Guru Ravi Shankar Biopic : अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या जीवनावर बनणार चित्रपट, नाव आहे 'फ्री'
'फ्री - द अनटोल्ड स्टोरी ऑफ गुरुदेव श्री श्री रविशंकर' हा सिनेमा भव्य प्रकारे करण्याच्या हालचाली सुरु आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट जगातील 150 देशांमध्ये 21 भाषांमध्ये रिलिज केला जाणार असल्याची निर्मात्यांची माहिती आहे.
मुंबई : अध्यात्मिक गुरु म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेले श्री श्री रविशंकर यांच्या जीवनावर लवकरच सिनेमा येणार आहे. आज 13 मे रोजी श्री श्री रविशंकर यांच्या जन्मदिनाच्या दिवशी याबाबत घोषणा कऱण्यात आली असून चित्रपटाचं नाव 'फ्री - द अनटोल्ड स्टोरी ऑफ गुरुदेव श्री श्री रविशंकर' असं असणार आहे.
'फ्री - द अनटोल्ड स्टोरी ऑफ गुरुदेव श्री श्री रविशंकर' हा सिनेमा भव्य प्रकारे करण्याच्या हालचाली सुरु आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट जगातील 150 देशांमध्ये 21 भाषांमध्ये रिलिज केला जाणार असल्याची निर्मात्यांची माहिती आहे.
सिनेमाचं पोस्टर जारी केलं असलं तरी या सिनेमात रविशंकर यांची भूमिका कोण साकारणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. रविशंकर यांची भूमिका नवा चेहरा साकारेल की बॉलिवूडमधीलच कुणी अभिनेता असेल याबाबत अजून गुप्तता आहे. चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी सांगितलं की, "रविशंकर यांची भूमिका कोण साकारणार यावर अजून निर्णय झालेला नाही. चित्रपटाबाबत आणखी मोठे निर्णय घेणे बाकी आहे, त्याबाबत लवकरच घोषणा होतील', असं सूत्रांनी सांगितलं.
'फ्री - द अनटोल्ड स्टोरी ऑफ गुरुदेव श्री श्री रवि शंकर' मध्ये अध्यात्मिक गुरू रविशंकर यांच्या जीवनातील सुरुवातीचे दिवस दाखवले जाणार आहेत. श्री श्री रविशंकर यांचा अध्यात्मिक गुरू होण्याचा प्रवास यात दाखवला जाणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती महावीर जैन यांची कंपनी 'सनडायल एंटरटेनमेंट' आणि 'लायका ग्रुप' नं केली आहे. 'फ्री- द अन्टोल्ड स्टोरी ऑफ गुरूदेव श्री श्री रवि शंकर' चं दिग्दर्शन मॉन्टू बस्सी करणार आहेत. त्यांनीच सिनेमाचं लेखन देखील केलं आहे.