राम कृष्ण हरी, नृत्यांगणा गौतमी पाटीलकडून माय माऊलींची सेवा; पाहा व्हिडीओ
Gautami Patil Video : राम कृष्ण हरी, नृत्यांगणा गौतमी पाटीलकडून माय माऊलींची सेवा; पाहा व्हिडीओ

Gautami Patil Video : नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या डान्सची संपूर्ण महाराष्ट्रात तुफान चर्चा असते. प्रेक्षक अगदी झाडावर चढून देखील तिचा डान्स पाहाण्यासाठी थांबलेले पाहायला मिळतात. मात्र, आता गौतमी पाटील (Gautami Patil Video) तिच्या वेगळ्या कृतीमुळे चर्चेत आली आहे. गौतमी पाटीलने (Gautami Patil Video) वारीत पंढरपूरकडे रवाना झालेल्या झालेल्या माय-माऊलींची सेवा केलेली पाहायला मिळलीये. यावेळी गौतमीने वारकऱ्यांमध्ये जात टाळ वाजवण्याचा आनंद घेतला. ज्ञानेश्वर माऊलींची आरती देखील केली. शिवाय गौतमीच्या (Gautami Patil Video) हस्ते वारकऱ्यांना राजगिऱ्याच्या लाडूचे आणि चिप्सचे वाटप करण्यात आले.
View this post on Instagram
गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील लोकप्रिय लावणी नृत्यांगणा आणि अभिनेत्री आहे. तिने अगदी कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात आपली खास ओळख निर्माण केली आहे. लावणीसारख्या पारंपरिक लोककलेला नव्याने लोकप्रियतेच्या शिखरावर नेण्यात गौतमी पाटीलचा मोठा वाटा आहे. आता तिची एन्ट्री मराठी मालिकांमध्ये होत आहे आणि त्यामुळे मालिकांमध्ये एक नवा रंग भरला जात आहे.
गौतमी पाटीलचे लावणी सादरीकरण रसिकांसाठी मनोरंजनाने भरलेले असते. तिच्या चेहऱ्यावरील भाव आणि तालावरची पकड हे सर्व प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. ती केवळ स्टेजवर मर्यादित न राहता आता छोट्या पडद्यावर म्हणजेच मराठी मालिकांमध्ये झळकत आहे, हे तिच्या कलेच्या आणि वाढत्या लोकप्रियतेचे द्योतक आहे. गौतमी पाटीलच्या मालिकांमधील भूमिका TRP वाढवणाऱ्या ठरत आहेत. तिच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे आणि त्यामुळे ज्या मालिकांमध्ये ती झळकते त्या मालिकांना अधिक लोकप्रियता मिळते. हे मराठी टेलिव्हिजनसाठी एक सकारात्मक बाब आहे.
गौतमी पाटील ‘देवमाणूस’ मालिकेत एका डान्सरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. ही भूमिका काही भागांपुरतीच मर्यादित आहे, परंतु तिचा अभिनय, संवादफेक आणि खास करून नृत्याच्या शैलीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या या छोट्याशा भूमिकेनेही ती मालिकेत लक्षात राहणारी व्यक्तिरेखा ठरली. तिने या मालिकेतील पात्र आण्णा नाईक यांच्याबरोबर डान्स केलेला पाहायला मिळाला. शिवाय तिने अजित कुमार याच्याबरोबर देखील रोमँटिक सीन दिले.
इतर महत्त्वाच्या बातम्या























