Entertainment News Live Updates 5 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
गायक केके (KK) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. केके यांची अनेक गाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. केके यांनी गायलेलं शेवटचं गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचे रेकॉर्डिंग रविवारी झाले होते. केके यांचं शेवटचं गाणं ऐकण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
देशभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. बॉलिवूडमध्येदेखील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. करण जोहरची बर्थडे पार्टी कोरोना स्प्रेडर असल्याचे म्हटले जात आहे. आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला (Shahrukh कोरोनाची लागण झाली आहे. फिल्मफेअरने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत आता एक ट्विस्ट येणार आहे. मालिकेत सध्या दीपूचा गंभीर अपघात झाला आहे.सानिकाचा हट्टीपणा दीपूच्या जीवावर बेतला आहे. पण मालिकेच्या आगामी भागात दीपू कोमातून बाहेर येणार आहे. दीपू कोमातून बाहेर येण्यासाठी इंद्रा अग्निपरीक्षा देणार आहे.
कमल हासनचा (Kamal Haasan) 'विक्रम' (Vikram) सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या दोन दिवसांतच या सिनेमाने जगभरात 100 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाने रिलीज आधीच 200 कोटींची टप्पा पार केला होता.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार महेश बाबूच्या (Mahesh Babu) प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असलेल्या मेजर (Major) या चित्रपटाला रिलीज होऊन दोन दिवस झाले आहेत. या चित्रपटाचे कथानक हे NSG कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाच्या तेलगू व्हर्जनला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे तर हिंदी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं संथ गतीनं सुरुवात केली आहे.
Shakira, Gerard Pique : पॉप स्टार शकीरा (Shakira) आणि तिचा जोडीदार स्पॅनिश फुटबॉल खेळाडू जेरार्ड पिक(Gerard Piqué) यांनी ते वेगळे होत असल्याची घोषणा केली आहे. दोघांनी शनिवारी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे. शकीराच्या पीआर फर्मने जारी केलेल्या निवेदनात दोघांनी सांगितले की, ‘आम्ही वेगळे होत आहोत, हे सांगताना आम्हालाही दुःख होत आहे.’ शकीरा आणि जेरार्ड मागील 12 वर्षांपासून एकत्र होते, मात्र, त्यांनी लग्न केले नव्हते.
या निवेदनात त्यांनी म्हटले की, ‘आमच्या मुलांचे हित ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. तेव्हा, तुम्ही आमच्या गोपनीयतेचा आदर करावा, अशी आमची इच्छा आहे. आम्हाला समजून घेतल्याबद्दल आभारी आहे.’ शकीरा आणि जेरार्ड यांना दोन मुलं देखील आहेत. मनोरंजन आणि क्रीडा विश्वात चर्चेत असणारी ही जोडी वेगळी झाल्याने त्यांचे चाहतेही दुःखी झाले आहेत.
आयफा (IIFA 2022) पुरस्कार सोहळा हा अबुधाबी येथे पार पडला. या आयफा रॉक्स हा इव्हेंट शुक्रवारी (3 जून) पार पडला तर आयफा पुरस्कार सोहळा हा शनिवारी (4 जून) पार पडला. या सोहळ्याला सलमान खान, शाहिद कपूर, विकी कौशल, क्रिती सॅनॉन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अनन्या पांडे, सारा अली खान, एआर रहमान, टायगर श्रॉफ, नोरा फतेही, यो यो हनी सिंग, पंकज त्रिपाठी यांनी हजेरी लावली. अनेक सेलिब्रिटींना आयफा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. जाणून घेऊयात आयफा 2022 पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी...
दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्रीची एकत्र निर्मीती असलेल्या मराठी - कन्नड सिनेमाचे पोस्टर रिलीज झाले. आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे असं या सिनेमाचे नाव आहे.कवीश शेट्टी आणि मेघा शेट्टी , शिवानी सुर्वे आणि विराट मडके यांच्या मुख्य भूमिका यात आहेत. पॅन इंडिया हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येत बॉलिवूड सेलेब्रिटींचीही भर. कतरीना कैफ आणि कार्तिक आर्यन यांना कोविडची बाधा झाली आहे. करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसानिमीत्त यशराज स्टुडिओत झालेल्या पार्टीनंतर सेलेब्रिटी कोविड पॉझिटीव्ह. 25 तारखेला यशराज स्टुडिओमध्ये झाली होती पार्टी. यानंतर कतरिना कैफ एक तारखेला तर कार्तिक आर्यन चार तारखेला कोविड पॉझिटीव्ह आढळलेत
Body Spray Advertisement : सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका कंपनीच्या जाहिरातीची चर्चा सुरू आहे. ही जाहिरात लैंगिक शोषणाला प्रोत्साहन देत आहे, असं काही लोकांचे मत आहे. महिलांवरील लैंगिक हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या परफ्यूम ब्रँडचे व्हिडीओ त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात यावेत, असा आदेश केंद्र सरकारने यूट्यूब आणि ट्विटरलाही जारी केला आहे. या जाहिरातीवर अनेक कलाकारांनी रिअॅक्शन्स दिल्या आहेत. पाहूयात सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया...
Body Spray Ad : एका परफ्यूम कंपनीचा जाहिरात व्हिडीओ सध्या चांगलाच वादात सापडला आहे. अनेक वेळा अशा जाहिराती केल्या जातात की, त्यावर वाद निर्माण होतो. यावेळीही असेच झाले आहे. लोक या जाहिरातीला वादग्रस्त म्हणत आहेत. ही जाहिरात लैंगिक शोषणाला प्रोत्साहन देत असल्याचे म्हटले जात आहे. महिलांवरील लैंगिक हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या परफ्यूम ब्रँडचे व्हिडीओ त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात यावेत, असा आदेश केंद्र सरकारने यूट्यूब आणि ट्विटरलाही जारी केला आहे.
