Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
या दौऱ्यानंतर त्याने त्याच्या सोशल मीडियावर केलेली पोस्ट ही सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्याच्या पोस्टवर अनेकांनी त्याचं कौतुक केलंय.

Bollywood Actor in Jalna School: बॉलीवूडमध्ये अनेक कलाकार, अभिनयाव्यतिरिक्त सामाजिक उपक्रमांमध्ये आघाडीने काम करताना दिसतात. सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्याची चर्चा रंगली आहे, या अभिनेत्याने जालन्यातील शाळेला दिलेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. सिनेमांमध्ये दिसणारा नट जालन्यात कशाला आणि का येईल? असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, अभिनेत्याला पाहून जालन्यातील शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. या अभिनेत्याचं नाव आहे आयुष्यमान खुराणा.
आयुषमान खुराणा पोहोचला जालन्याच्या शाळेत अन्..
आयुष्मान सध्या युनिसेफ इंडियाचा ब्रँड अँबेसिडर आहे.भारतभरातील विद्यार्थ्यांच्या समस्या तो अनेकदा समजून घेण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान आयुष्मान अशाच एका कामासाठी जालना दौऱ्यावर गेला होता.या दौऱ्यात एका लहान मुलीने त्याला एक पत्र दिलं. रस्त्यावरील असुरक्षिततेमुळे मुलींना शाळा सोडावी लागते अशा अर्थाचं हे पत्र पाहून जिल्ह्यातील कलेक्टर यांना भेटून बोलण्याचा आश्वासन त्याने दिलं.. या दौऱ्यानंतर त्याने त्याच्या सोशल मीडियावर केलेली पोस्ट ही सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्याच्या पोस्टवर अनेकांनी त्याचं कौतुक केलंय.
View this post on Instagram
आयुष्मानने या दौऱ्यावर असताना एक पोस्ट केली. त्यात तो म्हणाला, भारतातले 70% लोक गावात राहतात. जर आपली गाव सुधारले नाही तर आपला देश पुढे कसा जाईल? जर गावातील मुलं अडचणीत आणि समस्यांनी त्रस्त असतील तर आपला देश अडचणीत आहे. हे खूप चांगलं पाऊल आहे.छोटी मुलं जागरूक असतील, शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं मांडत असतील तर मला वाटतं आपला देश प्रगती करतोय.
त्याचा कामाबद्दल सांगायचं झालं तर तो लवकरच सुरज पडजा त्या दिग्दर्शित 'ये प्रेम मोल लिया' या चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा शूटिंग पूर्ण झालं असून 27 नोव्हेंबर 2026 ला हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे. यादी आयुष्मानची भूमिका असलेला 'पती पत्नी और वो दो' चित्रपटही यावर्षीच रिलीज झालेला.





















