एक्स्प्लोर

Gautami Patil and Ajit Pawar : 'माझ्या आईने सांगितलं अजितदादांचं असं झालंय अन्...', अजित पवारांच्या आठवणीने गौतमी पाटीलच्या डोळ्यात पाणी, बोलून दाखवली 'ती' एक खंत

Gautami Patil and Ajit Pawar : दादांनी प्रत्येक कलाकाराला सपोर्ट केला आहे, प्रत्येक कलाकाराला दादांनी जीव लावला आहे, कधी दादांसोबत भेटायची वेळ आली नाही, ही खंत मला आहे, असंही गौतमी पाटीलने म्हटलं आहे.

मुंबई : सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil) ही अनेकदा आपल्या डान्समुळे आणि गर्दीमुळे, झालेल्या गोंधळामुळे चर्चेत येते, आज कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमांमध्ये गौतमी पाटीलने हजेरी लावली, दरम्यान अजित पवारांनी (Ajit Pawar) देखील एकदा गौतमी पाटीलवरती विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ती बैलासमोर नाचू दे नाहीतर कोणासमोर तुला काय फरक पडतो असं म्हणून उत्तर दिलं होतं, तेव्हा एकच हशा पिकला होता, आज कॉफी विथ कौशिकच्या कार्यक्रमांमध्ये अजित पवार यांच्याबाबत गौतमी पाटील भरभरून बोलली. दादांना एकदा महिला कार्यकर्त्यांनी काहीतरी सांगितलं होतं आणि त्यांना राग आला होता, कोणीतरी पक्षातून गौतमी पाटीलची, आणि त्यांचे काही कार्यकर्ते गौतम पाटीलचे शो ठेवत होते, महिला कार्यकर्त्यांनी तक्रार केली, अजितदादांनी असं सांगितलं होतं की, आता कोणीही गौतमी पाटीलचे शो ठेवायचे नाहीत, नंतर काय झालं माहिती नाही, पण अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांना दम द्यायचे पाटील बाईला बोलवू का? नेमकं काय झालं होतं? या प्रश्नावर उत्तर देताना गौतमी पाटील म्हणाली, मला माहिती नाही. पण मी एक सांगते, दादांच्या बाबतीत नकळत का होईना दादांनी मला सपोर्ट केला, कधी मी दादांसोबत बोलले नाही. आमची कधी भेट ही झाली नाही, पण दादांनी मला अजाणतेपणे सपोर्ट केला. त्यांचं बोलणं असू देत पण मध्ये बैलांसमोर नाचली किंवा तुला काय करायचं, माझ्यासाठी हा दादांचा सपोर्टच आहे असं मी मानते, लोकांनी मला बरेचदा ट्रोल केलं, पण दादांनी त्यावर उत्तर दिलं, दादांनी प्रत्येक कलाकाराला सपोर्ट केला आहे, प्रत्येक कलाकाराला दादांनी जीव लावला आहे, कधी दादांसोबत भेटायची वेळ आली नाही, ही खंत मला आहे, असंही गौतमी पाटीलने म्हटलं आहे.(Gautami Patil)

माझ्या आईने सांगितलं दादांचं असं झालंय अन्...

दादांच्या अपघाताची बातमी ऐकली तेव्हा कुठे होतीस, या प्रश्नावर उत्तर देताना गौतमी पाटील म्हणाली, मी नुकतीच उठले होते, मी घरीच होते, महाराष्ट्रासाठी ती धक्का देणारी घटना होती, मला माझ्या आईने सांगितलं दादांचं असं झालंय, मी म्हटलं तू वेडी आहेस का असं काय बोलते, वेगळं काहीतरी असेल किंवा फेक न्यूज असू शकते, आत्ता देखील या क्षणाला देखील ते खरं वाटत नाही, ते एकदम शॉकिंग होतं. अख्या महाराष्ट्रासाठी हा मोठा धक्का होता, माझी झोपच गेली ते सगळं ऐकल्यानंतर दादांनी जे महाराष्ट्रासाठी प्रामाणिकपणे काम केलं मला वाटत नाही त्यांच्यासारखं कोणी काम करेल असंही वाटतं नाही, दादा सारखा नेता परत होणे नाही आणि दादांची जागा कोणी घेऊ शकत नाही, आणि ते शक्यही नाही असंही पुढे गौतमी पाटीलने म्हटलं आहे.

गौतमीचा व्हॅलेंटाइन कोण? कधी लग्न करणार? 

"माझा अजिबात कुणीही व्हॅलेन्टाईन नाहीये. सध्या माझे कार्यक्रमच सुरू आहेत. व्हॅलेन्टाईन डे असं काही मी सध्या साजरा करत नाहीये. यात मला खरंतर इंटरेस्ट नाही आहे".

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress Richa Chaddha Trolling: '.. म्हणून जेष्ठांचा सन्मान करू नका...' बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर गदारोळ, नेमकं काय म्हणाली?
'.. म्हणून जेष्ठांचा सन्मान करू नका...' बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर गदारोळ, नेमकं काय म्हणाली?
मिथिला पालकरचा 'असा' अवतार कधीच पाहिला नसेल; क्राईम थ्रिलरचा टीझर पाहिलात?
मिथिला पालकरचा 'असा' अवतार कधीच पाहिला नसेल; क्राईम थ्रिलरचा टीझर पाहिलात?
Genelia Deshmukh Riteish Deshmukh: रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
Ramayan Yash Ravan: 4000 कोटींच्या रामायणमध्ये रावण साकारताना अभिनेता सेटवर करायचा 'ही' एक गोष्ट; वजनदार मुकूट चढवून...
4000 कोटींच्या रामायणमध्ये रावण साकारताना अभिनेता सेटवर करायचा 'ही' एक गोष्ट; वजनदार मुकूट चढवून...

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget