देशातील गद्दारांमध्ये आणखी एक नाव जोडलं गेलं, यूट्यबर ज्योती मल्होत्राबाबत बॉलिवूडमधून पहिली प्रतिक्रिया
youtuber jyoti malhotra : देशातील गद्दारांमध्ये आणखी एक नाव जोडलं गेलं, यूट्यबर ज्योती मल्होत्राबाबत बॉलिवूडमधून पहिली प्रतिक्रिया

YouTuber jyoti malhotra : यूट्यूबर ज्योती मल्होत्राला (YouTuber jyoti malhotra) पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी आज (दि.17) हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे. हरियाणातील हिसार येथील प्रसिद्ध ट्रॅव्हल व्लॉगर आणि यूट्यूबर ज्योती मल्होत्रा (YouTuber jyoti malhotra) हिने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दरम्यान, ज्योती मल्होत्राचं (YouTuber jyoti malhotra) हेरगिरी प्रकरण उघड झाल्यानंतर बॉलिवूडमधून पहिली प्रतिक्रिया आली आहे. कमाल आर खानने ज्योती मल्होत्राबाबत मतं व्यक्त केलं आहे.
कमाल खान काय म्हणाला?
कमाल खान म्हणाला, "देशाच्या गद्दारांच्या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे ते म्हणजे युट्यूबर ज्योती मल्होत्राचे! याआधीही अनेक गद्दार पकडले गेले आहेत!"
View this post on Instagram
भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी मिळवलेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्रा हिने पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संवेदनशील माहिती शेअर केली होती. ही माहिती कशी आणि कोणत्या माध्यमातून शेअर करण्यात आली, याचा तपशील अद्याप उघड करण्यात आलेला नाही. तथापि, तपास यंत्रणांनी त्यांच्या डिजिटल उपकरणांमधून काही महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत. विशेष म्हणजे, ज्योती मल्होत्रा हिने मागील वर्षी पाकिस्तानच्या लाहोर शहराला भेट दिली होती. तिथेच त्यांनी पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेशी संपर्क साधल्याचा संशय आहे.
माहिती गोळा करुन पाकिस्तानला पाठवायची ज्योती मल्होत्रा
या प्रकरणात तिच्यासह आणखी काही व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर करून संवेदनशील माहिती गोळा करून ती पाकिस्तानला पाठवण्यात आली असल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, ज्योती मल्होत्रा हिच्याशी संबंधित इतर कोणते नेटवर्क आहे का, याची चौकशी केली जात आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा गैरवापर करून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असं बोललं जातं आहे.ज्योती मल्होत्रा "Travel with Jo" नावाचा यूट्यूब चॅनेल असून, त्यावर सुमारे 3.77 लाख सब्स्क्रायबर्स आहेत.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या


















