Vishakha Subhedar: खूप शाब्बासकी तुला! विशाखा सुभेदारनं मुलाचं तोंड भरून कौतुक केलं, म्हणाली ..
हल्ली फराळ तर 12 महिने चालूच असतो... पण परदेशी गेल्यावर आपलं सगळं हट्टाने हवं असतं नई...! असं म्हणत तिनं ही पोस्ट केली आहे.
Vishakha Subhedar: अभिनेत्री विशाखा सुभेदार सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते ती वेगवेगळ्या पोस्टमुळे . दिवाळीनिमित्त तिच्या एका पोस्टची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे . परदेशात राहत असणाऱ्या आपल्या लेकाचं तोंड भरून कौतुक करत त्याच्या बेसनाच्या लाडवांसाठी विशाखानं त्याला शाब्बासकी दिली आहे . instagram वर तिने परदेशात राहूनही आपली परंपरा जपल्याबद्दल आपल्याला अभिमान वाटत असल्याची पोस्ट तिने शेअर केली आहे .
काय केलीये विशाखाने पोस्ट ?
पोर.. Abhinay Subhedar शिकता शिकता स्वयंपाक ही करु लागे.. आणि दिवाळीत स्वतः बेसनाचे लाडू देखील केले...खुप भारी वाटतंयं... फराळ वैगेरे करण माझ कधीच मागे पडलं.. पुड्याला कात्री लावली कीं पडला डब्यात फराळ... झाली दिवाळी..!
हल्ली फराळ तर 12 महिने चालूच असतो... पण परदेशी गेल्यावर आपलं सगळं हट्टाने हवं असतं नई...!
View this post on Instagram
सण, पदार्थ.. भावंड, मित्र मैत्रिणी आई बाबा.. 🥹 पण हें सगळी नाती एका लाडवाच्या गोडीत असतात रे...आणि त्यात तु तो पहिल्यांदा बनवला आहेस मग तर तो कायच्या काय उत्तम झाला असणार.. माझ्या डोळ्यातल्या पाण्यामुळे थोडी खारट चव आली खरी ओठांवर पण बेसन लाडू ने तोंड गोड केलं बरं.. तुझं खुप कौतुक👏👏😘अबुली..
मी घरी नसूनही तू खुप काय काय शिकलास ,खरंतर त्याचमुळे तू किती स्वावलंबी झालास आणि आत्ता तर अजून होतोयस..खुप शाब्बासकीं तुला..!
कायमच तुझी वाट पाहणारी, तुझ्यासाठी जगणारी तुझी आई.आणि आपला बाबाही.
🥹🥹😘 #abhinaysubhedar
नेटकरीही करतात कौतुक
विशाखाच्या या पोस्टवर नेटक-यांनीही विशाखा आणि तिच्या मुलाचं कौतुक केलंय . अनेकांनी 'खूप छान संस्कार केले आहेत त्याचे हे फळ ' अशी प्रतिक्रिया दिली तर काही चाहत्यांनी माझ्यासाठी पाच लाडू बाजूला काढून ठेवा अशी हक्कानं मागणीही केली आहे . काही चहा त्यांनी छान झाले आहेत लाडू .. असे म्हणत विशाखा ज्या प्रकारे व्यक्त झाली तेही आवडलं असल्याची पोचपावती कमेंट्स मध्ये दिली आहे .