First Superstar To Eat On Golden Platter: सोन्याच्या ताटात जेवणारा पहिला सुपरस्टार, कित्येक सुपरहिट फिल्म्सचा हिरो, पण मर्डरच्या आरोपांत जेल अन् अख्ख्या स्टारडमचा चक्काचूर
First Superstar To Eat On Golden Platter: फक्त उत्तम अभिनेते नाहीतर, सर्वोत्कृष्ट गायक असलेल्या सुपरस्टारनं कित्येक हिट सिनेमे दिले, पण एका घटनेनं त्याचं अख्खं आयुष्य बदललं.

First Superstar To Eat On Golden Platter: साऊथ स्टार (South Cinema) दुल्कर सलमान (Dulquer Salmaan) याचा नवा सिनेमा 'कांता'चा ट्रेलर (Kaantha Movie Trailer) नुकताच प्रदर्शित झालाय. या सिनेमाचं दिग्दर्शक सेल्वमणी सेल्वराज (Selvamani Selvaraj) यांनी केलंय, ज्यांनी या सिनेमाची कथा देखील लिहिलीय. पण, ज्यावेळी या सिनेमाचा ट्रेलर (Movie Trailer) रिलीज करण्यात आला, त्यावेळी तमिळ सिनेसृष्टीतलं (Tamil Cinema) एक वेगळंच नाव समोर आलं. ट्रेलर रिलीज झाल्यानं तमिळ सिनेसृष्टीतील पहिले सुपरस्टार 'मायावरम कृष्णमूर्ती त्यागराज भागवतर' (M. K. Thyagaraja Bhagavathar) यांचं नाव समोर आलं आहे. यांच्याबद्दल कदाचितच कुणाला ठाऊक असेल. फक्त उत्तम अभिनेते नाहीतर, सर्वोत्कृष्ट गायक असलेल्या मायावरम कृष्णमूर्ती त्यागराज भागवतर यांच्या नावावर अनेक सुपरहिट सिनेमे आहेत. त्यागराजाच्या चित्रपटांनी थिएटरमध्ये सिल्वर आणि गोल्डन जुबली साजरी केलीय. त्यांचा सर्वात जास्त काळ चालणारा नाट्यमय हिट चित्रपट 'हरिदास' (1944) होता.
'कांता' मध्ये दाखवली जाणार त्यागराजाची कथा?
'हरिदास' हा चित्रपट मद्रासमधील ब्रॉडवे सिनेमागृहात 114 आठवडे (अंदाजे 784 दिवस) चालण्याचा जवळजवळ अतूट रेकॉर्ड होता. हा रेकॉर्ड जवळजवळ सहा दशकं टिकला. हा रेकॉर्ड दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'चंद्रमुखी' (2005) या चित्रपटानं मोडला. चेन्नईच्या शांती थिएटरमध्ये 'चंद्रमुखी' हा चित्रपट 890 दिवस चालला. कल्पना करा, एमजी रामचंद्रन (एमजीआर), शिवाजी गणेशन, जेमिनी गणेशन, रजनीकांत आणि कमल हासन यांच्यासह तमिळ चित्रपटसृष्टीतील असंख्य स्टार्स आले आणि त्यांनी यशाचं सर्वोच्च शिखरही गाठली, तरीसुद्धा हा विक्रम मोडण्यासाठी तब्बल 59 वर्ष लागली. आता, असं म्हटलं जातंय की 'कांथा' हा चित्रपट या सुपरस्टारच्या कथेपासून प्रेरित आहे.
एमके त्यागराज भगवतार कोण?
1 मार्च 1910 रोजी एका सोनाराच्या घरात जन्म झालेल्या मुलाला त्याच्या लहानपणापासूनच गाण्याचा शौक होता. पण, कुणाला ठाऊक होतं, आपल्या बोबड्या स्वरात गाणारा हा चिमुकला पुढे जाऊन सुपरस्टार होणार होता. संगीताची आवड जोपासत पुढे त्यांनी कर्नाटक संगीताचा अभ्यास केला आणि 'भागवतार' ही पदवी मिळवली. 1934 मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांच्या पहिल्या चित्रपटात सादर केलेले 'पावलक्कोडी' हे गाणं खूप लोकप्रिय झालं. त्यांच्या यशस्वी चित्रपटांमध्ये चिंतामणी (1943), अंबिकापती (1937) आणि तिरुनीलकंतार (1940) यांचा समावेश होता. त्यागराज इतका श्रीमंत झाला की, तो सोन्याच्या ताटात जेवायचा, असं त्याकाळात सांगितलं जायचं.
अभिनेत्यावर पत्रकाराच्या खुनाचा आरोप?
सर्वकाही ठीक सुरू होतं, करियर यशाच्या सर्वोच्च शिखरावर होतं, अन् अचानक एक दिवस बातमी आली की, देशातल्या सर्वात मोठ्या सुपरस्टारला एका पत्रकाराच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. एका झटक्यात स्टारडम उतरलं आणि पत्रकार लक्ष्मीकांतन मर्डर केसमध्ये सुपरस्टार त्यागराज जेलमध्ये गेले. असं सांगितलं जातं की, पत्रकार लक्ष्मीकांत स्टार्सच्या पर्सनल लाईफबाबत लिहायचे, त्यात या पत्रकाराला बनावट कागदपत्रं बनवल्याबद्दल तब्बल सात वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागलेला. तो सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याची कव्हरेज करायचा आणि त्यांना उघड करण्याची धमकी देऊन पैसे उकळायचा. त्याच्याच खुनाच्या आरोपाखाली त्यागराज यांनी आपलं उभं आयुष्य तुरुंगात घालवलं.
पाहा सलमान दुल्करच्या 'कांता' सिनेमाचा ट्रेलर :
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























