Actress Detained in NEET CJP Protest: विद्यार्थी आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत भयंकर घडलं, पोलिसांनी खेचून पोलीस व्हॅनमध्ये नेलं, तरीही... VIDEO
Jigna Vyas Arrest Video CJP Protest: नीट विद्यार्थ्यांसाठीच्या आंदोलनात पोलिसांनी अभिनेत्री जिग्ना व्यास हिला ताब्यात घेतलं.

Jigna Vyas Arrest Video CJP Protest VIRAL: 20 जुलै रोजी संसद भवनाबाहेर झालेल्या आंदोलनानंतर नीट पेपर फुटी प्रकरणाचा मुद्दा (NEET Protest) अधिकच चिघळला. लाखोंच्या संख्येने आंदोलक मैदानात (Cockroach Janta Party) उतरले होते. केवळ दिल्लीतील जंतर - मंतर नसून, देशातील अनेक भागांत याचे पडसाद उमटले असल्याचं पाहायला मिळालं. बिहार, महाराष्ट्र तसेच अहमदाबाद येथेही आंदोलकांनी नीट पेपर फुटी प्रकरणाचा मु्द्दा उचलून धरला. अहमदाबाद येथील आंदोलनात सामान्यांसह गुजरातीमधील प्रसिद्ध अभिनेत्री जिग्ना व्यास देखील उपस्थित होती (Jigna Vyas). प्रदर्शनस्थळावरील वातावरण अधिक चिघळल्यानंतर तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलीस ताब्यात घेत असताना अभिनेत्रीने प्रसिद्ध महान गीतकार शंकर शैलेंद्र यांच्या 'तू ज़िंदा है तो ज़िंदगी की जीत में यकीन कर' (Entertainment) कविताच्या चार ओळी म्हटल्या.
अहमदाबाद येथील तरुणांनी नीट पेपर फुटी प्रकरण आणि शिक्षणविषयक मुद्द्यांवरुन आंदोलन छेडलं. आंदोलन अधिक चिघळल्यानंतर पोलिसांनी अनेक तरुणांना ताब्यात घेतलं. या आंदोलनात गुजरातीमधील प्रसिद्ध अभिनेत्री जिग्ना व्यास देखील उपस्थित होती. आंदोलनादरम्यान, इतर आंदोलकांसह पोलिसांनी अभिनेत्री जिग्ना व्यास हिला देखील ताब्यात घेतलं. अभिनेत्रीला खेचून पोलीस व्हॅनपर्यंत नेण्यात आलं.
अभिनेत्री जिग्ना व्यास हिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पोलिसांनी अभिनेत्रीला खेचून पोलीस व्हॅनपर्यंत नेलं. तसेच पोलिलांनी तिला ताब्यात घेतलं. दरम्यान, पोलीस ताब्यात घेत असताना अभिनेत्रीने प्रसिद्ध गीतकार शंकर शैलेंद्र यांच्या 'तू ज़िंदा है तो ज़िंदगी की जीत में यकीन कर' या कविताच्या चार ओळी म्हटल्या आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी देखील तिचं कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
तू ज़िन्दा है तो ज़िन्दगी की जीत में यकीन कर - शंकर शैलेंद्र (Gujarati actress Jigna Vyas was detained during the NEET protest)
तू ज़िन्दा है तो ज़िन्दगी की जीत में यकीन कर,
अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला ज़मीन पर!
सुबह औ' शाम के रंगे हुए गगन को चूमकर,
तू सुन ज़मीन गा रही है कब से झूम-झूमकर,
तू आ मेरा सिंगार कर, तू आ मुझे हसीन कर!
अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला ज़मीन पर!.... तू ज़िन्दा है
ये ग़म के और चार दिन, सितम के और चार दिन,
ये दिन भी जाएंगे गुज़र, गुज़र गए हज़ार दिन,
कभी तो होगी इस चमन पर भी बहार की नज़र!
अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला ज़मीन पर!.... तू ज़िन्दा है
हमारे कारवां का मंज़िलों को इन्तज़ार है,
यह आंधियों, ये बिजलियों की, पीठ पर सवार है,
जिधर पड़ेंगे ये क़दम बनेगी एक नई डगर
अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला ज़मीन पर!.... तू ज़िन्दा है
हज़ार भेष धर के आई मौत तेरे द्वार पर
मगर तुझे न छल सकी चली गई वो हार कर
नई सुबह के संग सदा तुझे मिली नई उमर
अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला ज़मीन पर!.... तू ज़िन्दा है
ज़मीं के पेट में पली अगन, पले हैं ज़लज़ले,
टिके न टिक सकेंगे भूख रोग के स्वराज ये,
मुसीबतों के सर कुचल, बढ़ेंगे एक साथ हम,
अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला ज़मीन पर!.... तू ज़िन्दा है
बुरी है आग पेट की, बुरे हैं दिल के दाग़ ये,
न दब सकेंगे, एक दिन बनेंगे इन्क़लाब ये,
गिरेंगे जुल्म के महल, बनेंगे फिर नवीन घर!
अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला ज़मीन पर!.... तू ज़िन्दा है..
प्रसिद्ध गीतकार शंकर शैलेंद्र...
महत्त्वाच्या इतर बातम्या:





















