(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Salman Khan : दबंग खानला जीवे मारण्याचा रचला होता कट; 'असा' होता लॉरेन्स बिश्नोईचा 'प्लॅन बी'
Salman Khan : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि वडील सलीम खान यांना धमकीची चिठ्ठी मिळाली होती. आता लॉरेन्स बिश्नोईबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
Salman Khan : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि वडील सलीम खान यांना धमकीची चिठ्ठी मिळाली होती. आता लॉरेन्स बिश्नोईबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पंजाब पोलिसांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, सलमानच्या हत्येचा प्लॅन बी (Plan B) उघड केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक कपिल पंडित याने उघड केले आहे की, त्याने सचिन बिश्नोई आणि संतोष यादव यांच्याबरोबर सलमान खानला टार्गेट करण्यासाठी मुंबईत एक रेकी केली होती. सलमानच्याच पनवेलच्या फार्महाऊसमध्ये मारण्याची योजना त्यांनी आखली होती.
पंजाब पोलिसांचा धक्कादायक खुलासा
पंजाबचे पोलिस महासंचालक गौरव यादव (डीजीपी) या संदर्भात म्हणाले की, "गुंड संपत नेहरा आणि गोल्डी ब्रार यांचाही सलमान खानला लक्ष्य करण्याच्या कटात सहभाग होता, आम्ही त्यांचीही चौकशी करू." पोलिसांनी पुढे सांगितले की, 'बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या हत्येसाठी लॉरेन्स बिश्नोई टोळीने संपत नेहरा आणि गोल्डी ब्रार यांच्यामार्फत कपिलशी संपर्क साधला होता. सिद्धू मुसेवाला विकी मिद्दुखेरा यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या इशाऱ्यावर होता.
सलमानच्या कारचा वेग लक्षात घ्या
लॉरेन्स बिश्नोई टोळीनेही रेकी दरम्यान नोंदवले होते की, हिट अँड रन प्रकरणात नाव आल्यापासून सलमान खान त्याच्या कारचा वेग खूपच कमी ठेवतो. एवढेच नाही तर, पनवेल फार्महाऊसकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक अडथळे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे सलमानच्या कारचा वेग ताशी 25 किलोमीटर झाला असता. रेकी दरम्यान, त्याला हे देखील कळले की, जेव्हाही सलमान खान त्याच्या फार्महाऊसवर येतो तेव्हा फक्त त्याचा पीएसओ शेरा त्याच्यासोबत असतो. यामुळेच बिष्णोई टोळीच्या सर्व शूटर्सकडे लहान शस्त्रांची पिस्तुल काडतुसे होती.
लॉरेन्स बिश्नोईला सलमान खानची हत्या करून 1998 च्या काळवीट शिकारीचा बदला घ्यायचा आहे. बिश्नोईने स्वतः पोलिस रिमांडमध्ये खुलासा केला की, 2018 मध्ये सलमान खानच्या हत्येसाठी त्याने सर्व तयारी केली होती. यासाठी त्याने एक खास रायफलदेखील खरेदी केली होते. या रायफलसाठी त्याने 4 लाख रुपये दिले होते.
महत्वाच्या बातम्या :