महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडून 'चला हवा येऊ द्या 'मध्ये गेला, गौरव मोरेनं सांगितलं कारण, स्पष्टच म्हणाला ..
स्कीटच करायचं होतं तर पुन्हा हास्य जत्रेमध्ये का गेला नाहीस? असे प्रश्न चाहते विचारू लागल्यानंतर आता गौरवने अखेर यावर मौन सोडले आहे.

Gaurav More: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमुळे विनोदी अभिनेता गौरव मोरे घराघरात पोहोचला. पण या शोमधून गौरवने अचानक रजा घेतल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने एक हिंदी शोही केला. नंतर तो 'चला हवा येऊ द्या' च्या दुसऱ्या पर्वात झळकला. त्यामुळे चाहते म्हणायला लागले की स्कीटच करायचं होतं तर पुन्हा हास्य जत्रेमध्ये का गेला नाहीस? असे प्रश्न चाहते विचारू लागल्यानंतर आता गौरवने अखेर यावर मौन सोडले आहे. त्यानं महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडण्याची काही कारणेही सांगितली. हास्यजत्रामध्ये तोच तोच पणा होत होता म्हणून तो शो सोडल्याचं त्याने सांगितलं.
गौरव मोरेनं सांगितलं हास्यजत्रा सोडण्याचं कारण
नाईन माईंड्स क्रिएशनला दिलेल्या मुलाखतीत गौरव मोरेला चला हवा येऊ द्याबद्दल विचारण्यात आलेलं. त्यावर गौरव म्हणाला, 'मध्ये गॅप आहे ना. मी 2024 एप्रिलमध्ये हिंदी शो करायला घेतला. तिथून मध्ये गॅप होता आणि त्यानंतर 2025 मध्ये चला हवा येऊ द्या करायला घेतलं. यातच 365 दिवस गेले."
तू पुढे म्हणाला," स्किटच करायचं होतं तर हास्य जत्रेमध्ये का गेला नाहीस असं विचारल्यानंतर गौरव म्हणाला," कलाकार वेगळे आहेत, त्यांचा अनुभव वेगळा आहे. त्यांची कामाची पद्धत वेगळी आहे. माझ्यासाठी सगळंच नवीन. जरी मी तिथे होतो, तरी मी इथे आल्यावर शून्य होतो. मला किती येतंय, प्रत्येकाची शैली कशी आहे? कोण कसं काम करतं, हे शिकायचं होतं."
हास्यजत्रेतील कलाकारांवरही बोलला
याच मुलाखतीत ओंकार भोजनेबद्दलही गौरव बोलला. ओंकार भोजने सारखा नट नाही. पुढच्या दहा वर्षातही होणार नाही. त्याच्याकडे एक जादू आहे. अत्यंत हुशार आणि सगळ्यांचा आदर करणारा माणूस आहे. त्याचबरोबर फार कोणामध्ये नसणाऱ्या माणूस असं तो म्हणाला. समीर चौगुले ला म्हणाला मल्टी टॅलेंटेड. आणि कामावर इतकं प्रेम असणारे व्यक्ती मी माझ्या आयुष्यात कधीही पाहिली नाही. असंही त्यांनं म्हटलं.
























