![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Gaurav More on Juhi Chawla : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेच्या फरफॉर्मन्सने जुही चावलाही इंप्रेस, म्हणाला 'हे माझ्यासाठी सुखच'
Gaurav More on Juhi Chawla : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता गौरव मोरेने हा सध्या 'मॅडनेस मचाएंगे' या कार्यक्रमात दिसतोय. नुकतच त्याचा आणि जुही चावलासोबतचा प्रोमो समोर आला आहे.
![Gaurav More on Juhi Chawla : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेच्या फरफॉर्मन्सने जुही चावलाही इंप्रेस, म्हणाला 'हे माझ्यासाठी सुखच' Gaurav More reaction on sharing stage with Juhi Chawla on Madness Machayenge Show entertainment latest update detail marathi news Gaurav More on Juhi Chawla : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेच्या फरफॉर्मन्सने जुही चावलाही इंप्रेस, म्हणाला 'हे माझ्यासाठी सुखच'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/24/8813efd766112bdc5ad9eff47c0a29931713937894204720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gaurav More on Juhi Chawla : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून घराघरात पोहचलेला गौरव मोरे (Gaurav More) हा आता 'मॅडनेस मचाएंगे' (Madness Machayenge) या कार्यक्रमात त्याची जादू सोडतोय. काही दिवसांपूर्वीच त्याने या कार्यक्रमात एन्ट्री केली. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना एक सुखद धक्का बसला. त्यानंतर पुन्हा एकदा गौरवने त्याच्या अभिनयाची जादू करत बॉलीवूड अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) इंप्रेस केलं. त्यानंतर जुही चावला देखील गौरवच्या कॉमेडीची फॅन झाली.
'मॅडनेस मचाएंगे' या कार्यक्रमात अभिनेत्री जुही चावलाने उपस्थिती लावली. यावेळी गौरवने तिच्यासमोर डरमधील शाहरुख खान सादर केला. त्यावर जुही चावलाही हासू आवरलं नाही. सध्या या कार्यक्रमाचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होतेय.
जुही चावलाही झाली गौरव मोरेची फॅन
या एपिसोडमध्ये गौरव डर चित्रपटातील तु हैं मेरी किरण या गाण्यावर डान्स करुन शाहरुखची मिमिक्री करणार आहे. त्याच्या या मिमिक्रीवर जुही देखील इंप्रेस झाली. तसेच त्याने जुहीला फूल देऊन तिच्यावर फुलं देखील उधळलीत. गेल्या काही दिवसांपासून गौरवच्या या धमाकेदार कॉमेडीवर हिंदी प्रेक्षकही खळखळून हसत आहेत आणि तो प्रेक्षकांचं नॉन स्टॉप मनोरंजन करत आहे. सध्या जुही सोबतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होतोय.
हे माझ्यासाठी सुख - गौरव मोरे
दरम्यान जुही चावलासोबत झालेल्या एपिसोडनंतर गौरवने या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटलं की, मॅडनेस मचाएंगे हा कार्यक्रम सुरु होऊन अगदीच काही दिवस झालेत. हिंदीत एवढा कमालीचा शो करायला मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मराठीच्या सोबतीने हिंदी प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम ही माझ्या कामाची पोचपावती आहे. त्याचप्रमाणे ही आणखी उत्तम काम करण्याची देखील प्रेरणा आहे. या कार्यक्रमात अजून धम्माल मस्ती करायची आहे. पण जुही चावला मॅमसोबत मला स्टेज शेअर करायला मिळणं हे माझ्यासाठी सुख आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)