(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gulabi Sadi : 'तो फेमस व्हावा हेच माझं स्वप्न होतं', 'गुलाबी साडी' सह भावाच्या अनेक हिट गाण्यांना दिलं म्युझिक; संजू राठोडच्या भावाने सांगितला अनुभव
Gulabi Sadi : गुलाबी साडी गाणं हिट झाल्यानंतर संजू राठोड आणि गौरव राठोड यांनी त्यांचा अनुभव शेअर केला आहे.
Gulabi Sadi : गुलाबी साडी (Gulabi Sadi) या गाण्याची क्रेज सध्या जगभरात आहे. त्यातच या गाण्याच्या तालावर अनेकजण थिरकताना दिसले. इतकच नव्हे तर परदेशातही या गाण्याची हवा पाहायला मिळाली. दरम्यान संजू राठोडने या गाण्याविषयीचा त्याचा अनुभव एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितला होता. त्यानंतर गुलाबी साडी या गाण्याला त्याच्या भावाने म्हणजेच गौरव राठोडने संगीतबद्ध केलं आहे. त्याने देखील त्याचा अनुभव एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितला आहे.
संजूने त्याच्या गाण्यांच्या माध्यमातून खान्देशी संस्कृतीचं दर्शन घडवलं आहे. याविषयी देखील त्याने या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. गुलाबी साडी या गाण्यामुळे संजूला जगभरात प्रसिद्धी मिळाली. याआधी हे गाणं कसं लिहिलं याबाबत देखील संजूने भाष्य केलं होतं. संजू हा मुळचा जळगावचा राहणारा आहे. जसा प्रत्येकाचा प्रवास असतो, तसाच माझाही प्रवास असल्याचं यावेळी संजूने म्हटलं. तसेच इंजिनीअरिंगचं शिक्षण घेणारा संजूला संगीताचं बाळकडू हे घरातूनच मिळालं असल्याचं त्याने यावेळी म्हटलं आहे.
'तो फेमस व्हावा हेच माझं स्वप्न होतं'
संजू राठोडने त्याच्या स्वप्नांविषयी बोलताना म्हटलं होतं की, 'त्याला मराठी गाण्यांचे भारतभर कॉन्सर्ट्स करायचे आहेत. त्यानंतर आता गौरवला देखील त्याच्या स्वप्नांविषयी विचारलं असता, संजूला हे सगळं करुन देणं हेच माझं स्वप्न होतं', असं म्हटलं आहे. त्याच्या या उत्तराने राठोड ब्रदर्सच्या या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली असल्याचं पाहायला मिळतंय. पुढे संजूने म्हटलं की, आम्हाला खान्देशी म्युझिक भारताबाहेर वाजवायचं आहे.
गौरवने कुठे घतले म्युझिकचे धडे?
मी म्युझिक कुठेही शिकलो नाहीये किंवा मी कुठलाही कोर्स केलेला नाहीये. हे सगळं मी युट्युबवरुन शिकलोय. रिसर्च वैगरे केले आणि त्यानंतर मी माझं असं तयार केलं. खान्देशमध्ये खूप संगीत आहे. तिथल्या लोकांना मुळात संगीताची फार आवड आहे. खान्देशी गाणीही खूप व्हायरल होतात आणि ती लोकं तीच गाणी ऐकतात दुसरी कोणतीही गाणी ऐकत नाहीत. यावर संजूने म्हटलं की,सुरुवातीला मी त्याला सांगायचो की मला कशाप्रकारे संगीत हवंय. पण त्यानंतर मला कळालं की त्याच्या कामाची एक पद्धत आहे, त्यानुसार तो करतो, फक्त त्याला त्याचं कामात स्वातंत्र्य द्यायचं. त्याला गाण्याचं कंपोझिशन आवडलं तर ते तो 10 ते पंधरा मिनिटांतही तयार करतो.