एक्स्प्लोर

Gangubai Kathiawadi: आलियाच्या ‘या’सवयीमुळे वैतागला रणबीर कपूर, संजय लीला भन्साळींकडे केली तक्रार

Alia Bhatt : ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट हुसेन जैदी यांच्या 'माफिया क्वीन ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित आहे.

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) आता चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वी चित्रपटाचा प्रीमियर बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये पार पडला. आलियाचा हा चित्रपट खूप पसंत केला जात आहे. आता चाहतेदेखील हा चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. बर्लिन फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाचा प्रीमियर झाल्यानंतर आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी माध्यमांशी संवाद साधला. जिथे संजय लीला भन्साळी यांनी खुलासा केला की, आलियाचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) दिग्दर्शकाकडे तिची तक्रार केली होती.

संजय लीला भन्साळी यांनी खुलासा केला की, आलिया तिच्या व्यक्तिरेखेत इतकी रमली होती की, ती रणबीर कपूरसाठी डोकेदुखी ठरली होती. चित्रपटातील आलियाच्या अभिनयाबद्दल बोलताना संजय लीला भन्साळी म्हणाले की, मला वाटते की ती तिच्या खऱ्या आयुष्यात आलियापेक्षा जास्त गंगूबाई बनली होती. ती घरात देखील गंगूबाईसारखी बोलायची, त्यामुळे तिचा प्रियकर रणबीरने तिची माझ्याकडे तक्रार केली होती.

रणबीरने ‘गंगूबाई’ स्टाईलमध्ये केले आलियाचे कौतुक!

‘गंगूबाई काठियावाडी’चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर रणबीर कपूरला त्याची प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्यानंतर रणबीरने ‘गंगूबाई स्टाईल’मध्ये नमस्ते म्हणत त्याची खास प्रतिक्रिया दिली. आलियानेही रणबीरचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत, त्याला ‘बेस्ट बॉयफ्रेंड’ म्हटले आहे.

आलियाची ‘गंगूबाई स्टाईल’

पत्रकार परिषदेत चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आलियाला तिचे मनोगत व्यक्त करण्यास साग्न्यात आले होते. तेव्हा ती गंगूबाई स्टाईलमध्ये म्हणाली की, ‘मला भाषण देण्याची सवय नाही’. चित्रपट पाहिल्याबद्दल तिने प्रेक्षकांचे आभारही मानले.

‘गंगूबाई काठियावाडी’बद्दल बोलायचे झाले, तर हा चित्रपट हुसेन जैदी यांच्या 'माफिया क्वीन ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात आलियासोबत अजय देवगण, शंतनू माहेश्वरी, विजय राज आणि इंदिरा तिवारी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amravati Loksabha Election : ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर
हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर
Mrunal Dusanis : मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलत का? क्युटनेसमध्ये बॉलिवूडच्या स्टारकिड्सला देतेय टक्कर
मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलत का? क्युटनेसमध्ये बॉलिवूडच्या स्टारकिड्सला देतेय टक्कर
Sharad Pawar Collar Video :उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी कॉलर उडवली
उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी कॉलर उडवली
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Dinesh bub : दिनेश बुब यांचा प्रहारमध्ये प्रवेश, शिवसेनेतून बाहेर पण शिवसेना रक्तात : दिनेश बुबVijay Shivtare Full PC :  निवडणूक लढण्यासंदर्भात अधिकृत भूमिका उद्याच घोषित करणार : शिवतारेShriniwas Patil : श्रीनिवास पाटलांची निवडणूकीतून माघार; तब्येत ठीक नसल्यानं रिंगणातून बाहेरABP Majha Headlines : 4 PM : 29 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Loksabha Election : ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर
हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर
Mrunal Dusanis : मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलत का? क्युटनेसमध्ये बॉलिवूडच्या स्टारकिड्सला देतेय टक्कर
मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलत का? क्युटनेसमध्ये बॉलिवूडच्या स्टारकिड्सला देतेय टक्कर
Sharad Pawar Collar Video :उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी कॉलर उडवली
उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी कॉलर उडवली
Manoj Jarange Patil : 'संघर्षयोद्धा'चित्रपटात अजय गोगावलेच्या आवाजात हृदयस्पर्शी गाणं
'संघर्षयोद्धा'चित्रपटात अजय गोगावलेच्या आवाजात हृदयस्पर्शी गाणं
Bachchu Kadu on Amravati : आम्ही 'सागरा'तल्या लाटा, ब्रह्मदेव आला तरी थांबत नाही, लढणार आणि जिंकणार! बच्चू कडूंनी शड्डू ठोकला
आम्ही 'सागरा'तल्या लाटा, ब्रह्मदेव आला तरी थांबत नाही, लढणार आणि जिंकणार! बच्चू कडूंचा निर्धार
Ram Satpute : यांनीच हिंदूंना दहशतवादी म्हटलं, आता मंदिरांना भेटी देतायत, 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' म्हणत राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका
यांनीच हिंदूंना दहशतवादी म्हटलं, आता मंदिरांना भेटी देतायत, 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' म्हणत राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका
RCB Vs KKR Dream11 Prediction:  कोहली, रसेल, मॅक्सवेल, आज तगडी फौज; पाहा परफेक्ट 11 खेळाडूंची टीम, तुम्हाला करेल मालामाल
कोहली, रसेल, मॅक्सवेल, आज तगडी फौज; पाहा परफेक्ट 11 खेळाडूंची टीम, तुम्हाला करेल मालामाल
Embed widget