वादग्रस्त जाहिरात लेयर शॉट या ब्रँडच्या बॉडी स्प्रेची आहे. या जाहिरातीमुळे महिलांना अपमानास्पद वाटत असल्याचे आयबी मंत्रालयाचे म्हणणे आहे. मंत्रालयाचे सहाय्यक संचालक डिजिटल मीडिया क्षितिज अग्रवाल यांनी हे ट्विट केले आहे.
IIFA 2022 : सध्या दुबईमध्ये आयफा (IIFA 2022) पुरस्कार सोहळ्याचा समारंभ सुरू आहे. अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्याला हजेरी लावली. आयफा सोहळ्या दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आयफा सोहळ्यामध्ये गायक आणि रॅपर असणाऱ्या हनी सिंहनं खास परफॉर्मेन्स होता. या परफॉर्मन्स दरम्यान हनी सिंह हा ए.आर. रहमान (AR Rahman) यांच्या समोर नतमस्तक झाला.
बॉलिवूडवर पुन्हा एकदा कोरोनाचे सावट पसरले आहे. एकापाठोपाठ एक बॉलिवूड सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. कार्तिक आर्यननंतर आता अभिनेता आदित्य रॉय कपूर देखील कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. आदित्य लवकरच 'ओम द बॅटल विदीन' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत संजना संघी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार होता. पण, आता आदित्य कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ट्रेलर रिलीजवर परिणाम होऊ शकतो.
MIFF 2022 : मुंबईत गेले सात दिवस सुरु असलेल्या ‘मिफ्फ-2022’ (MIFF 2022 ) या, माहितीपट,लघुपट आणि अॅनिमेशनपटांना समर्पित, सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा दिमाखदार सोहळ्यात समारोप झाला. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन तसेच सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते पद्मभूषण श्याम बेनेगल हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, माहिती प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे महासंचालक मनीष देसाई आणि फिल्म्स डिव्हिजनचे व मिफ्फचे संचालक रविंद्र भाकर देखील यावेळी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय श्रेणीतील पुरस्कारांचे वितरण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवातील सर्वोत्कृष्ट माहितीपट म्हणून अॅलीओना व्हॅन देर होर्स्त यांच्या ‘टर्न युअर बॉडी टु द सन’ या चित्रपटाचा सुवर्णशंख, प्रशस्तीपत्र आणि 10 लाख रुपये देऊन गौरव करण्यात आला.
Mukesh Bhatt Birthday : बॉलिवूड विश्वात थ्रिलर आणि सस्पेन्स चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक मुकेश भट्ट (Mukesh Bhatt) आज (5 जून) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. आयुष्यात अनेक संघर्षांना तोंड देत या टप्प्यावर पोहोचलेल्या मुकेश भट्ट यांना त्यांचे वडील नानाभाई भट्ट यांच्याकडून चित्रपट बनवण्याची आवड निर्माण झाली. नानाभाई भट्ट स्वत: दिग्दर्शक आणि निर्माते होते. मुकेश भट्ट यांनी 1990 मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. 'जुर्म' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.
भाऊ महेश भट्ट दिग्दर्शित ‘आशिकी’ या चित्रपटातून त्यांना पहिल्या यशाची चव चाखायला मिळाली. मुकेश भट्ट बहुतेक यशस्वी चित्रपट हे थ्रिलर आणि मर्डर मिस्ट्री आहेत. त्यांच्या अशाच काही हिट थ्रिलर चित्रपटांबद्दल जाणून घेऊया...
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
परवानगी असूनही ‘आयफा 2022’साठी दुबईत पोहचू शकली नाही रिया चक्रवर्ती
Rhea Chakraborty IIFA 2022: बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे (Rhea Chakraborty) अबुधाबीला जाण्याचे स्वप्न भंगले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेली रिया चक्रवर्ती 2 जून ते 5 जून या दरम्यान अबूधाबीमध्ये आयोजित ‘आयफा’ (IIFA 2022) पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणार होती. कोर्टातून जामिनावर सुटलेली रिया चक्रवर्ती हिने ‘नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स’ (NDOS) अंतर्गत परदेश प्रवासासाठी कोर्टाची परवानगीही घेतली होती. पण, तरीही ती अबुधाबीला जाऊ शकली नाही.
ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असल्याने रिया चक्रवर्तीवर 2020पासून परदेश प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. यानंतर रियाने आयफा अवॉर्ड सोहळ्यासाठी कोर्टात अर्ज करून परवानगी मागितली होती. अभिनेत्रीने पासपोर्ट परत मिळवण्यासाठी आणि परदेशात जाण्याच्या परवानगीसाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तिला काही अटी शर्थींसह परवानगी दिली होती. पण, रिया चक्रवर्ती विरुद्ध लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आल्याने तिला परदेशात जाता आलेले नाही. परदेश प्रवासासाठी अर्ज दाखल करताना, रिया चक्रवर्तीच्या विरोधात एजन्सीने जारी केलेल्या लुकआउट नोटीसबद्दल तिला माहिती नव्हती.
ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्ती हिला कोर्टाने जामिनावर सोडले होते. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असल्याने तिला 2020पासून परदेशात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, ती आयफा पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी खूप उत्साहित होती. त्यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज करून अबुधाबीला जाण्याची परवानगी मागितली होती. मात्र, तिला लुकआऊट नोटीसबाबत कोणतीही माहिती नव्हती. अशा परिस्थितीत ती परवानगी मिळूनही देश सोडून कुठेही जाऊ शकली नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -