एक्स्प्लोर

Sulakshana Pandit Love Story: 'उलझन'पासून सुरू झालेली प्रेमकहाणी अधुरीच राहिली; ज्याच्यावर भाळली, त्याच्याच पुण्यतिथीला सोडलं जग; गायिका सुलक्षणा पंडीत यांचं निधन

Sulakshana Pandit Love Story: सुप्रसिद्ध अभिनेत्री, गायिका सुलक्षणा पंडित यांनी जगाचा निरोप घेतलाय. 6 नोव्हेंबर रोजी त्यांचं निधन झालं. त्यांचे भाऊ म्हणजे, संगीत दिग्दर्शक ललित पंडित यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केलीय.

Sulakshana Pandit Love Story: सुप्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री (Actress) सुलक्षणा पंडित (Sulakshana Pandit) यांचं निधन झालंय. सुलक्षणा पंडित म्हणजे, अभिनेत्री विजेता पंडित (Vijayta Pandit) आणि संगीतकार (Music Composer) जोडी जतिन-ललित (Jatin-Lalit) यांची बहीण. सुलक्षणा पंडित यांची ओळख फक्त गायिका म्हणूनच नाहीतर, त्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीही होत्या. सुलक्षणा पंडीत (Sulakshana Pandit Passes Away) यांनी 6 नोव्हेंबरला अखेरचा श्वास घेतला, तर तब्बल 40 वर्षांपूर्वी याच तारखेला दिग्गज अभिनेते संजीव कुमार (Sanjiv Kumar) यांचंही निधन झालेलं. आता तुम्ही म्हणाल याचा काय संबंध? संबंध आहे तो एका अधुऱ्या राहिलेल्या प्रेमकहाणीचा... पण, योगायोग पाहा, दिग्गज अभिनेत्री, गायिका ज्याच्यावर भाळली, त्याच्याच पुण्यातिथीच्या दिवशी जगाचा निरोप घेतला. 

सुप्रसिद्ध अभिनेत्री, गायिका सुलक्षणा पंडित यांनी जगाचा निरोप घेतलाय. 6 नोव्हेंबर रोजी त्यांचं निधन झालं. त्यांचे भाऊ म्हणजे, संगीत दिग्दर्शक ललित पंडित यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केलीय. सुलक्षणा आयुष्यभर अविवाहित राहिल्या. अधुऱ्या प्रेम कहाणीमुळे, त्या इतक्या दुखावल्या गेल्या की, त्या इतर कुणाचा विचारच करू शकल्या नाहीत. दरम्यान, योगायोग असा घडला की, ज्याच्यावर आयुष्यभर प्रेम करत राहिल्या त्याच्याच पुण्यतिथीच्या दिवशी अखेरचा श्वास घेतला. आम्ही ज्या अभिनेत्याच्या पुण्यातिथीबाबच बोलत आहोत, त्या अभिनेत्याचं नाव संजीव कुमार. 

Singer and former actor Sulakshana Pandit dies at 68.

संजीव कुमार यांचं आजच्याच दिवशी 40 वर्षांपूर्वी झालेलं निधन 

लोकप्रिय अभिनेते संजीव कुमार यांनी 6 नोव्हेंबर 1985 रोजी या जगाचा निरोप घेतला. चाळीस वर्षांनंतर, याच तारखेला सुलक्षणा पंडित यांचं निधन झालंय. दरम्यान, सुलक्षणा यांनी आपला पहिला सिनेमा संजीव कुमार यांच्यासोबत केला आणि त्याच सिनेमात त्या संजीव कुमार यांच्यावर भाळल्या. सुलक्षणा यांनी आपल्या प्रेमाची कबुली थेट संजीव कुमार यांच्यासमोरच दिलेली, पण संजीव यांनी मात्र त्यांच्या प्रेमाचा प्रस्ताव नाकारला. तेव्हापासूनच सुलक्षणा त्यांच्या एकंदरीत आयुष्याबाबतच निराश झालेल्या. त्यांची निराशा एवढी टोकाला पोहोचलेली की, त्यांच्या करिअरची किंवा आयुष्याची त्यांना काहीच जाणीव उरली नव्हती. त्या नैराश्यानं ग्रस्त झालेल्या आणि एकांतवासात गेल्या. पण, शेवटपर्यंत त्यांचं हृदय फक्त आणि फक्त संजीव कुमार यांच्यासाठी धडधडत होतं. 

Tragic Life: Unrequited love ushered Sulakshana Pandit to a lifelong confinement - Yahoo Life Singapore

डेब्यू फिल्ममध्येच संजीव कुमार यांच्यावर भाळल्या... 

सुलक्षणा पंडित 70 आणि 80 च्या दशकातली सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री. जणू सौंदर्याची खाण, जिच्यावर कित्येकांचा जीव भाळला होता. त्यांचे रेखीव डोळे, काळजाच चर्र होईल, असं स्मित हास्य, जो त्यांच्याकडे पाहिल, त्याची नजर हटणारच नाही... पण, जिच्यावर प्रत्येकजण फिदा होता, तिचं हृदय मात्र फक्त आणि फक्त संजीव कपूर यांच्यासाठीच धडधडत होतं. पण कुणाला माहीत होतं की, नेहमीच चेहऱ्यावर हसू घेऊन वावरणारी अभिनेत्री एक दिवस एकांतातच जगाचा निरोप घेईल... 

1975 मध्ये आलेल्या 'उलझन' या चित्रपटातून सुलक्षणा यांनी पदार्पण केलेलं. या चित्रपटात त्यांनी संजीव कुमार यांच्यासोबत काम केलं. गंभीर स्वभावाच्या संजीव यांना पाहून सुलक्षणा त्यांच्या प्रेमात पडल्या. त्यावेळी संजीव कुमार हेमा मालिनी यांच्या प्रेमात होते, पण तरीही सुलक्षणा त्यांच्या प्रेमात पडल्या. 

संजीव कुमार यांनी नाकारला प्रेमाचा प्रस्ताव 

सुलक्षणा संजीव कुमार यांच्या प्रेमात पडल्या. दरम्यान, संजीव कुमार यांनी हेमा मालिनी यांना प्रपोज केलेलं. पण, डिम गर्लनं संजीव कुमार यांचं प्रपोजल नाकारलं, कारण हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्यावर प्रेम करत होती. हेमाच्या नकारामुळे संजीव कुमार यांचं मन दुखावलं. तोपर्यंत, ते आणि सुलक्षणा खूप चांगले मित्र झाले होते आणि ते सुलक्षणा यांच्याशी सर्वकाही शेअर करायचे. जेव्हा संजीव कुमार हेमा मालिनी यांच्यापासून वेगळे झाले, तेव्हा सुलक्षणा यांनी स्वतः संजीव कुमार यांच्यासमोर प्रेम व्यक्त केलं, पण नियतीनं वेगळी योजना  आखलेली. हेमाच्या नकारानंतर, त्यांनी सुलक्षणा यांनाही नाकारलं. संजीव कुमार यांच्या नकारामुळे सुलक्षणा यांना खूप धक्का बसला, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं. त्यांनी चित्रपटांमध्ये काम करणं थांबवलं आणि बाहेरील जगाशी असलेले सर्व संबंध तोडले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sulakshana Pandit Passes Away: बॉलिवूडचा सुमधूर आवाज हरपला; सुप्रसिद्ध गायिका सुलक्षणा पंडित यांचं निधन, 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

महत्त्वाच्या बातम्या

Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
Pakistan Singer in India: पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस
पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस
Trisha Krishnan with Vijays Parents: विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
Amitabh Bachchan on Dharmendra: धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा
धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Embed widget