Gautami Patil in Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात गौतमी पाटील दिसणार? आधी हसली आणि मग म्हणाली...
Gautami Patil in Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'च्या आगामी सीझनमध्ये गौतमी पाटील झळकणार का? आता स्वतः गौतमीनंच यावर उत्तर दिलंय.

Gautami Patil in Bigg Boss Marathi 6: महाराष्ट्रातील तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली अदाकारा, नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिला न ओळखणारं सध्या तरी कुणीच नाही. गौतमीचा कार्यक्रम कुठेही असो, तिथे गर्दी होणारच. ती स्टेजवर आली की, आपल्या अदांनी सर्वांना घायाळ करते. लहान मुलं, म्हातारे-कोतारे, महिला सगळ्यांनाच ती तिच्या तालावर थिरकायला भाग पाडते. स्टेज परफॉर्मन्स करणाऱ्या गौतमी पाटीलनं नुकतीच मनोरंजन विश्वात एन्ट्री घेतली आहे. गौतमीनं सिनेमा केलाय, काही सिनेमांमध्ये आयटम सॉन्ग्सही केलेत. त्यासोबतच गौतमी पाटील अनेक म्युझिक अल्बम्समध्येही झळकली आहे. अशातच महाराष्ट्राची सेन्सेशन असलेली सबसे कातील गौतमी पाटील आता 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वात दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनवेळीही अशीच चर्चा रंगलेली. त्यावेळी गौतमीनं सर्व चर्चा फेटाळून लावलेल्या पण, 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) आगामी सीझनमध्ये झळकणार का? यावर गौतमीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उत्तर दिलं आहे.
नुकतीच गौतमी पाटीलनं एबीपी माझाला मुलाखत दिलेली. या मुलाखतीत बोलताना गौतमी पाटीलनं 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वात जाणार की, नाही याबाबत स्पष्टीकरण दिलेलं. तसेच, गौतमीनं या मुलाखतीत बोलताना एक महत्त्वाचा खुलासाही केलाय. यावेळी गौतमी पाटीलसोबत प्रसिद्ध गायक अभिजीत जाधवही उपस्थित होता. गौतमी पाटीलनं गायक अभिजीत सावंतसोबत 'रुपेरी वाळूत' हे गाजलेलं मराठी गाणं रिक्रिएट केलं आहे. हे गाणं अभिजीत सावंतनं गायलंय, तर अल्बममध्ये त्याच्यासोबत गौतमी पाटील झळकली आहे. सध्या दोघांच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वात झळकण्याबाबत काय म्हणाली गौतमी?
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना गौतमी पाटीलनं 'बिग बॉस मराठी' या रिअॅलिटी शोचं तोंडभरुन कौतुक केलं. 'बिग बॉस'च्या घरात जाणार की नाही, यावर बोलताना गौतमी पाटील म्हणाली की, "मला बोलवलं होतं. अभिजीत दादाच्या सीझनवेळीच बोलवलं होतं. बिग बॉस खूप छान आहे. आज बिग बॉसमध्ये गेलं तर लोकांचं करिअर होतंच. माझं न जाण्याचं कारण वेगळं आहे. मी जास्त दिवस आईला सोडून राहू शकत नाही. मी तीन चार दिवसांपेक्षा जास्त आईशिवाय राहत नाही. तिला मी सोडू शकत नाही. हेच माझं कारण आहे. पण बिग बॉस खरंच बेस्ट आहे. तिथे गेलं की लोकप्रियता मिळते..."
दरम्यान, 'बिग बॉस मराठी 6'चा नवा प्रोमो कलर्स मराठीकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. 11 जानेवारीपासून 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन सुरू होणार आहे. पण, 'बिग बॉस मराठी'च्या घरात यंदा कोण झळकणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. अशातच गौतमी पाटील 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वात सहभागी होणार असल्याचं बोललं जात होतं, पण आता स्वतः गौतमीनं यावर स्पष्टीकरण दिल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























