18 किलो वजन कमी केले होते. या चित्रपटातील रणदीपच्या उत्कृष्ट अभिनय आणि समर्पणाबद्दल नेहमीच कौतुक होते.
हाइवे (Highway)
'हायवे' हा आलिया भट्टचा दुसरा सिनेमा असल्याने याही वेळी सर्वांचे लक्ष तिच्याकडे होते. पण रणदीपही काही कमी नव्हता. त्याने यामध्ये साकारलेली 'महावीर' ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहीली आहे.
रंग रसिया (Rang Rasiya)
19 शतकातील लोकप्रिय भारतीय चित्रकार, राजा रविवर्मा यांच्या जीवनावर आधारित, 'रंग रसिया' या चित्रपटात प्रमुख भूमिकेत रणदीप होता. या अभिनयाने देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
एक्सट्रॅक्शन (Extraction)
सॅम हर्ग्रेव्ह दिग्दर्शित, 'एक्सट्रॅक्शन' हा चित्रपट रणदीप हुडासाठी एक मोठी होती. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ख्रिस हेम्सवर्थ या दिग्गज कलाकारासोबत रणदीप या चित्रपटात काम केले.
इन्स्पेक्टर अविनाश (Inspector Avinash)
ही अॅक्शन ड्रामा सीरिज आहे. वेब सीरिजमध्ये तो एसटीएफच्या एका अधिकाऱ्याची भूमिका साकारतांना दिसला होता. इन्स्पेक्टर अविनाशच्या माध्यमातुन रणदीप हुड्डाने सर्वांची मने जिंकली आहेत. या सिरिजसाठी त्याने खुप मेहनत घेतली.
इतर महत्वाच्या बातम्या :