एक्स्प्लोर

Gaurav More : गौरव मोरेला कशी मुलगी हवीये? इंडस्ट्रीतलीच मुलगी करणार का? वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टींचा अभिनेत्याने केला खुलासा 

Gaurav More :  गौरव मोरे याने त्याला लग्नासाठी कशी मुलगी हवी आहे, याविषयी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. 

Gaurav More :  महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे (Gaurav More) एक विनोदी अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सध्या तो सोनी टिव्हीवरील मॅडनेस मचाऐंगे या कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. तसेच नुकताच तो त्याच्या अल्याड पल्याड सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अल्याड पल्याड हा सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली आहे. त्यानिमित्ताने गौरव मोरेने एबीपी माझाला मुलाखत दिली. 

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये गौरव मोरेने त्याला कशी मुलगी आहे, याविषयी देखील भाष्य केलं आहे. तसेच त्याने यावेळी त्याच्या लग्नाच्या प्लॅन्सविषयीसुद्धा सांगितलं आहे. त्यामुळे आता गौरव मोरे लग्न कधी करणार या प्रश्नाचं उत्तर देखील त्याच्या चाहत्यांना मिळालं आहे. 

गौरव मोरे लग्न कधी करणार?

गौरव मोरेने त्याच्या लग्नाविषयीच्या प्लॅन्सविषयी सांगताना म्हटलं की, घरचे आता मागे लागले आहेत, पण मी त्यांना सांगितलं आहे की, मला सध्या लग्न करायचं नाहीये. त्यामुळे सध्या तरी गौरव लग्नबंधनात अडकणार नसल्याचं यावरुन म्हणता येईल. 

गौरव मोरेला कशी मुलगी हवी?

कशी  मुलगी हवी या प्रश्नाचं उत्तर देताना गौरव मोरे म्हणाला की,  मला शांत आणि चांगली मुलगी हवी आहे. माझ्या कामाची वेळ ठरलेली नसते, मी मित्रांमध्ये जास्त राहणारा मुलगा आहे. ते समजून घेणारी हवी. इंडस्ट्रीतलीच मुलगी करणार का? यावर बोलताना गौरव मोरेने म्हटलं की, मी इंडस्ट्रीतली मुलगी नाही करणार. कारण त्या दोन्ही गोष्टी सारख्या होतील. आम्ही दोघे वेगळ्या क्षेत्रातले असलो तर आमच्या वेगळ्या चर्चा होतील.

गौरव मोरेने हास्यजत्रा का सोडली?

गौरवने महाराष्ट्राची हास्यजत्रा का सोडली? या प्रश्नाचं उत्तर देताना गौरव मोरेने म्हटलं की, माझ्यामध्ये तोच तोचपणा जास्त येत होता. माझ्या रिऍक्शनही बोलायच्या आधी त्याच त्याच येत होत्या. पाच वर्ष सलग तो कार्यक्रम केल्यामुळे मला ती सवय लागली होती. त्यामुळे थोडं थांबायला हवं असं मला वाटलं. त्याचवेळी हिंदीतून काम आलं आणि लिमिटेड एपिसोड्सच होते. नंतर म्हटलं की चला लिमिटेड जूनपर्यंत आहे ना मग करुया आपण. मग हे जरा वेगळं काम आहे, तिथे आपल्या सारख्या रिऍक्शन येणार नाहीत.  म्हणून मी निर्णय घेतला. 

ही बातमी वाचा : 

Gaurav More : गौरव मोरेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' का सोडली? पहिल्यांदाच सांगितलं कारण, म्हणाला...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Janjal : अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ दहशतवाद्यांशी लढताना शहीद, सुरक्षा दलांकडून चार अतिरेक्यांचा खात्मा
अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळ याला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ravikant Tupkar : बच्चू कडूंनी तिसऱ्या आघाडीचं निमंत्रण दिलं : तुपकरSpecial Report Maharashtra Politics | 11 कोटींच बक्षीस, विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर 'बोलंदाजी'Special Report Ravindra Waikar | आरोप चुकले, वायकर सुटले? क्लीनचीटवरून विरोधकांचा हल्लाबोलPune Politce Attack :पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न,  पुण्यात वर्दीवरच हल्ला, सामान्याचं काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pravin Janjal : अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ दहशतवाद्यांशी लढताना शहीद, सुरक्षा दलांकडून चार अतिरेक्यांचा खात्मा
अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळ याला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
Washim News : पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
New Criminal Law Section 69 : प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
Embed widget