Telly Masala : 'आई कुठे काय करते' मालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा ते 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाची टीम पोहोचली अमेरिकेला; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 09 Jul 2023 05:30 PM
Bawaal Trailer: अजय आणि निशाची भन्नाट गोष्ट; 'बवाल'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
'बावल' (Bawaal) चित्रपटाच्या ट्रेलरमधील वरुण- जान्हवीच्या केमिस्ट्रीनं आणि ट्रेलरमधील डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  Read More
Telly Masala : 'आई कुठे काय करते' मालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा ते 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाची टीम पोहोचली अमेरिकेला; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Entertainment Live : मराठी मनोरंजनविश्वातील बातम्या जाणून घ्या... Read More
Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाची टीम पोहोचली अमेरिकेला; समीर चौघुलेनं शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाला, 'समाधान आणि आनंद'
महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra)  या कार्यक्रमाच्या अमेरिकेतील लाईव्ह शोला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.  Read More
Ashwini Mahangade: अश्विनी महांगडेच्या हिंदी मालिकेनं घेतला प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्री खास पोस्ट शेअर करत म्हणाली, 'मी कायम ऋणी राहीन'
अश्विनीनं (Ashwini Mahangade) हिंदी मालिकेबाबत एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. Read More
Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते मालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा; अरुंधतीनं अनिरुद्धच्या कानशिलात लगावली
आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अरुंधतीनं अनिरुद्धच्या कानशिलात लगावली आहे.  Read More
Priya Marathe: प्रिया मराठेचा पती आहे प्रसिद्ध अभिनेता; अनेक हिट चित्रपट आणि मालिकांमध्ये केलंय काम
जाणून घेऊयात प्रिया मराठेच्या (Priya Marathe) पतीबाबत... Read More
Kajol: 'आपल्याकडे काही महान नेते आहेत जे...' ; राजकीय नेत्यांबाबत केलेल्या वक्तव्यावर काजोलचं स्पष्टीकरण
एका मुलाखतीमध्ये काजोलनं (Kajol) राजकीय नेत्यांबाबत एक वक्तव्य केलं होतं. आता काजोलनं तिच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. Read More
72 Hoorain Vs Neeyat Box Office: 'नीयत' आणि '72 हुरें' या चित्रपटांच्या कमाईत वाढ; जाणून घ्या कलेक्शन
जाणून घेऊयात  72 हूरें  आणि नीयत या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत.... Read More
Karan Johar: 'तू गे आहेस का?' नेटकऱ्याचा प्रश्न; करण जोहर उत्तर देत म्हणाला...
करणला त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. चाहत्यांच्या प्रश्नाला करणनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
Baipan Bhaari Deva: 'ऐन उन्हाळ्यात हा चित्रपट...'; बाईपण भारी देवा चित्रपटाबाबत संजय मोने यांची खास पोस्ट
नुकतीच अभिनेते संजय मोने (Sanjay Mone) यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन बाईपण भारी देवा (Baipan Bhaari Deva) या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bhumi Pednekar: 'ओठांची सर्जरी केली का?'; नेटकऱ्यांनी भूमी पेडणेकरला केलं ट्रोल


Bhumi Pednekar: अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.  भूमी ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच भूमीनं तिच्या खास लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. 


भूमीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे ओठ थोडे वेगळे वाटत आहेत, असं काही नेटकऱ्यांचे मत आहे. ब्लॅक आऊटफिटमधील फोटो भूमीनं सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं भूमीला ट्रोल केलं. त्या नेटकऱ्यानं कमेंट केली, तुला लिप फिलर्सची गरज नव्हती, तू अशीच सुंदर दिसते.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'तू ओठांची सर्जरी केली आहेस का?'


Hanuman : 'आदिपुरुष'नंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'हनुमान'


Hanuman : दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जा (Teja Sajja) सध्या 'हनुमान' (Hanuman) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या टीझर, फर्स्ट लूक पोस्टर्सने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. घोषणा झाल्यापासून चाहते सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. आता निर्मात्यांनी एक खास पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 


AI Voice Generator: AI ची कमाल! एक गाणं पाच गायकांच्या आवाजात, व्हिडीओ व्हायरल


AI Voice Generator:  AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) वापर अनेक जण सध्या करत आहेत. गेल्या वर्षी, ओपन एआयने चॅट जीपीटी लाँच करून एआयच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली. चॅट जीपीटी हा चॅटबॉट माणसांप्रमाणेच कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देतो आणि कमी वेळात अनेक कठीण कामे करू शकतो.  आता एक असे एआय टूल आले आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणाचाही आवाज निर्माण करू शकतात. याला व्हॉइस बॉट्स असं म्हटलं जातं. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की,  एआयचा वापर करुन एक गाणं पाच गायकांच्या आवाजात तयार करण्यात आलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.