Gauri Khan Rents Flat For Staff: मालकीण असावी तर अशी... गौरी खाननं स्टाफसाठी भाड्यानं घेतलं घर, भाडं ऐकाल तर...
Gauri Khan Rents Flat For Staff: शाहरुख खानची बायको गौरी खाननं मुंबईत एक घर भाड्यानं घेतलं आहे. पण, हे घर तिनं स्वतःसाठी नाहीतर आपल्या स्टाफसाठी भाड्यानं घेतलं आहे.

Gauri Khan Rents Flat For Staff: बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची (Shah Rukh Khan) पत्नी, इंटीरियर डिझायनर आणि सिने प्रोड्यूसर गौरी खान (Gauri Khan) हिनं मुंबईतील (Mumbai News) खार पश्चिम इथे अपस्केल पंकज सोसायटीमध्ये एक फ्लॅट भाड्यानं घेतला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गौरी खाननं हा फ्लॅट स्वतःसाठी नाहीतर तिच्या स्टाफसाठी घेतला आहे. तर, स्वतः गौरीही आपल्या संपूर्ण कुटुंबासह एका भाड्याच्या घरात राहाते. शाहरुख-गौरीच्या आलिशान 'मन्नत'चं (Mannat Bungalow) रिन्यूएशन सुरू असल्यामुळे दोघेही मुलांसह भाड्याच्या घरात राहत आहेत. अशातच आता एवढ्या मोठ्या किंमतीचा फ्लॅट आपल्या स्टाफसाठी भाड्यानं घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
गौरी खाननं फ्लॅट भाड्यानं घेतल्याची माहिती झॅपकी (Zapkey) साईटवरुन समोर आली आहे. यामध्ये रजिस्ट्रेशन रेंटल अॅग्रीमेंट आहे, ज्यावरुन कळतं की, चौथ्या मजल्यावर (फ्लॅट क्रमांक 6) असलेला हा 725 चौरस फूट अपार्टमेंट तिचा स्टाफ वापरणार आहे. हा फ्लॅट शाहरुख-गौरी सध्या भाड्यानं राहात असलेल्या डुप्लेक्सपासून फक्त 100 मीटर अंतरावर आहे.
गौरीनं स्टाफसाठी भाड्यानं घेतलाय फ्लॅट
गौरीनं अपार्टमेंट संजय किशोर रमानी यांच्याकडून महिना 1.35 लाख रुपयांवर घेतला आहे. म्हणजेच, वर्षाचे 16.2 लाख रुपये. यासाठी गौरी खाननं 4.05 लाख रुपयांचं सिक्योरिटी डिपॉझिट ठेवलं आहे. हा करार तीन वर्षांसाठी करण्यात आला आहे. एवढंच नाहीतर वर्षभरानंतर याच्या भाड्यात तब्बल 5 टक्क्यांची वाढ होणार आहे.
शाहरुखनं तीन वर्षांसाठी तब्बल 8.67 कोटींचं भाडं
एप्रिलच्या सुरुवातीला शाहरुख खाननं खार येथील पाली हिलमध्ये तीन वर्षांसाठी 8.67 कोटी रुपयांना दोन डुप्लेक्स भाड्यानं घेतले होते. ज्यामध्ये तो आणि त्याचं संपूर्ण कुटुंब राहतंय. एका घरासाठी तो दरमहा 11.54 लाख रुपये भाडं देईल आणि दुसऱ्या घरासाठी तो सुमारे 12.61 लाख रुपये भाडं भरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























