Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Mumbai Accident Kurla JCB fall down: कुर्ल्यात भीषण दुर्घटना, जेसीबीला उचलताना अवाढव्य क्रेन घरांवर कोसळली, 8 जण जखमी. एक भाग रेल्वेच्या ओव्हरहेड वायवरवर कोसळला

Mumbai Accident JCB fall down: मुंबईच्या कुर्ला परिसरात शुक्रवारी पहाटे एक भीषण दुर्घटना घडली. एका क्रेनच्या साहाय्याने जेसीबी उचलत असताना ही दुर्घटना घडली. क्रेनने जेसीबी मशीन (JCB Machine) हवेत उचलल्यानंतर, ती बऱ्याच उंचावर असताना अचानक क्रेन आणि जेसीबी दोन्ही खाली कोसळले. या अपघातात खाली उभे असणारे आठ ते दहा जण जखमी झाल्याची माहिती आहे. पहाटे 3 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अद्यापपर्यंत या दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी कोणाचाही मृत्यू झाल्याचे वृत्त नाही. (Mumbai Accident News)
प्राथमिक माहितीनुसार, कुर्ला आणि ट्रॉम्बे दरम्यान मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) एका प्रकल्पाचे काम सुरु आहे. यावेळी एक जेसीबी मशीन दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येत होती. त्यासाठी क्रेनने ही जेसीबी मशीन उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवली जात होती. त्यावेळी हा परिसर खाली करण्यात आला होता. मात्र, काहीजण या भागात हे सगळे मोबाईलवर शुट करत होते. क्रेनने जेसीबी हवेत बऱ्याच उंचीवर नेला होता तेव्हा अचानक क्रेन व जेसीबी दोन्ही खाली कोसळले. यानंतर घटनास्थळी जोरदार आवाज आला. कुरेशी नगर भागात ही दुर्घटना घडली. बिल्डिंगचे पाडकाम सुरु असताना ही क्रेन कोसळली. क्रेनचा एक भाग दोन घरांवर आणि नंतर रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर पडला. अपघातात एक कार आणि एका ऑटो-रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर मुंबई पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले, क्रेन हटवण्याचे प्रयत्न सुरु झाले होते. ही दुर्घटना घडली तेथून रेल्वेचा ट्रॅकही जवळच्याच अंतरावर आहे.
या भागातून मध्य रेल्वेच्या मालगाड्यांची ये-जा होते. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, कुर्ला आणि ट्रॉम्बे परिसरात घडलेल्या या दुर्घटनेत क्रेन रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर कोसळली. या ट्रॅकचा उपयोग मालगाड्यांसाठी होत असल्याने लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र, रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर कोसळलेली अवाढव्य क्रेन हटवण्याचे काम सुरु आहे. ही अवाढव्य क्रेन कोसळल्याने कुर्ला परिसरात स्थानिकांची प्रचंड मोठी गर्दी जमली होती. क्रेन ओव्हरहेड ज्या ओव्हरहेड वायरवर कोसळली होती, त्यामधून करंट पसरेल, अशी भीती स्थानिकांना वाटत होती. प्रशासनाने अद्याप या दुर्घटनेबाबत पुरेशी माहिती दिलेली नाही. मध्य रेल्वेकडून या दुर्घटनेत दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या दुर्घटनेत आठ ते दहा जण जखमी झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या सगळ्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
आणखी वाचा
Before You Go
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल





















