Faisal Khan Accuses Brother Aamir Khan: 'आमिरला आणखी एक मुलगा आहे, त्याने जगापासून लपवलयं'; मिस्टर परफेक्शनिस्टच्या सख्ख्या भावाचा खळबळजनक दावा
Faisal Khan Accuses Brother Aamir Khan Extramarital Affair: अभिनेता फैसल खाननं नुकतीच एक पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केले आहेत. रिना दत्त आणि किरण राव यांच्याव्यतिरिक्त आमिरचं एक ब्रिटीश पत्रकार जेसिका हाइन्ससोबत अफेअर होतं आणि तिच्यापासून त्याला एक अनौरस मूलही आहे, असा दावा त्यानं केला आहे.

Faisal Khan Accuses Brother Aamir Khan Extramarital Affair: 'मेला' (Mela Movie) या ब्लॉकबस्टर सिनेमातून (Blockbuster Cinema) घराघरांत पोहोचलेला अभिनेता फैसल खान (Actor Faisal Khan) सध्या चर्चेत आहे. फैसल खानची आणखी एक ओळख सांगायची तर, हा बॉलिवूडचा (Bollywood News) मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा सख्खा भाऊ आहे. अशातच फैसल खाननं आमिर खानबाबत धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्यानं केलेल्या खळबळजनक वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. आमिर खानचं एका ब्रिटीश पत्रकारासोबत अफेअर होतं आणि तिच्यापासून त्याला मुलगा असल्याचा दावा फैसल खाननं केला आहे.
अभिनेता फैसल खाननं नुकतीच एक पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केले आहेत. तो म्हणाला की, सध्या तो त्याचा भाऊ, सुपरस्टार आमिर खान आणि त्याच्या कुटुंबाशी असलेले सर्व संबंध तोडतोय. तसेच, फैसलनं आमिर खानवर आरोप केलाय की, रिना दत्त आणि किरण राव यांच्याव्यतिरिक्त आमिरचं एक ब्रिटीश पत्रकार जेसिका हाइन्ससोबत अफेअर होतं आणि तिच्यापासून त्याला एक अनौरस मूलही आहे. फैसल खानच्या या दाव्यानंतर संपूर्ण इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे.
आमिर खान आणि जेसिकाची भेट कशी झाली?
आमिर खाननं गेल्या काही दिवसांत आपल्या पर्सनल लाईफबाबत बोलायला सुरुवात केली आहे. तसेच, त्यानं नुकतीच मीडियाला आपली सध्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची ओळख करुन दिलेली. पण, आमिर खाननं कधीच जेसिकाबाबत काहीच सांगितलेलं नाही. अशातच आमिर खानच्या सख्ख्या भावानंच हा दावा केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 2005 मध्ये 'स्टारडस्ट' मॅग्झिनमध्ये आमिर खान आणि जेसिका लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचं एका आर्टिकलमध्ये छापण्यात आलेलं. त्या आर्टिकलमध्ये दावा करण्यात आलेला की, सुपरस्टारचं एक मूलही आहे, ज्याचं नाव जान आहे. जेसिका आणि आमिर खानची पहिली भेट फिल्म 'गुलाम'च्या शुटिंगदरम्यान झालेली.
View this post on Instagram
आमिर खाननं जेसिकाला अबॉर्शनही करायला सांगितलेलं, पण...
नवभारत टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, मॅग्झिनमध्ये छापलेल्या आर्टिकलमध्ये दावा करण्यात आलेला की, जेव्हा जेसिका प्रेग्नंट असल्याचं आमिर खानला समजलेलं, त्यावेळी त्यानं त्या बाळाची जबाबदारी स्विकारण्यास नकार दिलेला. तसेच, अबॉर्शन करुन घेण्याचा सल्लाही जेसिकाला दिलेला. पण, पत्रकारानं मूलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. तसेच, सिंगल मदर म्हणून त्या मुलाचा सांभाळ करण्याचंही मनाशी पक्क केलं. 2000 मध्ये जेसिकानं मूलाला जन्म दिला आणि त्याचं नाव जान ठेवलं. टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, जेसिकानं सांगितलेलं की, तिनं 2007 मध्ये लंडनमधील बिझनेसमन विल्यम टॅलबोटशी लग्न केलं होतं.
आमिर खानच्या कथित मुलाचे फोटो व्हायरल
जेसिकाच्या मुलाचा फोटो दोन वर्षांपूर्वी रेडिटवर व्हायरल झालेला. त्याला पाहून हा आमिरसारखाच दिसतोय, असं सर्वजण म्हणालेले. त्या फोटोवर कमेंट करत अनेक युजर्स म्हणालेले की, आमिर खाननं कधीच जानला आपलं नाव दिलं नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी जानचे फोटो ब्रिटिश वोगमध्ये छापले गेले होते. ज्यामध्ये तो आता खूपच मोठा झाल्याचं दिसतंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























