गुलाबी टोपी अन् नथीचा नखरा; 'बचना ए हसीनों'वर गौतमी पाटीलचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल
Gautami Patil dance video : नृत्यांगणा गौतमी पाटीलने 'बचना ए हसीनों' या हिंदी गाण्यावर तुफान डान्स केलाय.

Gautami Patil dance video : मराठी लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलने (Gautami Patil) पुन्हा एकदा आपल्या नृत्यकौशल्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. गौतमी पाटीलने गुलाबी रंगाची टोपी घालून 'बचना ए हसीनों' या लोकप्रिय हिंदी गाण्यावर सादर केलेला डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. गौतमीच्या (Gautami Patil) या हटके लूक आणि जोशपूर्ण नृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. गौतमीच्या या डान्सला (Gautami Patil dance video) सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळतोय.
View this post on Instagram
गुलाबी टोपी अन् गौतमीचा हटके लूक
या व्हिडिओमध्ये गौतमीने (Gautami Patil) पारंपरिक लावणी स्टेप्सना आधुनिक टच देत, आपल्या खास अदा आणि एक्सप्रेशन्स देत डान्स सादर केलाय. तिच्या गुलाबी टोपीतील लूकनेही चाहत्यांचे विशेष लक्ष वेधले आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच, काही तासांतच हजारो लाईक्स आणि शेअर्स मिळवत ट्रेंडिंगमध्ये झळकला आहे. चाहत्यांनी "गौतमीच्या डान्सने पुन्हा एकदा मार्केट जाम केलं!" अशा कमेंट्स करत तिच्या परफॉर्मन्सचं कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस
गौतमी पाटीलने (Gautami Patil) आपल्या मेहनतीने आणि नृत्यकौशल्याने मराठी मनोरंजन क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. तिच्या नृत्याच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची उपस्थिती असते, आणि ती सोशल मीडियावरही सक्रिय आहे. तिच्या नृत्यशैलीत पारंपरिक लावणीला आधुनिकतेची जोड दिसून येते, ज्यामुळे ती तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. एकंदरीत, गौतमी पाटीलचा 'बचना ए हसीनों'वरील डान्स आणि तिचा गुलाबी टोपीतील लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. तिच्या चाहत्यांसाठी हा व्हिडिओ एक पर्वणी ठरली असून, तिच्या आगामी परफॉर्मन्सची उत्सुकता वाढली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























